Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Purandar Airport : पुरंदर विमानतळासाठी संमतीची पुन्हा मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत असणार अंतिम संधी

पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेस गती देण्यासाठी शेतकऱ्यांना संमतीपत्र सादर करण्यासाठी १६ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 02, 2026 | 12:20 PM
पुरंदर विमानतळासाठी संमतीची पुन्हा मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत असणार अंतिम संधी

पुरंदर विमानतळासाठी संमतीची पुन्हा मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत असणार अंतिम संधी

Follow Us
Follow Us:
पुणे : पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेस गती देण्यासाठी शेतकऱ्यांना संमतीपत्र सादर करण्यासाठी १६ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. ही माहिती पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की, प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या एकूण जमिनीपैकी १,१२५ हेक्टर (९२.५ टक्के) क्षेत्रासाठी शेतकऱ्यांची संमतीपत्रे प्राप्त झाली आहेत. यापैकी ६३० हेक्टर (५२ टक्के) क्षेत्राचे भूसंपादन पूर्ण झाले असून संबंधित शेतकऱ्यांना मोबदल्याचे वितरणही करण्यात आले आहे. प्रकल्पासाठी आतापर्यंत २,६०० कोटी रुपयांचा मोबदला शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला आहे. तसेच, शासनाकडून ३,१५० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून उर्वरित भूसंपादन आणि मोबदला वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अद्याप काही शेतकऱ्यांनी संमतीपत्रे सादर केलेली नसल्याने त्यांना आणखी एक संधी देण्यासाठी १६ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत संबंधित शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह संमती नोंदवावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी डुडी यांनी केले. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ हा राज्यातील महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प असून, भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रकल्पाच्या कामांना वेग मिळणार आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी संमती नोंदवून भूसंपादन प्रक्रिया पूर्णत्वास नेण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा : पेठ संस्कृतीवर मॉल संस्कृतीचे सावट? बदलत्या खरेदीच्या सवयींमुळे पारंपरिक बाजारपेठांचे बदलते स्वरूप 

६ हजार कोटींच्या कर्जाला मंजुरी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीतील यशस्वी अनुभवाचा आदर्श समोर ठेवत पुण्यातील पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ  प्रकल्प निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी)ला दिले. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्यातील महत्त्वाच्या विमानतळ विकास प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. यावेळी पुरंदर विमानतळ प्रकल्पाला आर्थिक गती देण्यासाठी हडको (HUDCO) मार्फत ६ हजार कोटी रुपयांच्या कर्जास मंजुरी देण्यात आली. त्यामुळे या बहुप्रतीक्षित प्रकल्पाच्या कामांना मोठी चालना मिळणार आहे. या बैठकीत शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर कार्गो कॉम्प्लेक्स, कार्गो हाताळणी सुविधा तसेच इतर आवश्यक पायाभूत सुविधा कुंभमेळा-2027 पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविक आणि मालवाहतुकीची वाढती गरज लक्षात घेऊन आवश्यक यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला.

Web Title: The land acquisition process for the purandar international airport project has gained momentum

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 12:20 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • Purandar Airport

संबंधित बातम्या

वरणगाव हादरलं! उड्डाणपुलाखाली तरुणाला गाठून गोळ्या झाडल्या; तरुणीला भेटायला आला अन्…
1

वरणगाव हादरलं! उड्डाणपुलाखाली तरुणाला गाठून गोळ्या झाडल्या; तरुणीला भेटायला आला अन्…

Sharad Pawar Drought Tour : शेतकऱ्यांसाठी शरद पवार मैदानात! चार जिल्ह्यांत दुष्काळी दौरा सुरू, मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार
2

Sharad Pawar Drought Tour : शेतकऱ्यांसाठी शरद पवार मैदानात! चार जिल्ह्यांत दुष्काळी दौरा सुरू, मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार

Thane Mahayuti Rally : ठाण्यात फडणवीसांचा राहुल गांधींवर सर्वात मोठा हल्लाबोल! ‘चीनकडून पैसे का मिळतात?’ राहुल गांधींना थेट सवाल
3

Thane Mahayuti Rally : ठाण्यात फडणवीसांचा राहुल गांधींवर सर्वात मोठा हल्लाबोल! ‘चीनकडून पैसे का मिळतात?’ राहुल गांधींना थेट सवाल

शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार? पुरंदर उपसा योजनेचे पाणी मोफत देण्याची विजय शिवतारेंची मागणी
4

शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार? पुरंदर उपसा योजनेचे पाणी मोफत देण्याची विजय शिवतारेंची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.