सौजन्य - नवराष्ट्र टीम
ड्रेनेजमधून वाहणारे मैलापाणी उताराच्या दिशेने शुभतेज मंगल कार्यालयापर्यंत वाहत जाते. त्यामुळे रस्त्यावर शेवाळ साचून रस्ता निसरडा झाला आहे. तसेच खोलगट भागात मैलापाणी साचत असल्याने दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रकार घडत आहेत. याप्रकरणी मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण यांच्या नेतृत्वाखाली पुणे महापालिका आयुक्त कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे. ड्रेनेजची समस्या तातडीने सोडवावी, अन्यथा मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आहे. यावेळी निलेश जुनवणे, पांडुरंग सुतार, गोपाळ जाधव, अशोक मराठे, प्रेमनाथ उमप, राजेंद्र फुके, संदेश कांबळे उपस्थित होते.
बालाजी चौकातून दररोज पीएमपी बस, दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मोठी रहदारी असते. मुख्य रस्त्यावरच मैलापाणी पसरल्याने दुचाकी घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. महापालिकेकडून तत्काळ प्रत्यक्ष काम सुरू होऊन बालाजी चौक स्वच्छ व सुरक्षित व्हावा, अशी अपेक्षा पाषाणकर नागरिक व्यक्त करत आहेत.
बसथांब्याच्या दुरावस्थेवरुन मनसे आक्रमक
पुण्यातील पाषाण येथील मुख्य बसथांब्याची दुरवस्था झाली आहे. देखभाली अभावी तो जीर्ण झाला असल्याने तो कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. याची तातडीने दखल घेऊन या बसथांब्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण यांनी गेल्या काही दिवसाखाली केली आहे. निम्हण यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. तसेच सुहास निम्हण यांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे.






