Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा ‘बूस्टर डोस’; स्थायी समितीकडून कोट्यवधींच्या विकासकामांना ‘ग्रीन सिग्नल’

पिंपरी-चिंचवड शहराच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आणि नागरिकांना भेडसावणारे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीने आज महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 31, 2026 | 05:04 PM
पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा 'बूस्टर डोस'; स्थायी समितीकडून कोट्यवधींच्या विकासकामांना 'ग्रीन सिग्नल'

पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा 'बूस्टर डोस'; स्थायी समितीकडून कोट्यवधींच्या विकासकामांना 'ग्रीन सिग्नल'

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आणि नागरिकांना भेडसावणारे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीने आज महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. स्थायी समितीच्या साप्ताहिक बैठकीत आरोग्य, पाणीपुरवठा, शिक्षण आणि रस्ते विकासाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण प्रस्तावांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.

 

पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, विक्रांत बगाडे, नगरसचिव मुकेश कोळप यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहरातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यावर समितीने भर दिला आहे. पिंपरीतील नूतन जिजामाता रुग्णालयातील विद्युत देखभाल व दुरुस्तीच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे, ज्यामुळे रुग्णांना अखंडित सेवा मिळण्यास मदत होईल. तसेच, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी १९ टाटा सुमो वाहने दोन वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेण्याच्या प्रस्तावासही समितीने संमती दिली आहे.

पाणीपुरवठा यंत्रणेत तांत्रिक सुधारणा

शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहावा यासाठी रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील १६०० किलोवॅट क्षमतेच्या रोहित्र संच आणि ब्रेकर्सच्या दुरुस्तीचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय: सेक्टर १० मध्ये नवीन ट्रान्सफॉर्मर व आरएमयू युनिट बसविणे. विविध पंपिंग हाऊसमध्ये तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी ‘सॉफ्ट स्टार्टर’ बसविणे. थेरगाव गावठाण पंप हाऊसची क्षमता वाढवण्यासाठी आवश्यक विद्युत कामे तातडीने पूर्ण करणे.

शिक्षण आणि पायाभूत सुविधा

‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत महापालिका शाळांमधील नादुरुस्त इन्व्हर्टर व बॅटरी बदलण्याच्या कामाला मंजुरी देऊन विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गैरसोय टाळण्याचा प्रयत्न केला आहे.

भूसंपादन : कासारवाडी येथील विकास योजनेतील १२ मीटर रस्त्यासाठी भूसंपादन करण्यास मान्यता.

पुनर्वसन : झोपडपट्टीधारकांच्या तात्पुरत्या निवासासाठी चिंचवड येथे ३० हजार चौरस फूट जागेवर ‘संक्रमण शिबिर’ उभारले जाणार आहे.

दुरुस्ती : प्रभाग ६ मधील रस्ते मजबुतीकरण, सांगवी-किवळे रस्त्यावरील बस थांबे दुरुस्ती आणि निगडीतील उद्यानांमधील स्थापत्य कामांना हिरवा कंदील मिळाला आहे.

पीएमपीएलची संचलन तूट

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षातील संचलन तुटीच्या लेखापरीक्षण अहवालाच्या अवलोकनासाठी येणाऱ्या खर्चास समितीने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

“शहराच्या हिताचे प्रकल्प कालबद्ध मर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. जिजामाता रुग्णालयातील कामे असोत किंवा पाणीपुरवठा यंत्रणेतील सुधारणा, नागरिकांना अखंडित सेवा देणे हेच आमचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. संक्रमण शिबिरामुळे पुनर्वसनाचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.” — अभिषेक बारणे (सभापती, स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महानगरपालिका)

हे सुद्धा वाचा : मावळ, मुळशी, हवेलीचा चेहरामोहरा बदलणार, पीएमआरडीएकडून विकास आराखडा जाहीर; पर्यटनासाठी तब्बल…

Web Title: The pimpri chinchwad municipal corporations standing committee has given the green signal for development works worth crores

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 05:04 PM

Topics:  

  • BJP
  • PCMC News
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

काय सांगता! Cockroach Janta Party चे निम्म्याहून अधिक फॉलोअर्स पाकिस्तानी; भाजप नेत्याचा आकडेवारीसह खळबळजनक दावा
1

काय सांगता! Cockroach Janta Party चे निम्म्याहून अधिक फॉलोअर्स पाकिस्तानी; भाजप नेत्याचा आकडेवारीसह खळबळजनक दावा

Sindhudurg : भाजपचे जिल्हा प्रशिक्षण वर्ग अभियान २३, २४ मे रोजी
2

Sindhudurg : भाजपचे जिल्हा प्रशिक्षण वर्ग अभियान २३, २४ मे रोजी

Cockroach Janta Party Account Ban: कॉकरोच जनता पार्टीचे सोशल मीडिया अकाऊंट बॅन
3

Cockroach Janta Party Account Ban: कॉकरोच जनता पार्टीचे सोशल मीडिया अकाऊंट बॅन

Pravin Darekar: महायुतीच्या मतभेदांच्या चर्चेवर प्रवीण दरेकरांनी स्पष्ट केली भूमिका, तर मुंबईच्या पुनर्विकासाचा मांडला प्लॅन
4

Pravin Darekar: महायुतीच्या मतभेदांच्या चर्चेवर प्रवीण दरेकरांनी स्पष्ट केली भूमिका, तर मुंबईच्या पुनर्विकासाचा मांडला प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.