Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

EPFO Scam Case: मोठा घोटाळा! ईपीएफओमध्ये 1816 कोटींची हेराफेरी! अनिल अंबानी आणि रिलायन्स कॅपिटलविरुद्ध FIR दाखल

EPFO Scam Case: EPFO ने उद्योगपती अनिल अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स कॅपिटल कंपनीविरोधात मोठी कारवाई केली आहे. तब्बल १,८१६ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी अनिल अंबानी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर FIR दाखल करण्यात आला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 02, 2026 | 06:15 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • मोठा घोटाळा!
  • ईपीएफओमध्ये 1816 कोटींची हेराफेरी!
  • अनिल अंबानी, रिलायन्स कॅपिटलविरुद्ध FIR दाखल
EPFO Scam Case: कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF ची संस्था असलेल्या EPFO ने उद्योगपती अनिल अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स कॅपिटल कंपनीविरोधात मोठी कारवाई केली आहे. तब्बल १,८१६ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ( EPFO Scam Case ) केंद्रीय अन्वेषण ब्युरो CBI ने रिलायन्स कॅपिटल लिमिटेड, तिचे माजी अध्यक्ष अनिल अंबानी, तसेच अनेक अज्ञात सरकारी अधिकारी आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. हे प्रकरण EPFO ला झालेल्या ₹१,८१६.२२ कोटींच्या कथित नुकसानीशी संबंधित आहे. या प्रकरणामुळे अनिल अंबानींच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. नेमकं काय प्रकरण आहे? आणि या प्रकरणाचा PF धारकांवर काही परिणाम होणार का? जाणून घेऊयात.

Zomato Swiggy vs Flipkart: आता फ्लिपकार्टवर ऑर्डर करा तुमचं आवडतं जेवण! झोमॅटो अन् स्विगीपेक्षा मिळतील भारी डिस्काउंट्स?

सीबीआयच्या म्हणण्यानुसार, कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या EPFO च्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. ही एजन्सी आता संपूर्ण गुंतवणूक आणि संबंधित कागदपत्रांची चौकशी करेल.

संपूर्ण प्रकरण काय?

तपास यंत्रणेनुसार, रिलायन्स कॅपिटलने २०१३ आणि २०१४ दरम्यान सुरक्षित नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्स जारी केले होते. असा आरोप आहे की, चार पोर्टफोलिओ व्यवस्थापकांमार्फत EPFO चा अंदाजे ₹२,५०० कोटींचा निधी या डिबेंचर्समध्ये गुंतवण्यात आला होता. त्यानंतर, या गुंतवणुकीमुळे EPFO ला मुद्दल आणि व्याजासह ₹१,८१६.२२ कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. यामध्ये अंदाजे ₹१,००७.५५ कोटींचे मूळ नुकसान आणि ₹८०८.६७ कोटींचे व्याज दायित्व समाविष्ट आहे.

कोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल झाला ?

सीबीआयने गुन्हेगारी कट, फसवणूक, विश्वासघात आणि भ्रष्टाचार यांच्याशी संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. गुंतवणूक प्रक्रियेदरम्यान नियमांचे उल्लंघन झाले का आणि त्यात कोण सहभागी होते, याचाही तपास यंत्रणा करेल.

अनिल अंबानींच म्हणणं काय?

अनिल अंबानी यांनी जारी केलेल्या निवेदनात सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांच्या प्रवक्त्याने सांगितले की, त्यांनी कोणताही गैरप्रकार केलेला नाही आणि ते कायद्यानुसार सर्व अधिकारांचा वापर करतील. या निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, ते नोव्हेंबर २०२१ पर्यंत कंपनीचे गैर-कार्यकारी अध्यक्ष होते.

EPFO साठी हे प्रकरण का महत्त्वाचं?

EPFO देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे व्यवस्थापन करते. त्यामुळे, त्याच्या गुंतवणुकीशी संबंधित कोणतेही कथित आर्थिक नुकसान गंभीर मानले जाते. म्हणूनच, या प्रक्रियेत कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाले आहे की नाही हे निश्चित करण्यासाठी या प्रकरणाचा तपास EPFO कडे सोपवण्यात आला आहे.

Free Netflix Subscription: फ्लिपकार्टवर शॉपिंग करा अन् मिळवा फ्री नेटफ्लिक्स प्लॅन; काय आहे खास ऑफर?

Web Title: Epfo scam case fir register against anil ambani reliance capital 1816 crore fraud

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 06:15 PM

Topics:  

  • anil ambani
  • Business News
  • CBI
  • epf
  • EPFO
  • Marathi News
  • PF
  • PF withdrawal
  • Reliance
  • reliance group
  • Reliance Industries

संबंधित बातम्या

IT Sector Layoffs : 5 मिनिटांची गुगल मीट आणि 80 भारतीयांची नोकरी गेली; अमेरिकन कंपनीची धक्कादायक कारवाई!
1

IT Sector Layoffs : 5 मिनिटांची गुगल मीट आणि 80 भारतीयांची नोकरी गेली; अमेरिकन कंपनीची धक्कादायक कारवाई!

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित
2

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज
3

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती
4

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.