
Ten accused in Dhamane village triple murder case in life imprisonment Pune Crime
सन २०१७ मध्ये घडलेल्या या घटनेत अहिल्यानगर जिल्ह्यातील फासे पारधी टोळीतील ११ आरोपींनी दरोड्याच्या वेळी फाले कुटुंबातील तिघांची हत्या केली होती. याप्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर १४५/२०१७ अन्वये भादंवि कलम ३९५, ३९६, ३९७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक मुगुट भानुदास पाटील यांनी अत्यंत बारकाईने तपास करून आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र सादर केले होते.
हे देखील वाचा : सिगारेट देण्यास नकार दिल्याने तरुणाने दुचाकीच पेटवली; दुकानाचेही झाले नुकसान
या प्रकरणाची सुनावणी सेशन केस नं. २८८/२०२२ अन्वये मा. डी. के. अनभुले (जिल्हा व सत्र न्यायालय, वडगाव मावळ, पुणे) यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने आरोपी नागेश उर्फ नाग्या भोसले, छोट्या उर्फ बापू काळे, बाब्या उर्फ भेन्या चव्हाण, सेवन उर्फ डेंग्या प्याव लाभ, दिलीप पांडू चव्हाण, सुपार उर्फ सुपर्या चव्हाण, राजू तुकाराम शिंगाड, अजय शिवाजी पवार, योगेश बिरजू भोसले आणि दीपक बिरजू भोसले (जमिनावर) यांना दोषी ठरवून एकत्रितरित्या जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
एक आरोपी प्रकरणातून वगळण्यात आला.या खटल्यात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून ॲड. स्मिता चौगले यांनी प्रभावी युक्तिवाद केला. एसीपी म्हाळुंगे विभागाचे श्री. सचिन तुकाराम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली. सध्या तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कन्हैया थोरात कार्यरत आहेत.
हे देखील वाचा :अजित पवारांकडून पुणे, पिंपरी निसटणार? ‘डिझाईन बॉक्स’कंपनीवर छापेमारी
या प्रकरणाच्या निकालामध्ये कोर्ट पैरवी अधिकारी एएसआय बाळासाहेब देवजी गवारी, पोलीस अंमलदार अविनाश हरी गोरे (३०४४) व महिला पोलीस अंमलदार राजेश्वरी सदगीर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच समन्स व वॉरंट अंमलदार म्हणून पोलीस अंमलदार बाळासाहेब पवार, पोलीस हवालदार बाळासाहेब कांबळे व एएसआय वाघ यांनी काम पाहिले. मुद्देमाल कारकून म्हणून एएसआय शिंदे यांनी जबाबदारी पार पाडली. या निकालामुळे फाले कुटुंबाला न्याय मिळाला असून, गंभीर गुन्ह्यांमध्ये कठोर शिक्षा होऊ शकते, हा समाजाला दिलेला संदेश असल्याची भावना व्यक्त होत आहे.