Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढत्या उष्णतेचा पोल्ट्री व्यवसायाला फटका, कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले; व्यावसायिक चिंतेत

मावळ व खेड तालुक्यातील वाढत्या उष्णतेमुळे कुक्कुटपालन व्यवसाय गंभीर संकटात सापडला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानात झालेल्या तीव्र वाढीचा थेट परिणाम पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांवर होत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 24, 2026 | 12:30 AM
वाढत्या उष्णतेचा पोल्ट्री व्यवसायाला फटका, कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले; व्यावसायिक चिंतेत

वाढत्या उष्णतेचा पोल्ट्री व्यवसायाला फटका, कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले; व्यावसायिक चिंतेत

Follow Us
Follow Us:
  • वाढत्या उष्णतेचा पोल्ट्री व्यवसायाला फटका
  • कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले
  • व्यावसायिक चिंतेत
देहूगाव : मावळ व खेड तालुक्यातील वाढत्या उष्णतेमुळे कुक्कुटपालन व्यवसाय गंभीर संकटात सापडला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानात झालेल्या तीव्र वाढीचा थेट परिणाम पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांवर होत असून, उष्माघातामुळे त्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.

 

मावळ तालुक्यातील सुदुंबरे, जांबवडे, जाधववाडी तसेच खेड तालुक्यातील निघोजे, भांबोली, शिंदेवासुली, मरकळ, गोळेगाव, चरोली या परिसरात मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसाय चालतो. मात्र, यंदा उन्हाची तीव्रता लवकर वाढल्याने कोंबड्यांवर उष्णतेचा ताण निर्माण झाला आहे. परिणामी, कोंबड्यांचे मृत्यू वाढले असून, जिवंत कोंबड्यांचे वजनही घटत आहे.

उष्णतेपासून संरक्षणासाठी व्यावसायिकांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. शेडवर उसाचे पाचट टाकणे, त्यावर पाणी मारणे, स्प्रिंकलर व फॉगर प्रणालीचा वापर, फॅन बसवणे, पत्र्याच्या शेडला बारदान पोती लावणे अशा उपायांनी तापमान कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, या उपाययोजनांमुळे खर्चात मोठी वाढ होत असून, अपेक्षित परिणाम मिळत नसल्याची खंत व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. सध्या परिसरात प्रखर उष्णतेची लाट कायम असून, उष्माघातामुळे कोंबड्यांचे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत. त्यामुळे मावळ-खेड परिसरातील पोल्ट्री व्यावसायिकांची चिंता वाढली आहे.

हे सुद्धा वाचा : दारूबंदीच्या जावळी तालुक्यात दारूची विक्री जोमात; नवीन पोलीस अधिक्षकांनी लक्ष देण्याची गरज

पिल्लांनाही उष्णतेचा फटका

तालुक्यात पोल्ट्री व्यवसाय मोठ्या प्रमाणात असला तरी, उष्णतेचा सर्वाधिक परिणाम पिल्लांवर होत आहे. वाढत्या तापमानामुळे कोंबड्या कमी खाद्य घेत असल्याने त्यांचे वजन वाढ मंदावली आहे. पिल्लांना उष्णतेची झळ सहन होत नसल्याने मृत्यूदर वाढत आहे. तसेच, पाण्याचा वाढलेला वापर आणि अंडी उत्पादनात झालेली घट यामुळे व्यावसायिकांचे दररोज हजारो रुपयांचे नुकसान होत असल्याचे पोल्ट्री व्यावसायिकांनी सांगितले.

Web Title: Rising heat has led to a significant increase in chicken deaths

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Business
  • chicken
  • pune news

संबंधित बातम्या

दारु नका बनवू, रोजगार करा! पुणे ग्रामीण पोलीस ‘त्या’ शंभर कुटुंबांना दाखवणार नवी वाट
1

दारु नका बनवू, रोजगार करा! पुणे ग्रामीण पोलीस ‘त्या’ शंभर कुटुंबांना दाखवणार नवी वाट

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण
2

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण

महाबळेश्वरच्या सहलीला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; शिरवळजवळ भीषण अपघातात चौघांचा मृत्यू
3

महाबळेश्वरच्या सहलीला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; शिरवळजवळ भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर
4

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.