Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Supriya Sule : पुण्यातील ‘या’ भागातील रस्त्यांची दुरावस्था; प्रशासनाच्या कारभारावर सुप्रिया सुळेंचा सवाल

माण, म्हाळुंगे, बालेवाडी, हिंजवडी तसेच राजीव गांधी इन्फोटेक पार्क परिसरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था चिंताजनक असल्याचे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 05, 2026 | 03:06 PM
पुण्यातील 'या' भागातील रस्त्यांची दुरावस्था; प्रशासनाच्या कारभारावर सुप्रिया सुळेंचा सवाल

पुण्यातील 'या' भागातील रस्त्यांची दुरावस्था; प्रशासनाच्या कारभारावर सुप्रिया सुळेंचा सवाल

Follow Us
Follow Us:
  • खड्ड्यांमुळे रस्ते बनले मृत्यूचे सापळे
  • प्रशासनाच्या कारभारावर सुप्रिया सुळेंचा सवाल
  • रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी
पिंपरी : माण, म्हाळुंगे, बालेवाडी, हिंजवडी तसेच राजीव गांधी इन्फोटेक पार्क परिसरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था चिंताजनक असल्याचे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खराब रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे गेल्या महिनाभरात दोन निष्पाप नागरिकांचा जीव गेल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

बालेवाडी-म्हाळुंगे रस्त्यावर दुचाकीवरून पडून २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तसेच म्हाळुंगे येथील गोदरेज हिल साईड-२ समोर वाहन घसरल्याने एका दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या दोन्ही घटना अत्यंत दुःखद असून, निष्पाप नागरिकांना खराब रस्त्यांमुळे जीव गमवावा लागणे ही गंभीर बाब असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राजीव गांधी इन्फोटेक पार्कसारख्या महत्त्वाच्या आणि जागतिक दर्जाच्या परिसरातील पायाभूत सुविधांसाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विशेष बैठक घेऊन ‘सिंगल पॉईंट अथॉरिटी’ची घोषणा केली होती. मात्र, या प्राधिकरणाने गेल्या वर्षभरात नेमके काय काम केले, असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला आहे. वर्षभरात रस्त्यांची साधी डागडुजी किंवा खड्डे बुजविण्याचे कामही प्रशासनाला करता आले नाही, ही अत्यंत नामुष्कीची बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा : मंडळ कितीही मोठे असो, कर्णकर्कश डिजे वाजवलात तर…; पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांचा इशारा

‘इन्फ्रास्ट्रक्चर’ आणि विकासाच्या मोठ्या घोषणा होत असताना प्रत्यक्षात नागरिकांना खराब रस्त्यांमुळे जीव गमवावा लागत असेल, तर हे प्रशासकीय अपयश आणि दुर्लक्ष अक्षम्य आहे, अशी टीकाही त्यांनी केली. या परिसरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, ‘सिंगल पॉईंट अथॉरिटी’ने आतापर्यंत केलेल्या कामाचा आणि खर्च झालेल्या निधीचा संपूर्ण लेखाजोखा जनतेसमोर मांडावा, अशी मागणी सुळे यांनी केली आहे.

“दर्जेदार रस्ते हा नागरिकांचा हक्क आहे. रस्ता हा मृत्यूचा सापळा बनता कामा नये. प्रशासनाने युद्धपातळीवर काम करून हे रस्ते सुरक्षित आणि प्रवासासाठी सुसह्य करावेत,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा : ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल

Web Title: Supriya sule has criticized the administration regarding the poor condition of roads in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • MP Sharad pawar
  • MP Supriya Sule

संबंधित बातम्या

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?
1

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल
2

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल

पानटपरीवाल्याकडून 300 रुपये हप्ता, सिगारेटची पाकीटेही घेतली; खराडीतील पोलीस तडकाफडकी निलंबित
3

पानटपरीवाल्याकडून 300 रुपये हप्ता, सिगारेटची पाकीटेही घेतली; खराडीतील पोलीस तडकाफडकी निलंबित

दिल्लीला गेला अन् जाळ्यात अडकला; समृद्धीवरील कार लूटप्रकरणाच्या सूत्रधारासह पाच जण जेरबंद
4

दिल्लीला गेला अन् जाळ्यात अडकला; समृद्धीवरील कार लूटप्रकरणाच्या सूत्रधारासह पाच जण जेरबंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.