Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुळा–मुठा नदीत कचरा टाकण्याविरोधात एल्गार; कचऱ्याच्या गाड्या अडवून विद्यार्थ्यांचे आंदोलन

पुणे शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या मुळा–मुठा नदी पात्रात बेकायदेशीरपणे टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याविरोधात विद्यार्थ्यांचा संताप पुन्हा एकदा उफाळून आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 14, 2026 | 06:22 PM
मुळा–मुठा नदीत कचरा टाकण्याविरोधात एल्गार; कचऱ्याच्या गाड्या अडवून विद्यार्थ्यांचे आंदोलन

मुळा–मुठा नदीत कचरा टाकण्याविरोधात एल्गार; कचऱ्याच्या गाड्या अडवून विद्यार्थ्यांचे आंदोलन

Follow Us
Follow Us:

कदमवाकवस्ती : पुणे शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या मुळा–मुठा नदी पात्रात बेकायदेशीरपणे टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याविरोधात विद्यार्थ्यांचा संताप पुन्हा एकदा उफाळून आला आहे. लोणी-काळभोर, कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींसह परिसरातील काही गावांकडून दररोज ३५ ते ४० ट्रॅक्टरद्वारे कचरा थेट नदीपात्रात टाकला जात असल्याच्या निषेधार्थ एमआयटी एडीटी विद्यापीठ येथील सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांनी ‘कचरा बंद’ आंदोलन पुन्हा सुरू केले आहे. सात दिवसांची मुदत संपल्यानंतरही कचरा टाकण्याचा प्रकार सुरूच राहिल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कचऱ्याच्या गाड्या अडवून तीव्र आंदोलन छेडले आहे.

 

पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या या प्रकाराविरोधात विद्यार्थ्यांनी गत आठवड्यात, ४ मार्च रोजी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन करत ग्रामपंचायतींच्या कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरांना कॅम्पसमधून नदीपात्राकडे जाण्यास मज्जाव केला होता. त्यावेळी परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने डॉ. राजकुमार शिंदे, पोलिस उपायुक्त (झोन-६, पुणे शहर) यांनी मध्यस्थी करून विद्यार्थ्यांशी चर्चा केली होती. त्यावेळी विद्यार्थ्यांनी संबंधित ग्रामपंचायतींना कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सोडवण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली होती. मात्र, ही मुदत संपूनही नदीपात्रात कचरा टाकण्याचा प्रकार सुरूच राहिल्याने विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलन तीव्र केले आहे.

विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर कचऱ्याच्या गाड्या थांबवत निषेध व्यक्त केला असून, जोपर्यंत नदीपात्रात कचरा टाकणे पूर्णपणे बंद होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा प्रशासनाला दिला आहे. या आंदोलनाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) यांनीही जाहीर पाठिंबा देत विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. स्थानिक ग्रामपंचायती आणि विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, २६ फेब्रुवारी रोजी नदीपात्रात साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांना भीषण आग लागल्याने हा प्रश्न अधिकच गंभीर बनला होता. सलग चार दिवस ही आग धुमसत राहिल्याने परिसरात विषारी धूर पसरला होता. परिणामी विद्यापीठातील सहा ते सात विद्यार्थ्यांना श्वसनाचा त्रास आणि गुदमरल्याची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले होते. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.

या घटनेनंतर प्रशासनानेही या प्रश्नाची दखल घेतली होती. हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने, लोणी-काळभोरचे अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते, तसेच संबंधित ग्रामपंचायतींचे माजी सरपंच आणि ग्रामसेवक यांनी नदीपात्रातील कचऱ्याच्या जागेची पाहणी केली होती. मात्र, या गंभीर प्रश्नावर अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नसल्याने नदीपात्रातील कचऱ्याचा प्रश्न अधिकच जटिल बनला आहे.

विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार दररोज सुमारे ७० टन कचरा थेट नदीपात्रात टाकला जात आहे. या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते, वारंवार आग लागण्याच्या घटना घडतात आणि त्यातून निर्माण होणाऱ्या विषारी धुरामुळे विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे सात दिवसांच्या मुदतीनंतर विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा कचरा वाहतूक रोखण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी घातक

विद्यार्थी दादासाहेब भोसूरे यांनी सांगितले की, नदीपात्रात कचरा टाकणे तातडीने बंद करणे आवश्यक आहे. हा प्रकार विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक असून प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था करावी.

कचरा नदीपात्रात टाकू देणार नाही

विद्यार्थिनी मुग्धा सोनवणे यांनी सांगितले की, दररोज सुमारे ७० टन कचरा नदीत टाकला जात असल्यामुळे दुर्गंधी, धूर आणि प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे आम्ही बाहेरून येणारा कचरा नदीपात्रात टाकू देणार नाही, अशी ठाम भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.

पर्यायी जागेवर तातडीने कचऱ्याची विल्हेवाट लावावी

एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड यांनी सांगितले की, विद्यापीठाने नेहमीच स्थानिक ग्रामपंचायतींना सहकार्याची भूमिका घेतली आहे. मात्र, नदीपात्रात कचरा टाकणे अत्यंत चुकीचे असून त्यामुळे परिसरात जल आणि वायू प्रदूषण प्रचंड वाढले आहे. कचऱ्यामुळे नदीचे अस्तित्व, विद्यार्थ्यांचे आणि परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यापूर्वी स्थानिक ग्रामपंचायतींनी गाव गायरानातील गट क्रमांक २०३१ मधील दोन एकर जागा कचरा प्रकल्पासाठी मिळावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. मात्र, सध्याच्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पुन्हा नदीपात्रातच कचरा टाकण्याची भूमिका घेतल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनी सामंजस्याची भूमिका घेत पर्यायी जागेवर तातडीने कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अशी विनंती त्यांनी केली.

Web Title: Students have expressed anger against the illegal dumping of waste in the mula mutha river basin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 06:22 PM

Topics:  

  • Garbage Issue
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026: राज्यात ऊन-पावसाचा खेळ; ५ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट
1

Maharashtra Breaking News Today 2026: राज्यात ऊन-पावसाचा खेळ; ५ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
2

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
3

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
4

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.