Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच, नियमांचे उल्लंघन करणारे डीजे जप्त करणार; बारामती तालुका पोलिसांचा इशारा

यंदाचा गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडावा, यासाठी बारामती तालुका पोलिसांनी नागरिक, गणेश मंडळे आणि कार्यकर्त्यांना विविध सूचना दिल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणारे डीजे वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचाही इशारा दिला आहे

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 08, 2026 | 04:34 PM
तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच, नियमांचे उल्लंघन करणारे डीजे जप्त करणार; बारामती तालुका पोलिसांचा इशारा

तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच, नियमांचे उल्लंघन करणारे डीजे जप्त करणार; बारामती तालुका पोलिसांचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच
  • नियमांचे उल्लंघन करणारे डीजे जप्त करणार
  • बारामती तालुका पोलिसांचा इशारा
बारामती : यंदाचा गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडावा, यासाठी बारामती तालुका पोलिसांनी नागरिक, गणेश मंडळे आणि कार्यकर्त्यांना विविध सूचना दिल्या आहेत. गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी केले.

 

गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेच्या दिवशी धार्मिक विधी आणि कार्यक्रम शांततेत तसेच शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावेत. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. कोणत्याही समाजाच्या भावना दुखावतील किंवा शांतता भंग होईल, असे कार्यक्रम आयोजित करू नयेत. तसेच पोस्टर, सामाजिक माध्यमे किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून आक्षेपार्ह मजकूर, छायाचित्रे अथवा व्हिडिओ प्रसारित करू नयेत, अशा स्पष्ट सूचना पोलिस निरीक्षक पवार यांनी दिल्या.

डीजे वापरणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान वेळेचे बंधन काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. तसेच डीजेचा वापर करू नये, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डीजे चालकांसह संबंधितांवर प्रचलित कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.नियमांचे उल्लंघन करणारे डीजे जप्त करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी तसेच डीजे चालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून नियमबाह्य ध्वनिवर्धकांचा वापर टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पारंपरिक वाद्यांना प्राधान्य

गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत पारंपरिक वाद्ये, बँजो किंवा नियमानुसार परवानगी असलेल्या ध्वनिवर्धक यंत्रणेचा वापर करावा. मिरवणुकीदरम्यान ध्वनीची मर्यादा, वेळ आणि इतर प्रशासकीय नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.

हे सुद्धा वाचा : जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

विसर्जनावेळी सुरक्षेची काळजी घ्या

गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. पोहता येत नसलेल्या व्यक्तींनी पाण्यात उतरू नये, तसेच लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेकडे मंडळांनी व कुटुंबीयांनी विशेष लक्ष द्यावे.विसर्जन मिरवणुकीत वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉली, विद्युत रोषणाई, सजावट आणि इतर साहित्यामुळे कोणताही अपघात होणार नाही, याची गणेश मंडळांनी दक्षता घ्यावी. विसर्जन घाटावरही सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.गणेशोत्सव हा आनंद, भक्ती आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव असल्याने सर्वांनी कायदा व सुव्यवस्थेचे भान ठेवून उत्सव साजरा करावा. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी नागरिकांनी बारामती तालुका पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा : गांजा ओढणाऱ्यांनी रेल्वे पोलिसाचा चाकूने गळा चिरला, छातीवरही सापसप वार; पुण्यातील खळबळजनक घटना

Web Title: The baramati taluka police have issued important instructions to the ganesh mandals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 04:34 PM

Topics:  

  • baramati
  • DJ Speaker
  • ganesh utsav

संबंधित बातम्या

दहीहंडीतील ‘डीजे’च्या दणदणाटावर पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दणका; तब्बल 16 गुन्हे दाखल, डीजे साहित्यही जप्त
1

दहीहंडीतील ‘डीजे’च्या दणदणाटावर पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दणका; तब्बल 16 गुन्हे दाखल, डीजे साहित्यही जप्त

‘हर हर महादेव’च्या गजराने सोमेश्वरनगरी दुमदुमली; दीड लाख भाविकांनी घेतले दर्शन
2

‘हर हर महादेव’च्या गजराने सोमेश्वरनगरी दुमदुमली; दीड लाख भाविकांनी घेतले दर्शन

पुणे शहरात वर्षभर डीजेचा दणदणाटच! 8 महिन्यात 14 हजार 392 तक्रारी; तब्बल ‘इतक्या’ गुन्ह्यांची नोंद
3

पुणे शहरात वर्षभर डीजेचा दणदणाटच! 8 महिन्यात 14 हजार 392 तक्रारी; तब्बल ‘इतक्या’ गुन्ह्यांची नोंद

DJ Ban Controversy : ‘राज ठाकरेंच्या डोक्याचा खोका खाली आहे का?’; DJ बंदीवरून गुणरत्न सदावर्तेंचा घणाघाती हल्ला
4

DJ Ban Controversy : ‘राज ठाकरेंच्या डोक्याचा खोका खाली आहे का?’; DJ बंदीवरून गुणरत्न सदावर्तेंचा घणाघाती हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.