Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BANRF ची जाहिरात अद्याप प्रसिद्ध न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी; ‘बार्टी’ समोर आमरण उपोषणाचा इशारा

BANRF ही अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी दिली जाणारी अधिछात्रवृत्ती आहे, जी २०१३ पासून बार्टीकडून दिली जाते.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 23, 2025 | 02:35 AM
BANRF ची जाहिरात अद्याप प्रसिद्ध न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी; ‘बार्टी’ समोर आमरण उपोषणाचा इशारा
Follow Us
Follow Us:

पुणे:  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (BANRF) २०२३-२३ ची जाहिरात अद्याप प्रसिद्ध न झाल्यामुळे संशोधक विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. संशोधक कृती समितीने सामाजिक न्याय मंत्री आणि महासंचालकांना निवेदन सादर करून आठ दिवसांत जाहिरात प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे; अन्यथा २८ एप्रिल २०२५ पासून बार्टी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

समितीने यापूर्वीही अनेक वेळा निवेदने दिली असून, प्रत्यक्ष भेटीद्वारेही मागणी केली होती. तथापि, अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. समितीने बार्टीवर सामाजिक न्यायाच्या तत्वांना फाटा देत असल्याचा आरोप केला आहे. BANRF ही अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी दिली जाणारी अधिछात्रवृत्ती आहे, जी २०१३ पासून बार्टीकडून दिली जाते.

संशोधक कृती समितीने बार्टीकडून लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्याची मागणी केली असून, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. नालंदा वाकोडे, प्रवीण हिवराळे, संदेश धाडसे, ऋषी कांबळे, निलेश भगवंत आदी यावेळी उपस्थित होते.

जन सुरक्षा विधेयक रद्द करण्याची मागणी

महाराष्ट्र शासनाने जन सुरक्षा विधेयकाचा मसुदा जाहीर करून त्याचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी प्रक्रियेची सुरुवात केली आहे. सदर जन सुरक्षा विधेयक हे सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या प्रत्येक पक्ष, संघटना आणि व्यक्तीची गळचेपी करणारे आहे. त्यामुळे हे विधेयक रद्द करावे अशी मागणी करीत, मंगळवारी महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक विरोधी कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन केले.

या आंदोलनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (ठाकरे गट) भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, जनता दल (सेक्युलर) समाजवादी पार्टी, बी. आर. एस.पी., शेतकरी कामागार पक्ष, आम आदमी पार्टी, लाल निशाण पक्ष आदी समविचारी पक्ष, संस्था व संघटना सहभागी झाल्या होत्या. यावेळी या विधेयकाला प्रशांत जगताप, अजित अभ्यंकर, मारुती भापकर, विजय कुंभार, सुभाष वारे आदींनी आपल्या भाषणातून तीव्र विरोध केला. आंदोलनानंतर हे विधेयक मागे घेण्याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

“… त्यामुळे ‘हे’ विधेयक रद्द करावे”; कृती समितीकडून पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन

या विधेयकाचे नियम तयार करण्यात आले असले तरी, प्रस्तावित नियम सार्वजनिक केलेले नाहीत. त्यामुळे प्रस्तावित कायद्याच्या अंमलबजावणी विषयी प्रश्न उपस्थित होतात. थोडक्यात हे विधेयक मुळातच असंविधानिक, अतीविस्तृत, अनियंत्रित असुन, त्याचा गैरवापर होण्याचीच शक्यता जास्त आहे. सामान्य नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे हे विधेयक असून ते संविधानिक तत्वांची पायमल्ली करणारे आहे. त्यामुळे हे विधेयक रद्द करावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी आपल्या भाषणातून केली.

Web Title: Students threaten to hunger strike if barty scholarship advertisement is not published within 8 days pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • dr babasaheb amdekar
  • Pune
  • pune news
  • Student

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.