Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केडगाव प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे रोहन सुरवसे आक्रमक; पुणे शहरातील आयव्हीएफ केंद्रांच्या चौकशीची मागणी

पुणे शहरातील आयव्हीएफ (वंध्यत्व उपचार) केंद्रे, सोनोग्राफी केंद्रे आणि रुग्णालयांचीही सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 08, 2026 | 02:07 PM
केडगाव प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे रोहन सुरवसे आक्रमक; पुणे शहरातील आयव्हीएफ केंद्रांच्या चौकशीची मागणी

केडगाव प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे रोहन सुरवसे आक्रमक; पुणे शहरातील आयव्हीएफ केंद्रांच्या चौकशीची मागणी

Follow Us
Follow Us:

पुणे : केडगाव येथील गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील रुग्णालयांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. या प्रकरणात दोन डॉक्टरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील आयव्हीएफ (वंध्यत्व उपचार) केंद्रे, सोनोग्राफी केंद्रे आणि रुग्णालयांचीही सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे.

 

सुरवसे यांनी यापूर्वी मार्च महिन्यात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. त्यामध्ये आयव्हीएफ केंद्रांमधील कथित आर्थिक गैरव्यवहार, औषध विक्रीतील अनियमितता तसेच बेकायदेशीर गर्भलिंग निदानाच्या संशयित प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.

पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर आयव्हीएफ केंद्रे सुरू झाली असून, वंध्यत्व उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना अनेक ठिकाणी आवश्यक औषधे संबंधित केंद्रांकडूनच खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप सुरवसे यांनी केला आहे. ही औषधे बाहेरील मेडिकल दुकानांमध्ये उपलब्ध नसल्याचे सांगितले जात असल्याने उपचारासाठी येणाऱ्या दांपत्यांचे आर्थिक शोषण होत आहे. ते थांबले पाहिजे, असेही पाटील म्हणाले.

याशिवाय काही आयव्हीएफ केंद्रांशी संबंधित काही सोनोग्राफी केंद्रांमध्ये बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी होते. उरळी कांचन येथील दीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरणानंतर वडगाव शेरीतील एका नामांकित रुग्णालयात कथित गर्भलिंग तपासणी झाल्याचा मुद्दा चर्चेत आला होता. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील सोनोग्राफी केंद्रांची वर्षातून दोन वेळा तपासणी केली जाते. मात्र ही तपासणी केवळ औपचारिकता ठरत असल्याचा आरोप करत सुरवसे यांनी तपासणी प्रक्रियेत अधिक काटेकोरपणा आणण्याची मागणी केली आहे.

ठराविक नमुन्यात माहिती भरणे, नोंदींची वरवरची तपासणी करणे आणि किरकोळ नोटिसा बजावून कारवाई पूर्ण झाल्याचे दाखविले जाते, असेही त्यांनी म्हटले आहे. गर्भलिंग निदान व बेकायदेशीर गर्भपातासारखे गंभीर गुन्हे रोखण्यासाठी संबंधित केंद्रांची कसून चौकशी करावी. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आयव्हीएफ आणि सोनोग्राफी केंद्रांची मान्यता तात्काळ निलंबित अथवा रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा : 556 गुन्हे दाखल, 97 लाखांचा मुद्देमाल जप्त; लातूर पोलिसांची अवैध धंद्याविरोधात मोठी कारवाई

मार्चमध्येच केली होती चौकशीची मागणी

आयव्हीएफ केंद्रांमधील आर्थिक गैरव्यवहार, औषध विक्रीतील अनियमितता आणि गर्भलिंग निदानाच्या संशयित प्रकरणांबाबत मार्च महिन्यातच राज्य सरकारकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली होती. केडगाव प्रकरणानंतर प्रशासनाने ग्रामीण भागात कारवाई सुरू केली असली, तरी शहरातील केंद्रांचीही तातडीने तपासणी करण्यात यावी, अशी मागणी रोहन सुरवसे पाटील यांनी पुन्हा एकदा केली आहे.

Web Title: Rohan survase patil has demanded an investigation into ivf centers in pune city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 02:07 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • NCP News
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट; उप अग्निशमन अधिकारी चिपाडेंवर निलंबनाची टांगती तलवार
1

मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट; उप अग्निशमन अधिकारी चिपाडेंवर निलंबनाची टांगती तलवार

घाटी परिसरातून महिलेचे अपहरण; पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन सलग दोन दिवस अत्याचार
2

घाटी परिसरातून महिलेचे अपहरण; पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन सलग दोन दिवस अत्याचार

भीमाशंकर मार्ग पहिल्याच पावसात उखडला, साडेतीन कोटी रुपये खर्चुनही रस्त्याची दुरवस्था; अधिकाऱ्यांवर आरोप
3

भीमाशंकर मार्ग पहिल्याच पावसात उखडला, साडेतीन कोटी रुपये खर्चुनही रस्त्याची दुरवस्था; अधिकाऱ्यांवर आरोप

‘अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजने’चा धुमधडाक्यात शुभारंभ; आदरणीय शेतकरी सन्मान सोहळाही उत्साहात संपन्न
4

‘अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजने’चा धुमधडाक्यात शुभारंभ; आदरणीय शेतकरी सन्मान सोहळाही उत्साहात संपन्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.