Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मान्सूनबाबत महत्त्वपूर्ण अपडेट; यंदाचा मान्सून कमकुवत राहणार, सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार

सध्या प्रशांत महासागरात 'एल निनो' स्थिती विकसित होण्यास सुरुवात झाली असून, मान्सून काळात त्याचा प्रभाव अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 31, 2026 | 10:32 AM
Monsoon arrive on 10 June at Maharashtra says IMD,

Monsoon arrive on 10 June at Maharashtra says IMD,

Follow Us
Follow Us:

पुणे : भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेल्या २०२६ च्या नैऋत्य मोसमी पावसाच्या अद्ययावत दीर्घकालीन अंदाजानुसार, यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात देशभरातील पर्जन्यमान दीर्घकालीन सरासरीच्या सुमारे ९० टक्के राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असून, सरासरीपेक्षा कमी मान्सूनची शक्यता अधिक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या अंदाजात चार टक्के त्रुटीची मर्यादाही नमूद करण्यात आली आहे.

हवामान विभागाच्या मल्टी मॉडेल एन्सेंबल प्रणालीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या या अंदाजानुसार, मध्य भारत, दक्षिण द्वीपकल्प आणि वायव्य भारतात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. तर ईशान्य भारतात पाऊस सामान्य राहू शकतो. देशातील बहुतांश पावसावर अवलंबून असलेल्या कृषी क्षेत्रांचा समावेश असलेल्या ‘मॉन्सून कोअर झोन’ मध्येही कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे खरीप हंगाम, जलसाठे, जलविद्युत निर्मिती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

‘एल निनो’ स्थिती विकसित होण्यास सुरुवात

सध्या प्रशांत महासागरात ‘एल निनो’ स्थिती विकसित होण्यास सुरुवात झाली असून, मान्सून काळात त्याचा प्रभाव अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. एल निनोमुळे सामान्यतः भारतातील मान्सून कमकुवत होतो. दुसरीकडे, हिंदी महासागरातील ‘इंडियन ओशन डायपोल’ (आयओडी) स्थिती सध्या तटस्थ असून, ती मान्सून काळातही कायम राहण्याचा अंदाज आहे. कमी पावसाचा संभाव्य परिणाम लक्षात घेता, पाणी व्यवस्थापन, जलसंधारण, दुष्काळपूर्व तयारी आणि हवामान विभागाच्या पूर्वसूचना यंत्रणेचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज

जून २०२६ महिन्यासाठीही हवामान विभागाने देशभरात कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. वायव्य भारत, ईशान्य भारत तसेच दक्षिण द्वीपकल्पातील काही भाग वगळता बहुतांश प्रदेशांत सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जूनमध्ये देशातील बहुतांश भागांत कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

अनेक राज्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज

उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड, गुजरात आणि आंध्र प्रदेश या राज्यांत जून महिन्यात उष्णतेच्या लाटेचे दिवस वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, हिमाचल प्रदेश आणि तामिळनाडूतील काही भागांमध्येही उष्णतेचा प्रभाव अधिक जाणवू शकतो.

खंडाळ्यात मान्सूनपूर्व पावसाचे तांडव ! कण्हेरी डोंगरावर ढगफुटीसदृश पाऊस, ओढ्यांना पूर अन् वीटभट्ट्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

Web Title: This years monsoon will be weak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 10:32 AM

Topics:  

  • Climate Change
  • Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

पुण्यात उन्हाचा कडाका कायम; दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज
1

पुण्यात उन्हाचा कडाका कायम; दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज

Mumbai News: अस्वस्थतेचे छुपे कारण आर्द्रता; शहरात उकाडा कायम! आकाश निरभ्र असल्याने सूर्यकिरणांचा थेट परिणाम
2

Mumbai News: अस्वस्थतेचे छुपे कारण आर्द्रता; शहरात उकाडा कायम! आकाश निरभ्र असल्याने सूर्यकिरणांचा थेट परिणाम

Chocolate Crisis :चॉकलेटप्रेमींना महागाईचा झटका! कोकोच्या किमती तिप्पट होण्यामागे उष्णतेच्या वादळाचा हात
3

Chocolate Crisis :चॉकलेटप्रेमींना महागाईचा झटका! कोकोच्या किमती तिप्पट होण्यामागे उष्णतेच्या वादळाचा हात

यंदा नेहमीपेक्षा कमी थंडी जाणवणार; फेब्रुवारीपासूनच सुरू होणार उन्हाळा तर जलस्रोतांसमोर मोठं संकट
4

यंदा नेहमीपेक्षा कमी थंडी जाणवणार; फेब्रुवारीपासूनच सुरू होणार उन्हाळा तर जलस्रोतांसमोर मोठं संकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.