Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भामा-आसखेड जलवाहिनीचे काम पुन्हा वादात, दोषी ठेकेदारालाच पुन्हा ‘पायघड्या’? प्रशासकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा

पिंपरी- चिंचवड शहराला मुबलक पाणी मिळवून देणाऱ्या भामा-आसखेड योजनेला दोन वर्षांचा विलंब झाला आहे. ज्या ठेकेदाराने कामात दिरंगाई केली, त्यालाच पुन्हा काम देण्याच्या हालचालींमुळे प्रशासकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाली

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 06, 2026 | 12:18 PM
भामा-आसखेड जलवाहिनीचे काम पुन्हा वादात, दोषी ठेकेदारालाच पुन्हा 'पायघड्या'? प्रशासकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा

भामा-आसखेड जलवाहिनीचे काम पुन्हा वादात, दोषी ठेकेदारालाच पुन्हा 'पायघड्या'? प्रशासकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी- चिंचवड शहराला मुबलक पाणी मिळवून देणाऱ्या भामा-आसखेड योजनेला दोन वर्षांचा विलंब झाला आहे. ज्या ठेकेदाराने कामात दिरंगाई केली, त्यालाच पुन्हा काम देण्याच्या हालचालींमुळे प्रशासकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. १६७ एमएलडी क्षमतेच्या या महत्त्वाच्या प्रकल्पाचे ७० टक्के काम पूर्ण झाले असूनही, केवळ ३-४ ठिकाणच्या ठप्प कामामुळे योजना रखडली आहे. नवीन निविदा प्रक्रियेत वेळ जाईल, असे समर्थन प्रशासनाकडून दिले जात असले, तरी दोन वर्षे वेळ घालवणाऱ्या ठेकेदाराकडून वेळेत काम पूर्ण होईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काम पुन्हा सुरू करण्याचा दावा केला जात असला तरी, दोषींवर कारवाई करण्याऐवजी त्यांनाच पुन्हा संधी मिळत असल्याने शहरवासीयांमध्ये नाराजी आहे.

 

प्रशासनाची दुटप्पी भूमिका?

भामा-आसखेड धरणातून १६७ एमएलडी पाणी शहरात आणण्यासाठी जलवाहिनीचे काम सुरू आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराने दिरंगाई केल्यामुळे तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी त्याला हटवून नवीन निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला होता. प्रत्यक्षात, ७० टक्के काम पूर्ण झाले असले तरी काही ठिकाणी काम पूर्णपणे ठप्प आहे. असे असतानाही, आता त्याच ठेकेदाराला पुन्हा संधी देण्याचे प्रयत्न सुरू असल्याने महापालिका वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. भामा-आसखेड धरणातून १६७ एमएलडी पाणी चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणण्यासाठी भूमिगत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पाचे सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, ३ ते ४ महत्त्वाच्या ठिकाणचे काम पूर्णपणे ठप्प असल्याने संपूर्ण योजना कार्यान्वित होऊ शकलेली नाही. विशेष म्हणजे, स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्य मिळत असतानाही ठेकेदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे कामाचा वेग मंदावल्याचे समोर आले आहे.

परस्परविरोधी भूमिकेमुळे नागरिकांमध्ये नाराजी

कामातील त्रुटी आणि विलंबासाठी तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी संबंधित ठेकेदारावर कारवाई करून त्याचे काम काढून घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, आता नवीन निविदा प्रक्रियेत जास्त वेळ जाईल, असे कारण पुढे करत त्याच ठेकेदाराकडून काम पूर्ण करून घेण्याची भूमिका घेतली जात आहे. एकीकडे कामात कसूर केल्याचे मान्य करायचे आणि दुसरीकडे त्याच ठेकेदाराला झुकते माप द्यायचे, या परस्परविरोधी भूमिकेमुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

हे सुद्धा वाचा : तळेगावात पाणीप्रश्नावर मोठा दिलासा; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून यशवंत नगर जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण

नव्याने मुदतवाढ मिळण्याची शक्यता

नुकतीच या कामाची पाहणी करण्यात आली असून, काम पुन्हा गतीने सुरू होईल, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले हे काम संबंधित ठेकेदार पुढील सात महिन्यांत खरोखर पूर्ण करेल का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. भामा-आसखेडसारखा मोठा प्रकल्प पारदर्शकपणे आणि वेळेत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, वारंवार होणारा विलंब आणि दोषी ठेकेदारालाच पुन्हा पायघड्या घालण्याच्या प्रयत्नांमुळे संपूर्ण प्रकल्पाभोवती संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. कामात चूक करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार की त्यांना अभय मिळणार, याकडे आता पिंपरी-चिंचवडकरांचे लक्ष लागले आहे.

प्रकल्प क्षमता : १६७ एमएलडी पाणी पुरवठा.

स्थिती : ७० टक्के काम पूर्ण, ३-४ ठिकाणी काम ठप्प.

विंलब : नियोजित वेळेपेक्षा तब्बल २ वर्षे उशीर.

विवाद : बडतर्फ ठेकेदाराला पुन्हा काम देण्याचा सत्ताधाऱ्यांचा घाट.

Web Title: There is talk of giving the work of bhama aaskhed project to the guilty contractor again

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 12:18 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • PCMC News
  • Pimpri Chinchwad
  • Ravi Landge

संबंधित बातम्या

कोंकणवासियांसाठी आनंदाची बातमी! आता ‘या’ मोठ्या स्थानकावर ३ महत्त्वाच्या ट्रेन्स थांबणार; मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश
1

कोंकणवासियांसाठी आनंदाची बातमी! आता ‘या’ मोठ्या स्थानकावर ३ महत्त्वाच्या ट्रेन्स थांबणार; मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश

Moshi Building Collapse: पिंपरी-चिंचवडमधील मोशीत इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली १४ ते १५ जण अडकल्याची भीती
2

Moshi Building Collapse: पिंपरी-चिंचवडमधील मोशीत इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली १४ ते १५ जण अडकल्याची भीती

लोणावळा, मावळ अन् खेडमध्ये ‘पीडीआरएफ’ची धाडसी मोहीम, शेकडो नागरिकांचे प्राण वाचवले; शोधकार्य सुरूच
3

लोणावळा, मावळ अन् खेडमध्ये ‘पीडीआरएफ’ची धाडसी मोहीम, शेकडो नागरिकांचे प्राण वाचवले; शोधकार्य सुरूच

Maharashtra Politics: सस्पेन्स संपला! शरद पवारांचा पक्ष एनडीएमध्ये येणार की नाही? देवेंद्र फडणवीसांनी थेट सांगूनच टाकलं
4

Maharashtra Politics: सस्पेन्स संपला! शरद पवारांचा पक्ष एनडीएमध्ये येणार की नाही? देवेंद्र फडणवीसांनी थेट सांगूनच टाकलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.