Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जुन्नर तालुक्यात राजकीय रणधुमाळी; ओतूर-रोहोकडी गणात इच्छुकांची ‘कंबर कसली’

जुन्नर तालुक्यातील ओतूर-रोहोकडी पंचायत समिती गणात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 18, 2026 | 01:16 PM
जुन्नर तालुक्यात राजकीय रणधुमाळी; ओतूर-रोहोकडी गणात इच्छुकांची ‘कंबर कसली’

जुन्नर तालुक्यात राजकीय रणधुमाळी; ओतूर-रोहोकडी गणात इच्छुकांची ‘कंबर कसली’

Follow Us
Close
Follow Us:
  • जुन्नर तालुक्यात राजकीय रणधुमाळी
  • ओतूर-रोहोकडी गणात इच्छुकांची ‘कंबर कसली’
  • सर्वच राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू
ओतूर/मनोहर हिंगणे : जुन्नर तालुक्यातील ओतूर-रोहोकडी पंचायत समिती गणात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. या गणातील वर्चस्व राखण्यासाठी आणि प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना आव्हान देण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भावी इच्छुक उमेदवारांनी गावोगावी भेटीगाठींचा धडाका लावला आहे. ओतूर-रोहोकडी हा गण राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा मानला जातो.

सध्या या भागात इच्छुकांनी विविध सामाजिक कार्यक्रम, लग्नकार्ये, धार्मिक उत्सव आणि ग्रामपंचायत स्तरावरील छोट्या-मोठ्या बैठकांना उपस्थित राहून आपला जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला आहे. “कोण बाजी मारणार?” या चर्चेने आता गावागावातील चावडीवर जोर धरला आहे. जुन्नरच्या राजकारणातील बदललेली समीकरणे पाहता, या गणात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. मात्र, दोन्ही बाजूंनी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवारी नक्की कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुशिक्षित आणि तरुण चेहरे रिंगणात उतरणार

यंदाच्या निवडणुकीत प्रस्थापित नेत्यांसोबतच अनेक सुशिक्षित आणि तरुण चेहरे रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रचाराचा धुराळा उडवला जात आहे. शेतीचे प्रश्न, पाणी योजना, रस्त्यांची कामे आणि स्थानिक बेरोजगारी हे मुद्दे या गणात निर्णायक ठरणार आहेत.

हे सुद्धा वाचा : राघवेंद्र बाप्पू मानकर महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी, तब्बल 26 हजार 497 मतांचे विक्रमी मताधिक्य

वाड्या-वस्त्यांपर्यंत उमेदवारांची दमछाक

ओतूरसारख्या मोठ्या बाजारपेठेच्या गावापासून ते रोहोकडीच्या डोंगरदऱ्यातील वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांची दमछाक होत आहे.”मतदारांच्या मनाचा कौल अद्याप गुलदस्त्यात असला तरी, इच्छुकांनी मात्र आतापासूनच ‘फिल्डिंग’ लावून प्रचारात आघाडी घेतली आहे. ही निवडणूक आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी रंगीत तालीम मानली जात आहे.”

हे सुद्धा वाचा : जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी राजकीय हालचालींना वेग; दौंडमध्ये दोन दिवसात 322 उमेदवारी अर्जाचे वाटप

Web Title: The political atmosphere has heated up in otur rohokadi panchayat samiti gana in junnar taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 01:16 PM

Topics:  

  • Election News
  • junnar news
  • maharashtra

संबंधित बातम्या

ZP Election 2026 : कुडाळ गटात ओबीसी महिला उमेदवारीसाठी रस्सीखेच; उमेदवार निवडण्याचे भाजप पक्षश्रेष्ठींसमाेर आव्हान
1

ZP Election 2026 : कुडाळ गटात ओबीसी महिला उमेदवारीसाठी रस्सीखेच; उमेदवार निवडण्याचे भाजप पक्षश्रेष्ठींसमाेर आव्हान

ZP Election: तळकोकणात निवडणुकीसाठी इच्छुकांची लगीनघाई! आरक्षण सोडतीमध्ये ५० गटांचे आरक्षण…
2

ZP Election: तळकोकणात निवडणुकीसाठी इच्छुकांची लगीनघाई! आरक्षण सोडतीमध्ये ५० गटांचे आरक्षण…

जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी राजकीय हालचालींना वेग; दौंडमध्ये दोन दिवसात 322 उमेदवारी अर्जाचे वाटप
3

जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी राजकीय हालचालींना वेग; दौंडमध्ये दोन दिवसात 322 उमेदवारी अर्जाचे वाटप

State cabinet Meeting : ४५ हजार शासकीय निवासस्थाने बांधणार; महापालिका निकालानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले 10 महत्त्वाचे निर्णय
4

State cabinet Meeting : ४५ हजार शासकीय निवासस्थाने बांधणार; महापालिका निकालानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले 10 महत्त्वाचे निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.