Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुरंदरच्या ग्रामसेवकांची पंचायत समितीत रंगली आखाड पार्टी, घरकुलांच्या कामाकडे दुर्लक्ष; सीईओंच्या आदेशाला केराची टोपली

ग्रामसेवकांसह सर्वच अधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या विश्रामगृहात आखाड पार्टीत दंग होत सीईओंच्या आदेशाला अक्षरशः केराची टोपली दाखवली आहे. ग्रामसेवक युनियनच्या पाठीमागे मोठी राजकीय ताकद असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 10, 2026 | 04:20 PM
पुरंदरच्या ग्रामसेवकांची पंचायत समितीत रंगली आखाड पार्टी, घरकुलांच्या कामाकडे दुर्लक्ष; सीईओंच्या आदेशाला केराची टोपली

पुरंदरच्या ग्रामसेवकांची पंचायत समितीत रंगली आखाड पार्टी, घरकुलांच्या कामाकडे दुर्लक्ष; सीईओंच्या आदेशाला केराची टोपली

Follow Us
Follow Us:

सासवड : पुरंदर तालुक्यातील नागरिकांना घरकुले वेळेत मिळवीत, बांधकामे व्हावीत यासाठी जिल्हा प्रशासन आग्रही असून जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. घरकुले तातडीने पूर्ण करण्याचे त्यांनी नुकतेच आदेश दिले आहेत. मात्र त्यांच्या बैठकीला २४ तास होत नाहीत तोवरच ग्रामसेवकांसह सर्वच अधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या विश्रामगृहात आखाड पार्टीत दंग होत सीईओंच्या आदेशाला अक्षरशः केराची टोपली दाखवली आहे.

सध्यस्तितीत पुरंदर तालुक्यात एकूण १८८० घरकुले अपूर्ण आहेत. यामध्ये ६५३  अंतिम टप्यात असून ४३० घरकुलांचे अद्याप कामही सुरु झालेले नाहीत, उर्वरित ७९७ घरकुलांचे काम विविध टप्यावर सुरू आहे.  दरम्यान घरकुलांच्या कामाबाबत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य  कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी नाराजी व्यक्त केली. पुरंदर पंचायत समितीमध्ये सभापती, पदाधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेवून कामे तातडीने मार्गी लावण्याच्या ग्रामसेवक व विस्तार अधिकारी यांना सूचना केल्या.

केंद्र, राज्य आणि जिल्हा परिषद पुरस्कृत आवास योजनेतील अपूर्ण घरकुलांचा आढावा घेवून ग्रामपंचायत अधिकारी व  नोडल अधिकारी यांना दर आठवड्यामध्ये अपूर्ण घरकुल यांच्या कामांना  भेटी देऊन लाभार्थीच्या अडचणी व शंकांचे निरसन करणे, घरकुल कामाचे वेळेवर जिओ टॅग करणे, वेळेवर हप्ता मागणी सादर करणे, प्रलंबित मनरेगा मस्टर जलद गतीने काढण्यात यावे, कोणत्याही लाभार्थीचा हप्ता प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेवून अडचणी दूर करून  मोहीम स्वरूपात काम करण्याचे आदेश वाघमारे यांनी दिले.

युनियनच्या पाठीमागे राजकीय ताकद असल्याची चर्चा

सीईओंनी आदेश दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी गावोगावी ग्रामसेवक, विस्तार अधिकाऱ्यांनी भेटी देऊन पाठपुरावा करणे अपेक्षित होते. मात्र अधिकाऱ्यांच्या आदेशाला सर्वानीच अक्षरशः केराची टोपली दाखवली असल्याचे दिसून आले आहे. ग्रामसेवक युनियन व विस्तार अधिकारी युनियन कार्यकारिणीची नुकतीच निवड करण्यात आली असून नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा भव्य सत्कार सोहळा पंचायत समितीच्या मुख्य इमारतीत आयोजित करण्यात आला. या दरम्यान पंचायत समितीच्या शासकीय विश्रामगृहात सर्व बाजूने कापडी कणात टाकून बंदिस्त पद्धतीने आखाड पार्टी आयोजित करण्यात आली. संपूर्ण पंचायत समिती कर्मचाऱ्यासह ग्रामसेवक मंडळी व्हेज नॉनव्हेजच्या पार्टीत व्यस्त असल्याचे पाहायला मिळाले. एवढेच नाही तर पार्टीत काही विघ्न नको म्हणून जवळच्या राजकीय पदाधिकाऱ्यांनाही पार्टीत सामील करून अडचणी दूर केल्या. यापूर्वी देखील टेकवडी येथील ग्रामसेवकांची आखाड पार्टी सर्वत्र गाजलेली होती त्यातच आता थेट पंचायत समितीतच जेवणावळी केल्याने ग्रामसेवक युनियनच्या पाठीमागे मोठी राजकीय ताकद असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

पुरंदर पंचायत समितीच्या विश्रामगृहात आखाड पार्टी झाली असल्यास ग्रामसेवक युनियनच्या पदाधिकाऱ्यांची झालेल्या प्रकाराबद्दल चौकशी करणार असून, या ठिकाणी जेवणावळी घेण्यास कोणाची परवानगी घेतली? याची शहानिशा करणार आहे. यातील जबाबदार कर्मचाऱ्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल.  -अविनाश थोरात, प्रभारी गटविकास अधिकारी.

हे सुद्धा वाचा : अमोल बालवडकरांचा भाजपच्या तिरंगा रॅलीला जोरदार विरोध;15-20 हजार गाड्यामुळे वाहतूक कोंडीची भीती

Web Title: There is talk about the gram sevaks of purandar hosting an akhad party at the panchayat samiti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 04:20 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • maharashtra
  • Purandar News

संबंधित बातम्या

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
1

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
2

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
3

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
4

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.