Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Railway news : ‘पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांची गैरसोय दूर करा’ ; ‘सह्याद्री एक्सप्रेस’ मुंबईपर्यंत वाढवण्याची मागणी

Western Maharashtra railway connectivity : पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्यांतील हजारो प्रवाशांच्या सुलभ प्रवासासाठी रेल्वे प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची मागणी केली जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 25, 2026 | 05:37 PM
Sahyadri Express Extension Demand

Sahyadri Express Extension Demand

Follow Us
Follow Us:
  • ‘पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांची गैरसोय दूर करा’
  • ‘सह्याद्री एक्सप्रेस’ मुंबईपर्यंत वाढवण्याची मागणी
  • निरा स्टेशन थांब्याची गरज
Railway News in Marathi : पुणे : पुणे जिल्ह्यासह कोल्हापूर, सांगली आणि सातारा पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्यांतील हजारो प्रवाशांच्या सुलभ प्रवासासाठी रेल्वे प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची मागणी केली जात आहे. यासाठी ‘सह्याद्री एक्सप्रेस’ मुंबईपर्यंत विस्तारित करावी आणि ‘महालक्ष्मी एक्सप्रेस’ला निरा स्टेशनवर थांबा देण्यात यावा, अशी आग्रही मागणी विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य चैतन्य जोशी यांनी केली आहे. मध्य रेल्वे विभागातील सर्व रेल्वे सल्लागार सदस्यांची बैठक मुंबई येथील कार्यालयात गुरुवारी पार पडली.

हे देखील वाचा : Railway News : रेल्वे प्रवाशांना दिलासा! ‘या’ मार्गांवरील ‘समर स्पेशल’ गाड्यांच्या फेरीत वाढ

मुंबई येथील मध्ये रेल्वे कार्यालयात गुरुवारी (२३ एप्रिल) सर्व रेल्वे सल्लागार सदस्यांची बैठक पार पडली. या बैठकीत जोशी यांनी पश्चिम महाराष्ट्रीतील रेल्वे त्रुटींवर प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम होण्यासाठी सह्याद्री एक्सप्रेसचा विस्तार करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सह्याद्रीच्या विस्तारामुळे प्रवाशांची बचत

सध्या कोल्हापूर ते पुणे या मार्गावर धावणारी सह्याद्री एक्सप्रेस केवळ पुण्यापर्यंत मर्यादित आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा परिसरातून दररोज हजारो विद्यार्थी, व्यापारी आणि कामगार रोजगासाठी मुंबईला जात असतात, मात्र पुण्यातच थांबत असल्याने प्रवाशांना उतरुन दुसरी गाडी पकडावी लागत असल्याने मोठे हाल होत आहेत. पूर्वी ही गाडी मुबईपर्यंत होती.

यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्हीचा अपव्यय होत आहे. जर ही गाडी थेट मुंबईपर्यंत विस्तारित करण्यात आली, तर प्रवाशांची सोयच होणार नाही, तर  थेट प्रवास उपलब्ध झाल्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नातही मोठी भर पडण्याची शक्यता आहे, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला. रेल्वे प्रशासनाने या विषयांची गांभीर्याने दखल कार्यवाही केले तर प्रवाशांना फायदा होईल.

निरा स्टेशन थांब्याची गरज

दुसरीकडे, मुंबई-कोल्हापूर दरम्यान धावणाऱ्या ‘महालक्ष्मी एक्सप्रेस’ला पुणे ते सातारा या दरम्यान एकही थांबा नसल्याने या पट्ट्यातील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बारामती, निरा, फलटण, सासवड आणि औद्योगिक(MIDC) परिसरातील नागरिक या स्टेशनवर अवलंबून आहेत. महालक्ष्मी एक्सप्रेसला येथे थांबा मिळाल्यास उद्योजक, नोकरदार आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असे चैतन्य जोशी यांनी नमूद केले.

पश्चिम महाराष्ट्रातील प्रलंबित मागण्या पूर्ण झाल्यास रेल्वे सेवा अधिक लोकाभिमुख होई अशी आशा व्यक्त केली जात आहे. यावर आता रेल्वे प्रशासन काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष आहे.

हे देखील वाचा : Railway News : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; वाराणसीसाठी ‘अमृत भारत’ एक्सप्रेसला मंजूरी

Web Title: Railway news sahyadri express mumbai extension demand mahalaxmi express nira stop

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 05:37 PM

Topics:  

  • Marathi News
  • Railway News

संबंधित बातम्या

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित
1

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज
2

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती
3

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल
4

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.