Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सलग पावसामुळे पुरंदर तालुका जलमय; सासवडला पाणीपुरवठा करणारे गराडे धरण 100 टक्के भरले

पुरंदर तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसापासून सलग पाऊस सुरू असून यामुळे पुरंदर तालुक्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. दरम्यान सासवडला पाणी पुरवठा करणारे पश्चिम भागातील गराडे धरण पूर्ण भरले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 07, 2026 | 04:52 PM
सलग पावसामुळे पुरंदर तालुका जलमय; सासवडला पाणीपुरवठा करणारे गराडे धरण 100 टक्के भरले

सलग पावसामुळे पुरंदर तालुका जलमय; सासवडला पाणीपुरवठा करणारे गराडे धरण 100 टक्के भरले

Follow Us
Follow Us:

सासवड/संभाजी महामुनी : पुरंदर तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसापासून सलग पाऊस सुरू असून यामुळे पुरंदर तालुक्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. दरम्यान सासवडला पाणी पुरवठा करणारे पश्चिम भागातील गराडे धरण पूर्ण भरले असून, इतर धरणांच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली आहे. परिणामी सासवडच्या पाण्याचा प्रश्न आता मिटण्यास मोठी मदत झाली आहे.

 

यंदाच्या पावसाळ्यातील जून महिना जवळपास कोरडाच गेला आहे. पुरंदर तालुक्यातील बहुतेक भाग अद्यापही पावसापासून वंचित असल्याने जोरदार सर्वत्र चिंतेचे वातावरण होते. तालुक्यातील सर्व धरणे, विहिरी, ओढे, नाले अद्यापही कोरडेच असून शेतातील कामेही सुरु झालेली नव्हती. तर काही तासांच्या अंतरावर संतांचे पालखी सोहळे सरू होत असल्याने वारीला जायचे की पेरणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत थांबायचे ? अशा चिंतेत बळीराजा सापडला होता.

८ जून रोजी मृग नक्षत्र सुरु झाले. बेडूक त्याचे वाहन होते, मात्र बेडकाची कोठेही ढराव ढराव ऐकायला मिळाली नाही. संपूर्ण नक्षत्र कोरडेच गेले. त्यानंतर २२ जून रोजी आर्द्रा नक्षत्र सुरु झाले, या नक्षत्राचे वाहन गाढव असून २ ते ५ जुलै दरम्यान पाऊस सांगितला आहे. त्यानुसार पावसास सुरुवातही झाली. मात्र पडणारा पाऊस हलक्या प्रमाणात असल्याने तालुक्यातील बहुतेक भाग मोठ्या पावसापासून वंचित होता. कामे ही ठप्पच होती. मात्र नक्षत्र संपायला काही अवधी असतानाच आर्द्रा नक्षत्राने कमाल केली. सर्वत्र जोरदार मुसंडी मारत पाणीच पाणी केले. आठवड्यातील शेवटच्या दोन, तीन दिवस सलग पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे.

सोमवारी ६ जुलै रोजी पुनर्वसू ( तरणा पाऊस) नक्षत्र सुरु झाले असून त्याचे वाहन घोडा आहे. या नक्षत्राच्या पाहिल्याच दिवशी संपूर्ण तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत होते. रात्रीही मुसळधार पाऊस झाल्याने तालुक्याच्या पश्चिम भागातील गराडे धरण जवळपास पूर्ण भरले आहे. तसेच या मार्गातील सर्वाच साखळी बंधारे दुथडी भरून वाहत आहेत. चांबळी येथील बंधारा तसेच सासवड मधील सिद्धेश्वर बंधारा आणि पुढे सर्वच बंधारे अगदी ओसंडून वाहत आहेत.

दरम्यान गराडे धरणाबरोबरच याच परिसरातील भिवडी सुपे गावाजवळील घोरवडी धरण जवळपास ३५ ते ४० टक्के पर्यंत भरले आहे. तर तालुक्यात सर्वात मोठ्या वीर धरणात तब्बल ७५ टक्के पाणीसाठा वाढला आहे. त्याचप्रमाणे माहूर, पिलानवाडी ही धरणेही पूर्ण भरून वाहत असल्याची माहिती सासवड नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अभियंता आनंद जाधव यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा : टेम्पो वाहताना चालकाला काढले बाहेर, वाहतूक पोलिसांमुळे वाचला जीव; पुण्यातील घटना

पुरंदर तालुक्यात सोमवारी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून पुरंदरचे कोकण समजले जाणाऱ्या भिवडी मंडल मधे तब्बल १५८ मिमी इतका पाऊस झाला आहे. सासवड मध्ये ९७ मिमी तर जेजुरी मंडल मध्ये ७५ मिमी इतका पाऊस झाला आहे. तालुक्यातील पावसाची मंडळनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे – सासवड ९७ मिमी, जेजुरी ७५ मिमी, राजेवाडी ५७ मिमी, वाल्हे ५५ मिमी, कुंभारवळण ४३ मिमी, भिवडी १५८ मिमी, परिंचे ६९ मिमी तसेच शिवरी ३७ मिमी इतका पाऊस झाल्याची माहिती पुरंदर तहसील कार्यालयातील लिपीक सोमनाथ आव्हाळे यांनी दिली आहे.

Web Title: The garade dam which supplies water to saswad is full

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 04:52 PM

Topics:  

  • Purandar Farmers
  • Purandar News
  • Rain News

संबंधित बातम्या

Rain Update : देशातील 26 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात…
1

Rain Update : देशातील 26 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात…

पुन्हा पाऊस ! सातारा, सांगलीसह राज्यातील अनेक जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा
2

पुन्हा पाऊस ! सातारा, सांगलीसह राज्यातील अनेक जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा

पावसाअभावी शेतकऱ्यांच्या चिंतेत भर; नदी-नाले कोरडे, खरीप हंगाम धोक्यात
3

पावसाअभावी शेतकऱ्यांच्या चिंतेत भर; नदी-नाले कोरडे, खरीप हंगाम धोक्यात

देशातील अनेक ठिकाणी पुन्हा मुसळधार पाऊस होणार; आसाम, मेघालयसह ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा
4

देशातील अनेक ठिकाणी पुन्हा मुसळधार पाऊस होणार; आसाम, मेघालयसह ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.