Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Purandar Airport : …ही जबाबदारी आमची नाही; पुरंदर विमानळाच्या जागा निवडीवरून अधिकाऱ्यांमध्ये टोलवाटोलवी

पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, खानवडी, मुंजवडी पारगाव अशा सात गावात शासनाचा विमानतळ प्रकल्प प्रस्तावित असून त्यासाठी जमिनीचे संपादन करण्यात येत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 04, 2026 | 05:24 PM
...ही जबाबदारी आमची नाही; पुरंदर विमानळाच्या जागा निवडीवरून अधिकाऱ्यांमध्ये टोलवाटोलवी

...ही जबाबदारी आमची नाही; पुरंदर विमानळाच्या जागा निवडीवरून अधिकाऱ्यांमध्ये टोलवाटोलवी

Follow Us
Follow Us:

सासवड : पुरंदर तालुक्यातील विमानतळ प्रकल्पासाठी जागेची निवड करताना कोणते निकष लावले. दोन विमानतळातील अंतर, उड्डाणासाठी आवश्यक अंतर, सुरक्षितता या गोष्टींचा विचार करून जागेची निवड केली आहे का ? असा प्रश्न उच्च न्यायालयाने उपस्थित केल्यानंतर सदर जागेबाबत आम्हीच निर्णय घेतला असे सांगण्यास कोणीच पुढे येत नसून सर्वच विभागांचे अधिकारी ही जबाबदारी आमची नाही असे म्हणून जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून मोकळे होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, खानवडी, मुंजवडी पारगाव अशा सात गावात शासनाचा विमानतळ प्रकल्प प्रस्तावित असून त्यासाठी जमिनीचे संपादन करण्यात येत आहे. दरम्यान सुरुवातीला या जागेत विमानतळाची घोषणा करून आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळविल्या असल्याचे सांगितले. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांच्या विरोधाची भूमिका लक्षात घेवून पुन्हा जागेत बदल करण्यात आला. पुरंदरच्या पूर्वेकडील नायगाव, पिसर्वे, राजुरी आणि बारामती तालुक्याच्या काही गावात प्रकल्प होणार असल्याचे जाहीर करून त्या जागेबाबत सर्व परवानग्या प्राप्त केल्या.

दरम्यान अडीच वर्षातच महाविकास आघाडीचे सरकार जाऊन पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन होताच विमानतळ प्रकल्प पूर्वीच्याच जागेवर करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला. एकीकडे शासन जागेच्या भूसंपादनाची प्रक्रिया पार असतानाच प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी शासनाच्या भूमिकेवरून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

शासनाच्या भूमिकेबाबत विविध प्रश्न उपस्थित

सध्या विमानतळ प्रकल्पाबाबत उच्च न्यायालयात सुनावणी सुरु असून अॅड. सुदीप सेन, अॅड. प्रभाकर जाधव, अॅड. तनया पाटणकर, अॅड. अक्षय कोळसे पाटील, अॅड. माने शेतकऱ्यांच्या वतीने भूमिका मांडत आहेत. कोर्ट क्रमांक ४० या न्यायालयात न्यायमूर्ती सुमन शाम आणि न्यायमूर्ती अद्वैत एम सेठना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु आहे. शेतकऱ्यांच्या वतीने बाजू मांडताना शासनाच्या भूमिकेबाबत विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता शासन निर्णय घेत आहेत त्याचप्रमाणे प्रकल्पाबाबत कोणतीही माहिती दिली जात नाही तसेच सार्वजनिक का केली जात नाही ? असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : दिवे-बोपदेव घाटाच्या तोंडावर अवैध धंद्यांचे जाळे; पोलिसांच्या कारवाईनंतरही हुक्का पार्लर, दारूची विक्री सुरूच

केवळ भूसंपादन प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी

याबाबत विमान विकास प्राधिकरणाने बाजू मांडताना भूसंपादन करण्याची जबाबदारी आमची नाही असे म्हणून जबाबदारी झटकली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने देखील आमची जबादारी नसून आम्ही केवळ जमीन संपादन आणि विकसित करीत असल्याचे सांगितले. तर जिल्हाधिकाऱ्यांनी सदर जागा राज्य शासनाने निश्चित केल्याचे सांगून केवळ भूसंपादन प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी असल्याचे सांगितले आहे. सर्वच विभागाने जबाबदारी झटकल्याने हीच जागा योग्य आहे असा निर्णय कोणी घेतला ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे जागा निवडीच्या निर्णयावरून आता राज्य सरकार कोणती भूमिका मांडणार, शासन जबाबदारी घेणार का ? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: The high court has questioned the government regarding the selection of the site for the purandar airport

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 05:24 PM

Topics:  

  • Farmers
  • maharashtra
  • Purandar Airport

संबंधित बातम्या

Mira Bhayandar Dahi Handi: ‘संस्कृतीची हंडी’ ते ‘मराठी हंडी’; मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा दणका
1

Mira Bhayandar Dahi Handi: ‘संस्कृतीची हंडी’ ते ‘मराठी हंडी’; मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा दणका

Bhandara News: बाजारपेठेवर चढला जन्माष्टमीचा रंग! मूर्तिकारांची लगबग; पूजासाहित्य, सजावटीच्या वस्तूंनी बाजार फुलला
2

Bhandara News: बाजारपेठेवर चढला जन्माष्टमीचा रंग! मूर्तिकारांची लगबग; पूजासाहित्य, सजावटीच्या वस्तूंनी बाजार फुलला

Pratap Sarnaik: प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या नियमबाह्य रिक्षांवर कारवाईचा बडगा; प्रताप सरनाईकांचे निर्देश
3

Pratap Sarnaik: प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या नियमबाह्य रिक्षांवर कारवाईचा बडगा; प्रताप सरनाईकांचे निर्देश

Engineering Admission 2026 : इंजिनिअरिंग प्रवेशाची चौथी फेरी जाहीर! या फेरीत किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार?
4

Engineering Admission 2026 : इंजिनिअरिंग प्रवेशाची चौथी फेरी जाहीर! या फेरीत किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.