Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Purandar Airport : मोबदल्याची घाई अन् नोंदींची धावपळ; पुरंदर विमानतळ प्रकल्पगस्त शेतकरी व्यस्त

पुरंदर विमानतळ प्रकल्प भूसंपादन प्रक्रियेने आता चांगलाच वेग घेतला आहे. अनेक शेतकरी स्वतःहून संमतीपत्रे देत असून त्यापोटी मिळणारा मोबदला घेणे आणि पैसे लगेचच कुठे गुंतवणूक करता येतील या प्रक्रियेत व्यस्त आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 25, 2026 | 06:05 PM
मोबदल्याची घाई अन् नोंदींची धावपळ; पुरंदर विमानतळ प्रकल्पगस्त शेतकरी व्यस्त

मोबदल्याची घाई अन् नोंदींची धावपळ; पुरंदर विमानतळ प्रकल्पगस्त शेतकरी व्यस्त

Follow Us
Follow Us:

सासवड : पुरंदर विमानतळ प्रकल्प भूसंपादन प्रक्रियेने आता चांगलाच वेग घेतला आहे. अनेक शेतकरी स्वतःहून संमतीपत्रे देत असून त्यापोटी मिळणारा मोबदला घेणे आणि पैसे लगेचच कुठे गुंतवणूक करता येतील या प्रक्रियेत व्यस्त आहेत. त्याचवेळी स्थानिक अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील फळपिके, इतर झाडे, शेत तळे यांच्या नोंदी व्यवस्थित झाल्या नसल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित शेतकरी आता नोंदी करून घेण्यासाठी धावपळ करताना दिसून येत आहेत.

 

पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव अशा सात गावात आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या निमित्ताने जमिनीची संपादनाची प्रक्रिया सुरु आहे. यापूर्वी शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी करून त्यामध्ये असलेली वेगवेगळी झाडे, फळ पिके, विहीर, शेत तळे, बोअर, पत्राशेड, गोठे, यांच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. तसेच त्यांना क्रमांक देवून त्याप्रमाणे त्याची एक प्रत संबंधित शेतकऱ्यांना दिलेली आहे.

आता प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या जमिनीची संमती घेवून त्यांना त्यांच्या क्षेत्राचे त्यातील विविध बांधकामे, आणि इतर गोष्टींचे नुकसान पोटी एकरकमी परतावा देण्यात येत आहे. यासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सर्व माहिती घेवून आणि खात्री झाल्यानंतर रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येत आहे. तसेच यासाठी जिल्हाधिकार्यांनी सुरुवातीलाच १० जूनपर्यंत स्वच्छेने परवानगी देणाऱ्यांना प्राधान्य राहील अशा आशयाची नोटीस प्रसिद्ध केल्याने अनेक शेतकऱ्यांनी स्वतःहून आपल्या जमिनीची संमती दिली आहे.

दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी भूसंपादन अधिकाऱ्यांना भेटून कागदपत्रांची आणि मिळणाऱ्या परताव्याची माहिती घेताना शेतातील नोंदी अपूर्ण असल्याचे लक्षात आले. यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा तोटा होणार आहे. त्यामुळे पूर्वी केलेल्या नोंदी आणि अधिकाऱ्यांकडे असलेल्या कागदपत्रांवरील नोंदीत मोठ्या प्रमाणात तफावत येत आहेत. मागील तीन ते चार वर्षात शेतकऱ्यांनी हजारो झाडे आंब्याची, सीताफळ, जांभूळ त्याचप्रमाणे इतर फळबागा लावल्या आहेत. मात्र नोंदी करताना त्यामध्ये विषमता दिसून येत आहेत. काही झाडांना लाखो रुपये तर त्याच बागेतील काही झाडांना मात्र किरकोळ स्वरुपात पैसे मिळत आहे असे दिसून आले आहे. शेत तळी, बांधावरील झाडे,. शेतातील झाडे यांच्या नोंदीत विषमता दिसून येत आहे. त्यामुळे असे शेतकरी आता संबंधित अधिकाऱ्यांकडे पुन्हा नव्याने नोंदी करण्यासाठी पाठपुरावा करताना आढळून येत आहेत.

हे सुद्धा वाचा : दोन चिमुकल्यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट; बारामतीत नेमकं काय झालं?

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी जादा कर्मचाऱ्यांची नियुक्ती – जिल्हाधिकारी

ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील पूर्वीच्या नोंदी आणि आताच्या नोंदी यामध्ये तफावत आढळून येत असेल त्यांनी संबंधित भूसंपादन अधिकाऱ्यांकडे तशा पद्धतीचा मागणी अर्ज केल्यास त्यांना पुढील तारीख न देता त्याच दिवशी त्यांच्या शेतावर सर्व विभागाचे अधिकारी येतील आणि लगेचच मोजणी करून त्यांचे समाधान करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना कोणताही त्रास होवू नये यासाठी जादा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कृषी, महसूल, भूसंपादन, एमआयडीसी, ग्रामपंचायत असे सर्व विभागांचे अधिकारी शेतावर येऊन प्रत्यक्ष पाहणी करून त्याप्रमाणे मोबदला देण्यात येईल. शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही यासाठी शासन पूर्ण काळजी घेत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिली आहे.

यापूर्वी जमिनीची मोजणी करताना काही शेतकरी उपस्थित नव्हते तसेच काही शेतकऱ्यांचा विरोध असल्याने त्यांची मोजणी झालेली नव्हती. असे शेतकरी आता शेतातील नोंदी करून घ्यावेत यासाठी अर्ज करीत असून, शेतकऱ्यांच्या अर्जानुसार आमचा सर्व विभाग त्यांच्या शेतात पाहणी करून त्याप्रमाणे नोंदी घेत आहेत. काही शेतकऱ्यांच्या अडचणी किंवा काही तक्रारी असतील तर भूसंपादन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना माहिती द्यावी. त्याप्रमाणे नोंदी घेण्यात येत आहेत. -श्रीधर चव्हाण,तालुका कृषी अधिकारी.

Web Title: The land acquisition process for the purandar airport project has now gained momentum

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • Farmers
  • Purandar Airport
  • Purandar airport project

संबंधित बातम्या

मुबलक साठा असताना अचानक साखरेची दरवाढ का? राजू शेट्टी यांचा हल्लाबोल; 20 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
1

मुबलक साठा असताना अचानक साखरेची दरवाढ का? राजू शेट्टी यांचा हल्लाबोल; 20 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक, लातूर-लामजना महामार्गावर तीव्र आंदोलन; नेमकं मागण्या काय?
2

क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक, लातूर-लामजना महामार्गावर तीव्र आंदोलन; नेमकं मागण्या काय?

पुरंदरमध्ये विमानतळ प्रकल्पामुळे जमिनींचे भाव वधारले, प्लॉट विक्रीसाठी एजंट घरोघरी, गुंठेवारीच्या जाहिरातींचा जोर
3

पुरंदरमध्ये विमानतळ प्रकल्पामुळे जमिनींचे भाव वधारले, प्लॉट विक्रीसाठी एजंट घरोघरी, गुंठेवारीच्या जाहिरातींचा जोर

Eknath Shinde: शेतापासून जागतिक बाजारपेठेपर्यंत महाराष्ट्राचा वस्त्रोद्योग; ‘फार्म टू फॉरेन’ उपक्रमाला चालना
4

Eknath Shinde: शेतापासून जागतिक बाजारपेठेपर्यंत महाराष्ट्राचा वस्त्रोद्योग; ‘फार्म टू फॉरेन’ उपक्रमाला चालना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.