Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: “… त्या पुरावेही नष्ट करू शकतात”; Ashok Kharat केसमध्ये चाकणकरांवर ठोंबरेंचे आरोप

भोंदूगिरीच्या आड महिलांचे शोषण करणाऱ्या नाशिकच्या स्वयंघोषित ज्योतिष ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्या अटकेने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 19, 2026 | 06:04 PM
Maharashtra Politics: "... त्या पुरावेही नष्ट करू शकतात"; Ashok Kharat केसमध्ये चाकणकरांवर ठोंबरेंचे आरोप

Maharashtra Politics: "... त्या पुरावेही नष्ट करू शकतात"; Ashok Kharat केसमध्ये चाकणकरांवर ठोंबरेंचे आरोप

Follow Us
Close
Follow Us:

रुपाली चाकणकरांचे खरातला अभय होते का?
रुपाली पाटील ठोंबरे यांचे रूपाली चाकणकरांवर आरोप 
पुरावे नष्ट करू शकतात असा केला आरोप 

Rupali Patil Thombre on Ashok kharat Case:  नाशिक मधील लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी कॅप्टन अशोक खरात याला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे अभय होते का? असा प्रश्न राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच, त्या पदावर राहिल्या तर त्या पुरावेही नष्ट करू शकतात, असा आरोप करीत, ‘जनाची नाही तर मनाची लाज असेल तर, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा’ अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

महिला आयोगाकडे वर्षभरापूर्वी खरात विरोधात तक्रार करण्यात आली होती; मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, त्याची चौकशी तेव्हाच केली असती तर आता पीडित महिलांची संख्या वाढली नसती, असा दावा पाटील ठोंबरे यांनी केला. नाशिकमधील स्थानिक पत्रकाराने या प्रकरणाला एका वर्षापूर्वी वाचा फोडली होती, अशी माहीती देत पाटील म्हणाल्या, वाचा फोडणाऱ्या पत्रकाराकडेच चाकणकर यांनी खुलासा मागितला होता व जबरदस्तीने माफीनामा घेतला होता. संस्थेची चौकशी करणे गरजेचे होते, पण तसं झालं नाही.

कारण खरातच्या ट्रस्टवर स्वत: रुपाली चाकणकर आहेत. जर तो माफीनामा घेतला नसता, तर आत्ताच्या पीडित महिला वाचल्या असत्या, असा दावाही त्यांनी केला. राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षच ट्रस्टवर असल्याने अशोक खरात या नराधमाची हिंमत वाढली. रुपाली चाकणकर या खरातचे पाय धुतानाचे, त्याच्या डोक्यावर छत्री धरतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. संविधानिक पदावर असणार्‍या व्यक्तीने अशी कृती करणे कितपत योग्य आहे, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

Ashok Kharat Case : रुपाली चाकणकर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा; विरोधकांच्या मागणीला जोर

‘रुपाली चाकणकर यांनी खरातला एक प्रकारे अभय दिले आहे का, की वाटेल त्या महिलेचे शोषण कर. हव्या त्या महिलेचा बलात्कार कर. तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही. त्यांच्या कृतीतून असेच दिसते. वैष्णवी हगवणे, संपदा मुंडे प्रकरणात राज्य महिला आयोगावर असून रुपाली चाकणकर महिलांबाबत अन्यायकारक बोलल्या. खरं तर ते कायद्याने चूक आहे. जनाची नाही मनाची लाज सोडलेल्या लोकांनी आपल्या पदावरुन पायउतार व्हायला पाहिजे’, असे देखील रुपाली ठोंबरे म्हणाल्या.

‘स्वयंघोषित कॅप्टन’च्या ‘त्या’ कृत्याने हादरला महाराष्ट्र; 58 आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त, धार्मिक विधीच्या नावाखाली…

रुपाली चाकणकरांनी राजीनामा देण्याची मागणी

भोंदूगिरीच्या आड महिलांचे शोषण करणाऱ्या नाशिकच्या स्वयंघोषित ज्योतिष ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्या अटकेने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी खरातकडून जप्त केलेल्या ५८ आक्षेपार्ह व्हिडिओंमुळे अनेक बड्या राजकीय नेत्यांचे आणि प्रतिष्ठित 5 व्यक्तींचे धाबे दणाणले असून, याप्रकरणावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार ‘कलगीतुरा’ रंगला आहे. दरम्यान, याप्रकरणावरून रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

Web Title: Rupali thombre patil criticizes rupali chakankar nashik ashok kharat case maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 06:04 PM

Topics:  

  • crime news
  • Maharashtra Politics
  • rupali chakankar
  • Rupali Thombare

संबंधित बातम्या

शंभरहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या सराईताला ठोकल्या बेड्या; अलंकार पोलिसांची मोठी कारवाई
1

शंभरहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या सराईताला ठोकल्या बेड्या; अलंकार पोलिसांची मोठी कारवाई

Ahilyanagar Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; एसटी खोल खड्यात… , 2 ठार
2

Ahilyanagar Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; एसटी खोल खड्यात… , 2 ठार

मावळ तालुक्यात खळबळ; झोपेत असलेल्या व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला
3

मावळ तालुक्यात खळबळ; झोपेत असलेल्या व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला

दिवे घाटात हातात कोयते अन् बुलेटस्वारांचा धुडगूस; पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई
4

दिवे घाटात हातात कोयते अन् बुलेटस्वारांचा धुडगूस; पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.