Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठी चित्रपट महामंडळासाठी ‘या’ तारखेला होणार मतदान; निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यकारी मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, येत्या ७ जून रोजी मतदान होणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 20, 2026 | 12:30 AM
मराठी चित्रपट महामंडळासाठी 'या' तारखेला होणार मतदान; निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

मराठी चित्रपट महामंडळासाठी 'या' तारखेला होणार मतदान; निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

Follow Us
Follow Us:

पुणे/गायत्री पवळे : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यकारी मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, येत्या ७ जून रोजी मतदान होणार आहे. महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी पुणे, मुंबई आणि कोल्हापूर येथे मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, कोल्हापूर विभागाच्या देखरेखीखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रागिणी खडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीच्या निवडणूक प्रक्रियेसंदर्भात न्यायालयीन आदेश आणि अंतिम सभासद यादीच्या पार्श्वभूमीवर सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

 

१७ मे पासून अर्ज भरण्यास सुरुवात

जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार १७ मे ते २२ मे दरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्जांची छाननी २५ मे रोजी होईल, तर वैध उमेदवारांची यादी त्याच दिवशी प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २७ ते २८ मे अशी ठेवण्यात आली असून, २९ मे रोजी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. आवश्यक असल्यास ७ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर ८ जून रोजी कोल्हापुरात मतमोजणी होणार असून, मतमोजणीनंतर लगेच निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

आठ वर्षानंतर ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये कसलाही अडथळा न येता ही निवडणूक चांगल्या पद्धतीत पार पडावी हीच विनंती. – मिलिंद अष्टेकर.

महामंडळाच्या कार्यकारी मंडळात निर्माता, दिग्दर्शक, लेखक-पटकथाकार, अभिनेते, तंत्रज्ञ, संगीत क्षेत्रातील प्रतिनिधी, स्टुडिओ व प्रयोगशाळा प्रतिनिधी, वितरक तसेच चित्रपट व्यवसायाशी संबंधित विविध घटकांचे प्रतिनिधित्व असणार आहे. निवडणुकीसाठी उमेदवारांना स्वतः उपस्थित राहून अर्ज दाखल करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच निवडणूक अनामत रक्कम पाच हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. महामंडळाच्या निवडणुकीकडे मराठी चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले असून, आगामी काळात प्रचाराला वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सुधारित निवडणूक कार्यक्रमामुळे प्रलंबित प्रक्रियेला गती मिळणे ही स्वागतार्ह बाब आहे. सर्वोच्च न्यायालय आणि धर्मादाय आयुक्तांच्या निर्देशानुसार ही निवडणूक पारदर्शक आणि लोकशाही मार्गाने व्हावी, हीच चित्रपट क्षेत्राची अपेक्षा आहे. सर्व विभागांना प्रतिनिधित्व मिळणे सकारात्मक असले, तरी केवळ औपचारिकता नको तर चित्रपटसृष्टीच्या प्रश्नांची जाण असलेले सक्षम नेतृत्व निवडून येणे गरजेचे आहे. महामंडळाच्या माध्यमातून भविष्यात कलाकार व तंत्रज्ञांच्या हितासाठी ठोस धोरणे राबवली जावीत. म्हणूनच, सर्व वैध सभासदांनी मोठ्या संख्येने मतदानात सहभागी होऊन सर्वसमावेशक नेतृत्वाला कौल द्यावा, असे आवाहन मी करतो. -बाबासाहेब पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग.

हे सुद्धा वाचा : शाहू कलामंदिर की ठेकेदारांचा अड्डा? लाखो खर्चूनही सुविधा गायब? मनुष्यबळ व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह

Web Title: The election schedule for the marathi film corporation has been announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Election News
  • entertainment
  • maharashtra

संबंधित बातम्या

Nana Patekar: नाना पाटेकर यांच्या निधनानंतर २००८चं प्रकरण पुन्हा चर्चेत; जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं
1

Nana Patekar: नाना पाटेकर यांच्या निधनानंतर २००८चं प्रकरण पुन्हा चर्चेत; जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं

Nana Patekar Passed Away: मैत्रीला सलाम! अशोक सराफ यांचा जीव वाचवण्यासाठी धावले होते नाना पाटेकर, जाणून घ्या रंजक किस्सा
2

Nana Patekar Passed Away: मैत्रीला सलाम! अशोक सराफ यांचा जीव वाचवण्यासाठी धावले होते नाना पाटेकर, जाणून घ्या रंजक किस्सा

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या पत्नी कोण आहेत? घटस्फोट न घेता ३५ वर्षे का राहतात वेगळे? अभिनेत्याने स्वतःच सांगितले होते कारण
3

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या पत्नी कोण आहेत? घटस्फोट न घेता ३५ वर्षे का राहतात वेगळे? अभिनेत्याने स्वतःच सांगितले होते कारण

Nana Patekar: १.५ कोटींची लक्झरी कार सोडून नाना पाटेकरांनी शेतकरी कुटुंबासाठी उचलले होते मोठे पाऊल
4

Nana Patekar: १.५ कोटींची लक्झरी कार सोडून नाना पाटेकरांनी शेतकरी कुटुंबासाठी उचलले होते मोठे पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.