Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवैध दारूविक्री विरोधात कठोर कारवाई करा; राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश

२३ जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यभरातील अवैध दारू विक्री आणि निर्मिती केंद्रांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 01, 2026 | 01:43 PM
अवैध दारूविक्री विरोधात कठोर कारवाई करा; राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश

अवैध दारूविक्री विरोधात कठोर कारवाई करा; राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारू प्रकरणात २३ जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग खडबडून जागा झाला असून, राज्यभरातील अवैध दारू विक्री आणि निर्मिती केंद्रांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. डॉ. देशमुख यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील सर्व उत्पादन शुल्क अधीक्षकांची बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला. ज्या ठिकाणी अवैध मद्यविक्री, निर्मिती किंवा तस्करीची माहिती मिळेल, त्या ठिकाणी तात्काळ छापेमारी करून कठोर कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश यावेळी त्यांनी दिले.

 

अवैध दारू अड्ड्यांवर विशेष लक्ष ठेवण्यासोबतच नियमित तपास मोहीम राबविण्याचे आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई सुनिश्चित करण्याचे आदेशही त्यांनी दिले. विषारी दारू प्रकरणानंतर राज्य सरकार आणि उत्पादन शुल्क विभागावर टीकेची झोड उठत असून, त्यानंतर विभागाने कारवाईचा वेग वाढविला आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारू प्राशनामुळे आतापर्यंत २३ जणांचा मृत्यू झाला असून, अनेकांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर प्रशासन आणि पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविण्यात आला असून, तपासासाठी पाच विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. ही पथके विषारी दारूची पुरवठा साखळी, निर्मिती आणि वितरणाशी संबंधित सर्व बाबींची चौकशी करणार आहेत.

४२ अवैध दारूअड्ड्यांची माहिती समोर

हडपसर परिसरातील अवैध दारू भट्ट्यांवर शिवसेनेने केलेल्या कारवाईनंतर शहरभरातून नागरिक मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री आणि बनावट दारू निर्मिती केंद्रांची माहिती देत आहेत. शिवसेनेच्या माहितीनुसार, पुणे शहरातील तब्बल ४२ अवैध दारू अड्ड्यांची माहिती समोर आली आहे. शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी आरोप केला की, हडपसरमधील नऊ अवैध दारू भट्ट्या उद्ध्वस्त झाल्यानंतर नागरिक स्वतः पुढे येऊन माहिती देत आहेत; मात्र पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला हे अड्डे दिसत नाहीत. या दारू माफियांना नेमके कोणाचे संरक्षण आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

पुरवठा साखळीचाही तपास व्हावा

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, अशा घटना घडल्यानंतर प्रत्येक वेळी विधानसभेत आणि विधान परिषदेत चर्चा होते; मात्र या घटनांची पुनरावृत्ती थांबवण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. हे केवळ अवैध हातभट्टी दारूचे प्रकरण नसून, मिथेनॉलसारख्या घातक रसायनांचा पुरवठा नेमका कुठून झाला, याची संपूर्ण साखळी शोधली गेली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. रासायनिक तपासणी अहवाल तातडीने जाहीर करून सक्षम सरकारी वकिलाची नियुक्ती करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

हे सुद्धा वाचा : बैलजोडी अन् श्वानासह उभारले वडिलांचे देखणे स्मारक; रमेश बुदगुडे यांच्या पितृप्रेमाची राज्यभर चर्चा

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना केवळ निलंबित करण्याऐवजी त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अहिर म्हणाले की, गेल्या महिन्यात फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्राशनामुळे तिघांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी पोलिसांनी गांभीर्याने कारवाई केली असती, तर एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली नसती. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना अधिक भीषण स्वरूपात गेल्याचा आरोपही त्यांनी केला.

Web Title: The commissioner of the state excise department has issued instructions to the officers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 01:42 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
1

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!
2

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर
3

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय
4

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.