Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चाकणच्या वाहतूक कोंडीवर ‘ॲक्शन प्लॅन’, 31 ऑगस्टची डेडलाइन; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

चाकण औद्योगिक परिसरातील तीव्र वाहतूक कोंडी, खड्डेमय रस्ते, वाढती अतिक्रमणे, अनधिकृत पार्किंग आणि ड्रेनेजच्या समस्यांवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता ठोस उपाययोजनांची मोहीम हाती घेतली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 30, 2026 | 02:13 PM
चाकणच्या वाहतूक कोंडीवर ‘ॲक्शन प्लॅन’, 31 ऑगस्टची डेडलाइन; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले 'हे' महत्वाचे निर्देश

चाकणच्या वाहतूक कोंडीवर ‘ॲक्शन प्लॅन’, 31 ऑगस्टची डेडलाइन; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले 'हे' महत्वाचे निर्देश

Follow Us
Follow Us:

चाकण : चाकण औद्योगिक परिसरातील तीव्र वाहतूक कोंडी, खड्डेमय रस्ते, वाढती अतिक्रमणे, अनधिकृत पार्किंग आणि ड्रेनेजच्या समस्यांवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता ठोस उपाययोजनांची मोहीम हाती घेतली आहे. वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे तातडीने हटवावीत आणि त्या जागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून लगेच रस्ता, ड्रेनेज किंवा आवश्यक पायाभूत सुविधांची कामे सुरू करावीत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.

चाकण परिसरातील वाहतूक व पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उच्चस्तरीय समितीची विशेष बैठक पार पडली. यावेळी आमदार बाबाजी काळे, पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्यासह पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था व विविध संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

३१ ऑगस्टपर्यंत तातडीची कामे पूर्ण करा

चाकण परिसरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, रस्त्यांच्या साईडपट्ट्या दुरुस्त करणे, साचलेला गाळ व कचरा हटविणे ही अत्यावश्यक कामे येत्या ३१ ऑगस्टपर्यंत युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. १ सप्टेंबरपासून पुढील टप्प्यातील विकासकामांना गती देता यावी, यासाठी तातडीच्या कामांचा स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले आहे.

रस्त्यांच्या कामांसाठी २४ तास वाहतूक वळवणार

रस्त्याचे काम सुरू असताना चालू वाहतुकीमुळे कामाचा दर्जा आणि वेग बाधित होतो. त्यामुळे योग्य पूर्वनियोजन करून आवश्यकतेनुसार २४ तास पर्यायी मार्गांनी वाहतूक वळवून रस्ते दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना देण्यात आल्या. काम पूर्ण होताच रस्ता तत्काळ वाहतुकीसाठी खुला करावा आणि पीएमआरडीए व इतर यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करून नागरिकांची गैरसोय टाळावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले. चाकणमधील अवजड वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपलब्ध अधिकृत जागांचा नकाशा तयार करून तो उद्योजक, चालक आणि वाहतूकदारांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. ट्रान्सपोर्ट विभाग व ट्रान्सपोर्ट असोसिएशनसोबत बैठक घेऊन मालवाहू वाहने, रिक्षा आणि इतर प्रवासी वाहनांच्या हालचालींचा अभ्यास करून एकात्मिक वाहतूक आराखड्यात त्याचा समावेश केला जाईल.

हे सुद्धा वाचा : मावळच्या एसटी सेवेला ‘जिजाऊ’ची साथ, पाच नव्या स्मार्ट बसेसचे लोकार्पण; आगारातील बसेसची संख्या तब्बल…

अतिक्रमणे हटवून जागांचा तत्काळ विकास

केवळ अतिक्रमणे हटवून न थांबता, त्या मोकळ्या झालेल्या जागांवर पुन्हा कब्जा होणार नाही याची दक्षता घेण्याचे स्पष्ट करण्यात आले. त्या ठिकाणी लगेच पदपथ, रस्ता रुंदीकरण अथवा ड्रेनेजची कामे हाती घेण्यात येतील. नैसर्गिक नाले आणि ड्रेनेजमधील अडथळे एका महिन्याच्या आत दूर करण्याचे आदेशही संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. चाकण परिसरातील सर्व रस्ते, ड्रेनेज व्यवस्था आणि पार्किंग व्यवस्थेचे सर्वंकष तांत्रिक सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भविष्यात वारंवार रस्ते खोदावे लागू नयेत, यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रित नियोजन करावे, असा निर्णय घेण्यात आला. बैठकीत स्थानिक नागरिकांनी मांडलेल्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन त्यावर कालबद्ध कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

Web Title: The district collector has issued important directives to officials to resolve the traffic congestion in chakan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • Chakan News
  • CM Devedra Fadnavis
  • Jitendra Dudi

संबंधित बातम्या

तळेगावजवळ उभारणार नवीन MIDC! तब्बल 1100 एकर क्षेत्राचा प्रस्ताव; दरनिश्चितीनंतर…
1

तळेगावजवळ उभारणार नवीन MIDC! तब्बल 1100 एकर क्षेत्राचा प्रस्ताव; दरनिश्चितीनंतर…

जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार, लासूर स्टेशनमध्ये थरार; नेमकं काय घडलं?
2

जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार, लासूर स्टेशनमध्ये थरार; नेमकं काय घडलं?

अण्णासाहेब पाटील महामंडळाची फसवणूक, तब्बल दहा लाखांना घातला गंडा; सहा जणांवर गुन्हा दाखल
3

अण्णासाहेब पाटील महामंडळाची फसवणूक, तब्बल दहा लाखांना घातला गंडा; सहा जणांवर गुन्हा दाखल

तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग; कामे दोन दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन
4

तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग; कामे दोन दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.