Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच, पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट…

तीव्र आवाजाच्या डीजे'ला बंदीच असल्याची स्पष्ट भूमिका पुणे पोलिसांनी व्यक्त केली असून, मीड प्रेशर तसेच प्लाझामा असणाऱ्या डीजेवर थेट जप्तीची कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 25, 2026 | 07:01 PM
तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच, पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट...

तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच, पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट...

Follow Us
Follow Us:

पुणे : ‘तीव्र आवाजाच्या डीजे’ला बंदीच असल्याची स्पष्ट भूमिका पुणे पोलिसांनी व्यक्त केली असून, मीड प्रेशर तसेच प्लाझामा असणाऱ्या डीजेवर थेट जप्तीची कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा करण्याची मागणी गणेश मंडळे आणि कार्यकर्त्यांकडून होत आहे. मात्र, पुणे पोलिसांनी डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला स्पष्ट विरोध दर्शविला असून, उत्सव साजरा करण्यास विरोध नाही; मात्र तीव्र आवाज करणाऱ्या डीजेवर कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. नियमांचे उल्लंघन करून तीव्र आवाजात डीजे वाजविल्यास थेट जप्ती केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने सोमवारी महापालिकेत विविध विभाग, पोलिस प्रशासन तसेच गणेश मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडण्यासाठी विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून उत्सवावरील निर्बंध शिथिल करून निर्बंधमुक्त वातावरणात सण साजरा करण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान ध्वनिप्रदूषणाला मोकळीक दिली जाणार नसल्याची भूमिका पोलिस प्रशासनाने स्पष्ट केली. डीजे, प्लाझा तसेच मिड प्रेशर सारख्या कर्णकर्कश आवाज करणाऱ्या साधनांवर पूर्णपणे बंदी राहणार असल्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. यासंदर्भात संबंधित सर्व घटकांमध्ये सहमती असल्याचेही त्यांनी सांगितले.

डीजेची नियमावली होणार

ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत निश्चित केलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. आवाजाची निर्धारित मर्यादा ओलांडली जाऊ नये, यासाठी ध्वनीची पातळी निश्चित केली जाणार आहे. डीजेमध्ये किती ‘बेस’ आणि किती ‘टॉप’ वापरता येईल, याबाबतही नियमांच्या चौकटीत चर्चा करण्यात येणार आहे.

नियमभंग केल्यास थेट जप्ती

डीजेच्या तीव्र आवाजामुळे ध्वनिप्रदूषणाची समस्या निर्माण होते. पोलिसांकडून यंदा सुरुवातीपासूनच कठोर भूमिका घेण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करून निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात डीजे वाजविणाऱ्या मंडळांवर कारवाई केली जाणार आहे. थेट डीजे जप्ती करण्यात येईल, असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले. “उत्सव साजरा करण्यास आमचा विरोध नाही. मात्र, ध्वनिप्रदूषण करणाऱ्या तीव्र आवाजाला परवानगी दिली जाणार नाही. प्लाझा आणि प्रेशर हॉर्नवर पूर्णपणे बंदी राहील. ध्वनीची निर्धारित मर्यादा आणि नियमांचे उल्लंघन झाल्यास थेट जप्तीची कारवाई केली जाईल,” असे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा : शिक्रापूर पोलिसांच्या सतर्कतेने हनीट्रॅपचा डाव उधळला; दोघी महिलांसह चौघांवर गुन्हा दाखल

उत्साहासोबत नियमांचेही भान आवश्यक

गणेशोत्सव हा पुण्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करताना इतर नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी मंडळांनी घ्यावी, अशी अपेक्षा पोलिस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण तसेच विद्यार्थ्यांना कर्णकर्कश आवाजाचा त्रास होऊ नये, यासाठी ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

Web Title: The pune police have banned high decibel dj systems during the ganeshotsav celebrations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 07:01 PM

Topics:  

  • ganesh utsav
  • pune news
  • Pune Police

संबंधित बातम्या

Football: पुण्यात फुटबॉलचा थरार! १६ वर्षांखालील गटात लॉयला हायस्कूल अन्…; फायनलमध्ये कोण भिडणार?
1

Football: पुण्यात फुटबॉलचा थरार! १६ वर्षांखालील गटात लॉयला हायस्कूल अन्…; फायनलमध्ये कोण भिडणार?

खडकवासला धरणातील दूषित पाण्यावरुन अमोल बालवडकर आक्रमक; महापौर, आयुक्तांना दिला वॉटर प्युरिफायर
2

खडकवासला धरणातील दूषित पाण्यावरुन अमोल बालवडकर आक्रमक; महापौर, आयुक्तांना दिला वॉटर प्युरिफायर

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा
3

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा

पुण्यनगरीला प्रदूषणाचा विळखा! कोट्यवधी खर्च करून देखील समस्या कायम; शुद्ध हवा मिळणार कधी?
4

पुण्यनगरीला प्रदूषणाचा विळखा! कोट्यवधी खर्च करून देखील समस्या कायम; शुद्ध हवा मिळणार कधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.