शुक्रवारी या परिसरात नागरिकांना उकाडा असाह्य झाला होता.अकरा वाजण्याच्या सुमारास ढगाळ वातावरण होण्यास सुरुवात झाली. तर दुपारी दिड वाजता पावसाला सुरुवात झाली. मांढरदेव परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट आणि मेघगर्जेनेसह कण्हेरी गावच्या डोंगरावर मुसळधार पावसाने हजेरी लावली. डोंगर माथ्यावरून नाले खळाळू लागले. त्यामुळे क्षणातच ओढे दुथडी भरून वाहु लागले.
ट्रकमधून लोखंडी पाइप घसरले अन्…; खंडाळा घटातील भीषण अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू
अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. कण्हेरी परिसरातील विटभट्टीवर तयार केलेल्या कच्च्या विटांवरील झाकलेले कागद वादळी वाऱ्याने उडून गेल्याने तयार विटा भिजून सुमारे पंधरा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
दरम्यान,अतिट येथे गोठ्याजवळ बांधलेल्या गाईवर वीज पडून ती जागीच ठार झाली. यामध्ये रामदास राजाराम जाधव यांचे मोठे नुकसान झाले. असवली ,कण्हेरी, लोहोम व परीसरात पाऊस झाला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तसेच अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे कण्हेरी परिसरातील वीटभट्टी चालक आणि अतीट येथील बाधित शेतकरी अडचणीत आले आहेत.
कंपनी प्रदूषणाबाबत ग्रामपंचायतवर केलेल्या आरोपांबाबत केसुर्डी ग्रामपंचायत आक्रमक






