पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) सत्र परीक्षा ऑनलाईन होणार असल्याचे निश्चित झाले आहे. सोमवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेत विद्यापीठाच्या अंतिम परीक्षा ऑनलाईन (Pune University Exam) घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन असा निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे. त्यामुळे येत्या १५ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या परीक्षा आता ऑनलाईन होणार आहेत.