Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाड मार्गावर जीवघेणा धोका, कोंढरी पुलाजवळील रस्त्याला तडे; प्रशासनाच्या गलथान कारभारावर संताप

पंढरपूर-महाड या महत्त्वाच्या राज्य मार्गावरील भोर तालुक्यातील कोंढरी पुलाजवळील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्याला मोठमोठे तडे गेल्याने हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 20, 2026 | 03:22 PM
महाड मार्गावर जीवघेणा धोका, कोंढरी पुलाजवळील रस्त्याला तडे; प्रशासनाच्या गलथान कारभारावर संताप

महाड मार्गावर जीवघेणा धोका, कोंढरी पुलाजवळील रस्त्याला तडे; प्रशासनाच्या गलथान कारभारावर संताप

Follow Us
Follow Us:
  • महाड मार्गावर जीवघेणा धोका
  • कोंढरी पुलाजवळील रस्त्याला तडे
  • प्रशासनाच्या गलथान कारभारावर संताप
भोर : पंढरपूर-महाड या महत्त्वाच्या राज्य मार्गावरील भोर तालुक्यातील कोंढरी पुलाजवळील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्याला मोठमोठे तडे गेल्याने हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला असून, येथे कधीही मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कामाच्या गुणवत्तेबाबत आधीच उपस्थित केलेल्या आक्षेपांकडे प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे आज प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.

 

​कोंढरी पुलाजवळ रस्त्याला गेलेले तडे दिवसेंदिवस रुंदावत आहेत. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ असते. रस्त्याच्या कडेला संरक्षण कठडे नसल्यामुळे, वाहनचालकाचे थोडेही नियंत्रण सुटल्यास वाहन थेट पुलाखाली किंवा खोल दरीत कोसळण्याची दाट शक्यता आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, पावसाळ्याच्या दिवसात ही परिस्थिती अधिकच भयावह होत असून, कधीही वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊ शकते.

​स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा या रस्त्याचे काम सुरू होते, तेव्हाच काही सामाजिक संघटनांनी रस्त्याच्या कामाच्या कनिष्ठ गुणवत्तेबाबत प्रशासनाकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्या तक्रारींना केराची टोपली दाखवत प्रशासनाने डोळेझाक केली. आज त्याच कामाच्या निकृष्ट दर्जामुळे प्रवाशांना जीवघेण्या संकटाचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून रस्त्यातील तडे भरून काढावेत. वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना तातडीने मजबूत ‘गार्ड रेल’ उभारावेत. कामाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्यात यावी. सध्या या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन- चालकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन स्थानिक नागरिक करत आहेत. आता प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देते की, पुन्हा एकदा नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूच राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हे सुद्धा वाचा : कोट्यवधींच्या व्हीएमडी स्क्रीन धूळ खात, देखभालीसाठी निधीच नाही; महापालिका प्रशासनाची कबुली

” रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. संरक्षण कठडे नसल्यानें रात्रीच्या वेळी प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालने आहे. प्रशासनाने मोठ्या अपघाताची वाट न पहाता त्वरीत पावले उचलावीत.” – स्थानिक वाहनचालक भोर.

हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवड महापालिकेत आता 10 क्षेत्रीय कार्यालये; 30 स्वीकृत सदस्यपदांसाठी भाजपमध्ये चुरस

Web Title: The condition of the road near the kondhari bridge in bhor taluka has deteriorated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 03:22 PM

Topics:  

  • Bhor Taluka
  • Cmomaharasahtra
  • maharashtra

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
1

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
3

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
4

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.