संग्रहित फोटो
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीनिमित्त प्रचारार्थ त्या सोमवारी (१९ ऑक्टोबर) छत्रपती संभाजीनगर शहरात आल्या होत्या. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. राज्यात सुरु असलेल्या दुष्काळी परिस्थितीवर बोलताना त्या म्हणाल्या, राज्यात परिस्थिती भीषण आहे. त्यामुळे ही व इतर सर्व निवडणूका पुढे ढकलण्याची विनंती मी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. आजघडीला जनतेला आधार देण्याची गरज आहे. मात्र दुर्दैवाने निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या नाहीत. शेतकऱ्यांना कर्ज मंजूर होऊही ते होल्ड करून ठेवले जात आहे. चारा छावण्या कधी करणार, कर्जमाफी कधी करणार, कर्जवसुली कधी थांबवणार हे प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारले पाहिजे. सरकारने इमानी शेतकऱ्याला फसवले आहे. ५ हजार रुपयांत काय होते ? एक लाख रुपये हेक्टरी रुपयांची शेतकरी मागणी करत आहेत, असेही त्या म्हणाल्या.
हे सुद्धा वाचा : गोळीबार, गुंडगिरी अन् बेरोजगारीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारवर साधला जोरदार निशाणा
आमच्यातही मैत्रीपूर्ण लढत
महाविकास आघाडीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढत असून आमच्यात समन्वय असल्याचे त्या म्हणाल्या. उबाठा गटाकडून उमेदवार दिल्याच्या मुद्यावर त्या म्हणाल्या, एखाद्या निवडणुकीत एखाद्या उमेदाराचीही निवडणूक लढायची इच्छा असते. अशा गोष्टी होत असतात. सत्ताधाऱ्यांमध्येही मैत्रीपूर्ण लढती होत आहेत तशाच आमच्यातही मैत्रीपूर्ण लढत होत आहेत. मात्र आम्ही एकत्रच आहोत, आमच्यात रोज संवाद होतो, आमच्यात समन्वय आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ठाकरे गटाकडून पाठिंबा देण्याची गोड बातमी लवकरच येईल असंही त्या म्हणाल्या.
Ans: शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी आणि रखडलेली आर्थिक मदत तातडीने द्यावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
Ans: सरकारने केवळ ५ हजार रुपयांची मदत जाहीर केली असून तीही अनेक शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही, अशी टीका त्यांनी केली. नमो योजनेचे थकीत हप्तेही तातडीने देण्याची मागणी त्यांनी केली.
Ans: शेतकऱ्यांची कर्जमाफी, कर्जवसुली थांबवणे, शेतीसाठी मंजूर कर्जावरील स्थगिती दूर करणे आणि जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करणे, या मुद्द्यांवर त्यांनी सरकारला जाब विचारला.






