Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वडगाव शहराला दिलासा! ३९.३३ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेतील दोन जलशुद्धीकरण केंद्रांचे लोकार्पण

वडगाव शहराला मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील ३९ कोटींचा जलशुद्धीकरण पाणीपुरवठा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी उलब्ध होणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 28, 2026 | 11:41 AM
Wadgaon water supply scheme Inauguration

Wadgaon water supply scheme Inauguration

Follow Us
Follow Us:
  • वडगावमध्ये दोन प्रकल्पांचे उद्घाटन
  • ३९ कोटींच्या पाणी योजनेला गती
  • आमदार शेळके यांच्या हस्ते जलशुद्धीकरण प्रकल्पांचे लोकार्पण
सतिश गाडे : वडगाव मावळ : महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत ३९ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मंजूर करून वडगाव शहरासाठी राबविण्यात आलेल्या वाढीव पाणीपुरवठा योजनेतील शिंदेटेकडी (२ MLD) आणि संस्कृती (२ MLD) या दोन महत्त्वपूर्ण जलशुद्धीकरण केंद्रांचे लोकार्पण शुक्रवार (२७ मार्च २०२६) रोजी उत्साहात पार पडले. माळीनगर येथील शिंदेटेकडी जलशुद्धीकरण केंद्र परिसरात आयोजित कार्यक्रमात आमदार सुनील आण्णा शेळके यांच्या हस्ते या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले.

हे देखील वाचा : Pune Water Supply: पुणे शहरावर पाणीटंचाईचे सावट? खडकवासला प्रकल्पातील नियोजनात मोठा बदल

या सोहळ्यास माजी उपसभापती गणेश अप्पा ढोरे, माजी सरपंच बाळासाहेब ढोरे, माजी महिला सरपंच नंदाताई ढोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नगराध्यक्षा अबोली मयूर ढोरे, उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा व जलनिस्सारण सभापती सुनील गणेश ढोरे, नगरसेवक पंढरीनाथ ढोरे, अजय म्हाळसकर, गणेश म्हाळसकर, अजय भवार, विरोधी पक्षनेत्या अर्चना म्हाळसकर, अनंता कुडे, विशाल वहिले, पुनम भोसले, माया चव्हाण, वैशाली सोनवणे, सुनिता ढोरे, राणी म्हाळसकर, रूपाली ढोरे, आकांक्षा वाघवले, संदिप म्हाळसकर, रोहित धडवले यांच्यासह नगरपंचायतीचे पदाधिकारी, अधिकारी, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार सुनील आण्णा शेळके यांनी शिंदेटेकडी जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल म्हाळसकर कुटुंबियांचे विशेष आभार मानले. तसेच प्रकल्पाचे काम ठेकेदार ईगल इन्फ्रा, मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम आणि वडगाव नगरपंचायत प्रशासनाने उत्कृष्ट दर्जाने व नियोजित वेळेत पूर्ण केल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी सर्वांचे कौतुक केले.
नगराध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांनी आपल्या मनोगतात पाणीपुरवठा योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार शेळके यांचे आभार मानले.

तसेच वडगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातही मोठ्या प्रमाणात निधी मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य सभापती सौ. माया अमर चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी पाणीपुरवठा व जलनिस्सारण सभापती श्री. सुनील गणेश ढोरे यांनी उपस्थित मान्यवर, पदाधिकारी व नागरिकांचे आभार मानले. दरम्यान, शिंदेटेकडी व संस्कृती या दोन्ही जलशुद्धीकरण प्रकल्पांमुळे वडगाव शहरातील नागरिकांना शुद्ध, स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध होणार असून, शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

हे देखील वाचा : Maval News : कार्ला येथे पालखी सोहळ्यानंतर दोन गटात भीषण हाणामारी; दगडफेकीने उडाली खळबळ

Web Title: Relief for wadgaon city two water purification plants inaugurated under 3933 crore water supply scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 11:41 AM

Topics:  

  • Pune
  • Wadgaon Maval
  • Water supply

संबंधित बातम्या

Alandi : आळंदीत पालखी प्रस्थानाची जय्यत तयारी; मंदिर समिती आणि प्रशासन सज्ज…
1

Alandi : आळंदीत पालखी प्रस्थानाची जय्यत तयारी; मंदिर समिती आणि प्रशासन सज्ज…

Pune Crime: एकाच खोलीत राहत होते, किरकोळ वादातून मित्राचा खून; आरोपी 12 तासांत अटकेत
2

Pune Crime: एकाच खोलीत राहत होते, किरकोळ वादातून मित्राचा खून; आरोपी 12 तासांत अटकेत

Pune Crime: संतापजनक! कॉम्प्रेसरचा हायप्रेशर पाईप गुदद्वारात घातला; सहकाऱ्याच्या कृत्यामुळे 42 वर्षीय कामगाराचा मृत्यू
3

Pune Crime: संतापजनक! कॉम्प्रेसरचा हायप्रेशर पाईप गुदद्वारात घातला; सहकाऱ्याच्या कृत्यामुळे 42 वर्षीय कामगाराचा मृत्यू

Ketan Agrawal Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा आणखी एक धक्का! नातवाच्या मृत्यूचं दुःख सहन न झाल्याने आजोबांचं निधन
4

Ketan Agrawal Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा आणखी एक धक्का! नातवाच्या मृत्यूचं दुःख सहन न झाल्याने आजोबांचं निधन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.