संग्रहित फोटो
राजाभाऊ ऊर्फ राजू खेमू राठोड (वय ४४, रा. लेन क्रमांक ४, आर्वी गाव, साई रोड, जि. लातूर; मूळ रा. एकंबी तांडा, ता. औसा, जि. लातूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक उत्तम भजनावळे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) शितल जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनिकेत पोटे व त्यांच्या पथकाने केली आहे.
गेल्या महिन्यात (दि. २० ऑक्टोबर २०२६) सकाळी नऊच्या सुमारास तक्रारदार पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या आरोपीने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले होते. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सलग दहा दिवस औंध, पाषाण, बाणेर, बावधन, कोथरूड, सुस, लवळे, धायरी, नानापेठ आणि हडपसर परिसरातील २५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यातून आरोपीचा माग काढला. त्यानंतर पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसर परिसरातून पाठलाग करून आरोपीला पकडण्यात आले. तपासादरम्यान आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि जबरी चोरी करून हिसकावलेला मुद्देमाल जप्त केला.
हे सुद्धा वाचा : आढावा बैठकीला गैरहजर, कामकाजही प्रलंबित; दोन सह दुय्यम निबंधकांना कारणे दाखवा नोटीस
७० हून अधिक गुन्ह्यांची नोंद
अटक केलेला आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, लातूर, नाशिक आणि सातारा या ठिकाणी जबरी चोरीचे ७० हून अधिक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक अनिकेत पोते करीत आहेत.
Ans: राजाभाऊ ऊर्फ राजू खेमू राठोड (वय ४४, रा. आर्वी गाव, जि. लातूर) याला अटक करण्यात आली आहे. तो पायी जाणाऱ्या नागरिकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पसार होणारा सराईत चोरटा आहे.
Ans: पोलिसांनी १० दिवस सलग औंध, पाषाण, बाणेर, बावधन, कोथरूड, सुस, लवळे, धायरी, नानापेठ आणि हडपसर परिसरातील २५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यानंतर पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसर परिसरात पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
Ans: आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व चोरीचा मुद्देमाल असा एकूण ३ लाख ९३ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, लातूर, नाशिक आणि सातारा येथे जबरी चोरीचे ७० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.






