Shocking It Engineer Girls Beaten Up With Slippers For Walking Around Wearing Shirts In Pune Nrab
धक्कादायक! पुण्यात शॉर्ट्स घालून फिरत असल्यावरून आयटी इंजिनिअर मुलींना चप्पलने मारहाण
32 वर्षीय महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, एकाच कुटूंबातील सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आाला आहे. हा प्रकार 2 मार्च रोजी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
पुणे : पुरोगामी पुण्यात शॉर्ट्स घालून फिरत असल्यावरून आयटी इंजिनिअर तरुणींना चप्पलने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर, घरमालक महिलेला देखील शिवीगाळकरून मारहाण केली आहे. तसेच, त्यांना घर पाडून टाकण्याची धमकी देण्यात आली आहे. याघटनेने प्रचंड खळबळ उडाली असून, पोलीसांनी एका कुटूंबावर गुन्हा दाखल केला आहे. घर मालक महिलेला घर पाडण्याची देखील धमकी देण्यात आली आहे.
याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, एकाच कुटूंबातील सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आाला आहे. हा प्रकार 2 मार्च रोजी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार या खराडीमधील फेज दोनमध्ये अनुसया पार्क लेक्सीस या सोसायटीत राहण्यास आहेत. त्यांच्याकडे तीन मुली या पीजी म्हणून राहतात. तक्रारदारांचे पती मुंबईत असतात. त्यामुळे त्यांनी मुलींना पीजी म्हणून ठेवलेले आहे. या तीनही मुली आयटी इंजिनिअर असून, त्या खराडी येथील एका कंपनीत नोकरी करतात.
दरम्यान,या मुली अधून-मधून शाॊर्ट्स घालतात. तसेच बाहेर पडतात. वास्तविक त्या शाॊर्ट्स घालून बाहेर जातात. त्यावेळी त्या ये-जा करत असल्यावरून या कुटूंबाने तक्रारदार यांना याबाबत जाब विचारला. त्यांनी तो मुलींचा प्रश्न आहे. त्यांनी काय घालावे, असे सांगितले. यावरून कुटूंबातील एका 55 वर्षीय महिलेने रात्री तक्रारदार यांच्या घरात घुसून त्यांना वाईट-वाईट शिवीगाळ केली. तसेच, त्यांना हाताने मारहाण केली. त्यानंतर या आयटी इंजिनिअर मुलींना देखील चप्पलने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर तक्रारदारांनी पोलीसांकडे तक्रार दिली. त्यानुसार पोलीसांनी या कुटूंबावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सोनवणे हे करत आहेत.
Web Title: Shocking it engineer girls beaten up with slippers for walking around wearing shirts in pune nrab