Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; काँग्रेसच्या युवा नेत्याचा जागीच मृत्यू

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंक बोगद्यात फॉर्च्युनर कार आणि मालवाहू टेम्पोच्या भीषण अपघातात काँग्रेसचे युवा नेते तुषार भूमकर यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 07, 2026 | 09:21 PM
Accident

Accident

Follow Us
Follow Us:
  • मिसिंग लिंक बोगद्यात फॉर्च्युनर-टेम्पोची भीषण धडक
  • काँग्रेसचे युवा नेते तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू
  • दोन तास वाहतूक ठप्प; महामार्ग पोलिसांकडून तपास सुरू
 

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंक बोगद्यात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या भीषण अपघातात पुण्यातील काँग्रेसचे युवा नेते तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून अन्य तिघेजण सुखरूप बचावल्याची माहिती मिळाली आहे. अपघातामुळे एक्स्प्रेस वेवरील मुंबईकडे जाणारी वाहतूक जवळपास दोन तास विस्कळीत झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या फॉर्च्युनर कारने समोरील भाजीपाल्याने भरलेल्या मालवाहू टेम्पोला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

या अपघातात मृत्यूमुखी पडलेले तुषार भूमकर हे पुण्यातील वाकड परिसरातील रहिवासी होते. ते काँग्रेस पक्षाचे सक्रिय युवा कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. सामाजिक उपक्रम, स्थानिक प्रश्न आणि संघटनात्मक कामांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील युवकांमध्ये त्यांचा चांगला जनसंपर्क होता. त्यांच्या अकाली निधनामुळे काँग्रेस कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

‘हाथी चले बाजार, कुत्ते भौंके हजार’; लक्ष्मण हाकेंच्या इशाऱ्यावर प्रसाद लाड यांचा जोरदार पलटवार

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, आयआरबीचे देवदूत पथक आणि स्थानिक मदत यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गंभीर जखमी असलेल्या व्यक्तीवर उपचार सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अपघातानंतर एक्स्प्रेस वेवरील मुंबईकडे जाणारी वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. त्यामुळे वाहने जुन्या मुंबई-पुणे महामार्गाकडे वळविण्यात आली. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने हटविल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली.

मोदी-शहा भेटीमागचं खरं कारण काय? सुनील तटकरेंचा मोठा खुलासा, राजकीय भेटींमुळे तर्कवितर्कांना उधाण

या भीषण अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, वेग, वाहनांमधील अंतर आणि इतर तांत्रिक बाबींचा तपास महामार्ग पोलीस करत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. तुषार भूमकर यांच्या निधनामुळे पुण्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली असून त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Web Title: Tushar bhumkar dies mumbai pune expressway missing link accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 09:20 PM

Topics:  

  • Accident Case
  • Congress
  • Mumbai Pune Missing Link

संबंधित बातम्या

Priyanka Gandhi Criticized Mohan Bhagwat: जेन-झी ला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही; प्रियांका गांधींचा मोहन भागवतांवर निशाणा
1

Priyanka Gandhi Criticized Mohan Bhagwat: जेन-झी ला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही; प्रियांका गांधींचा मोहन भागवतांवर निशाणा

Missing Link Accident : मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, फॉर्च्युनरचा चुराडा; एकाचा मृत्यू
2

Missing Link Accident : मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, फॉर्च्युनरचा चुराडा; एकाचा मृत्यू

Junnar Congress: जुन्नरमध्ये काँग्रेसध्ये अंतर्गत संघर्ष; कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी
3

Junnar Congress: जुन्नरमध्ये काँग्रेसध्ये अंतर्गत संघर्ष; कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी

RSS सरसंघचालकांचा Gen-Z आणि Gen Alpha शी संवाद ही मलमपट्टी, आधी तरुणाईची माफी मागा अन्…; काँग्रेसचा निशाणा
4

RSS सरसंघचालकांचा Gen-Z आणि Gen Alpha शी संवाद ही मलमपट्टी, आधी तरुणाईची माफी मागा अन्…; काँग्रेसचा निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.