Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्हेंचे दत्तक गाव तहानलेले, दूषित पाण्यामुळे नागरिक आजारी; संतप्त ग्रामस्थांचा ‘रास्ता रोको’चा इशारा

शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दत्तक घेतलेल्या 'कोपरे' गावाची परिस्थिती चिंताजनक आहे. हंडाभर पाण्यासाठी येथील महिलांना दररोज मृत्यूशी सामना करावा लागत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 19, 2026 | 05:20 PM
कोल्हेंचे दत्तक गाव तहानलेले, दूषित पाण्यामुळे नागरिक आजारी; संतप्त ग्रामस्थांचा 'रास्ता रोको'चा इशारा

कोल्हेंचे दत्तक गाव तहानलेले, दूषित पाण्यामुळे नागरिक आजारी; संतप्त ग्रामस्थांचा 'रास्ता रोको'चा इशारा

Follow Us
Follow Us:

मनोहर हिंगणे/ ओतूर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याचा पश्चिम आदिवासी पट्टा पाणी टंचाईच्या विळख्यात सापडला आहे. शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दत्तक घेतलेल्या ‘कोपरे’ गावाची परिस्थिती चिंताजनक आहे. हंडाभर पाण्यासाठी येथील महिलांना दररोज मृत्यूशी सामना करावा लागत आहे. जलजीवन मिशनची योजना रखडल्याने आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त ग्रामस्थांनी थेट ‘रास्ता रोको’ आंदोलनाचा इशारा दिला आहे.

 

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका हा तसा धरणांचा जिल्हा आणि पाण्याचा समृद्ध पट्टा म्हणून ओळखला जातो. याच तालुक्यातून अनेक नद्या उगम पावतात. मात्र, या तालुक्याचा ‘पश्चिम आदिवासी पट्टा’ दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी होरपळून निघतो. हे इथले दुर्दैवी वास्तव आहे. कोपरे, मांडवे, मुथाळणे आणि जांभुळशी या दुर्गम आदिवासी पाड्यांमध्ये सध्या पाण्यासाठी अक्षरशः वणवण करावी लागत आहे.

कोपरे गावात डोंगराळ भागात शिवकालीन खडकातील नऊ पाण्याच्या टाक्या आहेत. या टाक्या ऐतिहासिक काळापासून गावाची तहान भागवत आल्या आहेत. मात्र, यंदाच्या भीषण उन्हाळ्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि तीव्र उष्णतेमुळे या नऊपैकी आठ टाक्या पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत. सध्या केवळ एकाच टाकीत थोडे पाणी शिल्लक असून, ते अत्यंत गढूळ आणि दूषित झाले आहे. संपूर्ण गावाची तहान आता या एकाच, आटत चाललेल्या दूषित पाण्याच्या स्रोतावर अवलंबून आहे.

टाकीकडे जाण्यासाठी पायऱ्या नाहीत

कोपरे गावातील महिलांना आणि लहान मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी जो संघर्ष करावा लागत आहे. तो अंगावर काटा आणणारा आहे. खडकातील ही एकमेव जिवंत टाकी एका खोल दरीच्या भागात आहे. तेथे जाण्यासाठी प्रशासनाने किंवा ग्रामपंचायतीने कोणतीही सुरक्षित वाट किंवा पायऱ्यांची सोय केलेली नाही.

खोल दरीत पडण्याची शक्यता

गावातील महिलांना दररोज पहाटेपासूनच हंडा आणि कळशी घेऊन या दरीच्या दिशेने जावे लागते. निसरड्या खडकांवरून, कड्या-कपारीतून जीव हातावर धरून महिला आणि लहान मुले खाली उतरतात. तिथून हंडाभर गढूळ पाणी भरल्यानंतर ते डोक्यावर घेऊन उभी आणि खडतर चढण चढावी लागते. उन्हाचा पारा ४० अंशाच्या पार गेलेला असताना, या चढणी दरम्यान पाय घसरून खोल दरीत पडण्याची आणि गंभीर अपघात होण्याची भीती सतत असते.

संबंधित अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभार

कोपरे गावात जलजीवन मिशनअंतर्गत कोट्यवधी रुपये मंजूर झाले. कामांचे नारळ फुटले आणि कागदावर योजना सुरू झाली. मात्र, प्रत्यक्षात अद्याप गावकऱ्यांच्या घरापर्यंत पाण्याचा एक थेंबही पोहोचलेला नाही. या योजनेची कामे अत्यंत अर्धवट आणि संथ गतीने सुरू असल्यामुळे ही योजना पूर्णपणे रखडली आहे. कंत्राटदार आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही आदिवासी जनतेच्या नशिबी कोरडे नळच आले आहेत.

“देश स्वतंत्र झाल्यापासून आम्ही फक्त निवडणुका, राजकीय पक्षांचे प्रचार आणि नेत्यांची खोटी आश्वासने पाहत आलो आहोत. शेतीच्या पाण्याचा प्रश्न तर आमच्यासाठी लांबचीच गोष्ट आहे, पण जगण्यासाठी पिण्यापुरते तरी प्रशासनाने शुद्ध पाणी द्यावे. आमच्या पुढच्या पिढ्यांचे आयुष्यही या पाणी भरण्यातच जाणार का?” – स्थानिक ग्रामस्थ.

शासकीय टँकरची क्रूर चेष्टा: ८ ते १० दिवसांतून एकदाच दर्शन…!

शासनाचा पाणी पुरवठ्याचा दावा कोपरे आणि परिसरामध्ये पूर्णपणे फोल ठरला आहे. कोपरे, मांडवे परिसरातील ५ ते ६ दुर्गम गावांची तहान भागवण्यासाठी प्रशासनाने केवळ एकच टँकर मंजूर केला आहे. इतक्या मोठ्या परिसरासाठी एक टँकर म्हणजे समुद्रात उंटाचा संशयासारखा प्रकार आहे. परिणामी, कोपरे गावाला तब्बल आठ ते दहा दिवसांनंतर एकदाच टँकरचे पाणी पाहायला मिळते. जेव्हा गावात टँकर येतो, तेव्हा पाणी मिळवण्यासाठी गावकऱ्यांची मोठी झुंबड उडते.

हे सुद्धा वाचा : मावळातील शेतकरी पुन्हा आक्रमक, रिंगरोडला तीव्र विरोध; प्रशासनाला दोन महिन्यांचा अल्टिमेटम

खासदारांच्या दत्तक गावातच अनास्था

विशेष म्हणजे, हे गाव शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दत्तक घेतलेले आहे. ‘संसदरत्न’ म्हणून गौरवलेल्या आणि संसदेत जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडणाऱ्या खासदारांच्या दत्तक गावातच जर अशी परिस्थिती असेल, तर इतर गावांचे काय? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

गावकऱ्यांच्या प्रमुख आणि न्याय्य मागण्या

१. स्वतंत्र टँकरची व्यवस्था : कोपरे गावासाठी ५ ते ६ गावांच्या संयुक्त टँकरऐवजी स्वतंत्र आणि दररोज किमान दोन टँकरची व्यवस्था करण्यात यावी.

२. जलजीवन मिशनची चौकशी : रखडलेल्या जलजीवन मिशन योजनेची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून, दोषी कंत्राटदारावर कारवाई करावी आणि काम युद्धपातळीवर पूर्ण करावे.

३. वैद्यकीय पथक पाठवणे : गावात दूषित पाण्यामुळे पसरणाऱ्या गॅस्ट्रो आणि तापाच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तात्काळ सरकारी डॉक्टरांचे वैद्यकीय पथक आणि औषधोपचार पाठवावेत.

४. ‘एमआय टँक’ला मंजुरी : पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून कोपरे गावासाठी तातडीने ‘एमआय टँक’ (लघु पाटबंधारे तलाव) मंजूर करून त्याचे काम सुरू करावे.

Web Title: The water problem is serious in the village adopted by amol kolhe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 05:20 PM

Topics:  

  • amol kolhe
  • CM Devedra Fadnavis
  • junnar news

संबंधित बातम्या

केंद्रीय योजनांच्या निधीचा पूर्ण वापर करा; मुख्यमंत्री फडणवीसांचे विभागप्रमुखांना स्पष्ट आदेश
1

केंद्रीय योजनांच्या निधीचा पूर्ण वापर करा; मुख्यमंत्री फडणवीसांचे विभागप्रमुखांना स्पष्ट आदेश

Pimpalwandi Junnar Pune Case : ‘आरोपीला कठोर शिक्षा द्या’; चिमुकलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ पिंपळवंडीत संताप
2

Pimpalwandi Junnar Pune Case : ‘आरोपीला कठोर शिक्षा द्या’; चिमुकलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ पिंपळवंडीत संताप

Junnar Crime News: जुन्नर तालुक्यात ९ वर्षांच्या चिमुकलीवर उसाच्या शेतात अत्याचार करून हत्या; संशयित ताब्यात
3

Junnar Crime News: जुन्नर तालुक्यात ९ वर्षांच्या चिमुकलीवर उसाच्या शेतात अत्याचार करून हत्या; संशयित ताब्यात

चाकणमधील खड्डे 31 ऑगस्टपर्यंत बुजवा, अन्यथा…; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा इशारा
4

चाकणमधील खड्डे 31 ऑगस्टपर्यंत बुजवा, अन्यथा…; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.