Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dr Shirish Hiremath Death: ४० हजारांहून अधिक अँजिओप्लास्टी करणारे प्रख्यात डॉ. शिरीष हिरेमठ काळाच्या पडद्याआड!

Dr Shirish Hiremath Death: चार दशकांत ४० हजारांहून अधिक अँजिओप्लास्टी करणारे पुण्यातील ज्येष्ठ व प्रथितयश हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शिरीष हिरेमठ यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने वैद्यकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 30, 2026 | 02:54 PM
Dr Shirish Hiremath Death: ४० हजारांहून अधिक अँजिओप्लास्टी करणारे प्रख्यात डॉ. शिरीष हिरेमठ काळाच्या पडद्याआड!

Dr Shirish Hiremath Death: ४० हजारांहून अधिक अँजिओप्लास्टी करणारे प्रख्यात डॉ. शिरीष हिरेमठ काळाच्या पडद्याआड!

Follow Us
Follow Us:
  • पुण्यातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शिरीष हिरेमठ (७५) यांचे निधन
  • चार दशकांच्या कारकिर्दीत ४० हजारांहून अधिक अँजिओप्लास्टी पूर्ण
  • रुबी हॉल क्लिनिकचे माजी संचालक डॉ. हिरेमठ 
Dr Shirish Hiremath Death: कार्डिऑलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष आणि पुण्यातील अत्यंत नावाजलेले ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शिरीष (एम. एस.) हिरेमठ (७५) यांचे गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास सोपान बाग येथील राहत्या घरी निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून ते प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे आणि आजारपणाशी लढा देत होते. त्यांच्या निधनामुळे इंटरव्हेन्शनल कार्डिऑलॉजी क्षेत्रातील एक अत्यंत अनुभवी आणि निष्णात तज्ज्ञ हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

हेही वाचा: Lonavala Station News: तिकीट विचारले म्हणून टीसीवर हल्ला; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल!

चार दशकांची प्रदीर्घ वैद्यकीय कारकीर्द

डॉ. शिरीष हिरेमठ यांनी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस, एमडी आणि त्यानंतर कार्डिऑलॉजीमधील डीएम पदवी प्राप्त केली होती. १९८२ मध्ये पुण्यातील जोशी हॉस्पिटलमधून त्यांच्या वैद्यकीय प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी रुबी हॉल क्लिनिकसह शहरातील विविध अग्रगण्य वैद्यकीय संस्थांमध्ये सेवा दिली. रुबी हॉल क्लिनिकच्या कार्डियाक कॅथलॅबचे संचालक म्हणून त्यांनी दीर्घकाळ महत्त्वाची धुरा सांभाळली. आपल्या चार दशकांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीत त्यांनी तब्बल ४० हजारांहून अधिक अँजिओप्लास्टी आणि एक लाखांपेक्षा अधिक अँजिओग्राफी केल्या होत्या. पुण्यात पहिल्या काही यशस्वी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करणाऱ्या अग्रगण्य डॉक्टरांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते.

हेही वाचा: Pune Crime News: पुण्यात थरार! सारसबागेजवळ बंद कारमधून येत होती दुर्गंधी; दरवाजा उघडताच पोलीस हादरले!

रुग्णसेवा आणि जनजागृतीसाठी सतत कटिबद्ध

केवळ उपचारांपुरते मर्यादित न राहता, हृदयरोगाचे प्रतिबंध, वेळेवर निदान आणि योग्य उपचार पद्धतीबाबत समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांवर तातडीने आणि आधुनिक पद्धतीने उपचार करण्यासाठी त्यांनी ‘फार्माको-इन्व्हेसिव्ह अप्रोच’ (Pharmaco-invasive approach) चा वापर भारतात लोकप्रिय करण्यात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या निधनामुळे वैद्यकीय जगतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या तरुण डॉक्टरांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: डॉ. शिरीष हिरेमठ कोण होते आणि त्यांचे निधन कुठे झाले?

    Ans: ते पुण्यातील एक ज्येष्ठ आणि प्रथितयश हृदयरोगतज्ज्ञ होते, त्यांचे सोपान बाग येथील राहत्या घरी निधन झाले.

  • Que: त्यांनी आपल्या कारकिर्दीत किती अँजिओप्लास्टी केल्या होत्या?

    Ans: त्यांनी आपल्या चार दशकांच्या कारकिर्दीत ४० हजारांहून अधिक अँजिओप्लास्टी आणि एक लाखांहून अधिक अँजिओग्राफी केल्या होत्या.

  • Que: ते कोणत्या प्रमुख पदांवर कार्यरत होते?

    Ans: ते कार्डिऑलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष आणि रुबी हॉल क्लिनिकच्या कार्डियाक कॅथ लॅबचे संचालक होते.

Web Title: Senior cardiologist dr shirish hiremath passes away in pune at 75 sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • Doctor
  • Doctors News
  • Latest pune news update
  • pune news

संबंधित बातम्या

पुणे पोलिस आयुक्तांचा सलग दुसऱ्या दिवशी दणका! आणखी चार पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन; दोन दिवसांत आठ जणांवर कारवाई
1

पुणे पोलिस आयुक्तांचा सलग दुसऱ्या दिवशी दणका! आणखी चार पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन; दोन दिवसांत आठ जणांवर कारवाई

Table Tennis: टेबल टेनिसमध्ये युवा खेळाडूंचा जलवा! आरव, शरण्यासह पाच जणांची विजेतेपदाला गवसणी
2

Table Tennis: टेबल टेनिसमध्ये युवा खेळाडूंचा जलवा! आरव, शरण्यासह पाच जणांची विजेतेपदाला गवसणी

Pune City Water Quota: पुण्याच्या पाणी कोट्याचा फैसला ‘वर्षा’वरच!; पालिकेची १८ टीएमसीची मागणी अन् नियोजन १३ टीएमसीचे
3

Pune City Water Quota: पुण्याच्या पाणी कोट्याचा फैसला ‘वर्षा’वरच!; पालिकेची १८ टीएमसीची मागणी अन् नियोजन १३ टीएमसीचे

‘तुम मेरे हो’च्या प्रमोशनसाठी ईशा मालवीय आणि गुरमीत चौधरी पुण्यात; दगडूशेठ गणपतीचे घेतले दर्शन
4

‘तुम मेरे हो’च्या प्रमोशनसाठी ईशा मालवीय आणि गुरमीत चौधरी पुण्यात; दगडूशेठ गणपतीचे घेतले दर्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.