Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी-चिंचवड महापालिकेत नगर सचिव पदावरून सत्तासंघर्ष; महापौर अन् स्थायी समिती अध्यक्ष आमनेसामने

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 'नगर सचिव' नियुक्तीवरून सत्ताधारी भाजपमध्येच दोन गट पडल्याचे समोर आले आहे. कंत्राटी नगर सचिव म्हणून उल्हास जगताप यांच्या नियुक्तीला स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी थेट आव्हान दिले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 13, 2026 | 05:29 PM
पिंपरी-चिंचवड महापालिकेत नगर सचिव पदावरून सत्तासंघर्ष; महापौर अन् स्थायी समिती अध्यक्ष आमनेसामने

पिंपरी-चिंचवड महापालिकेत नगर सचिव पदावरून सत्तासंघर्ष; महापौर अन् स्थायी समिती अध्यक्ष आमनेसामने

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ‘नगर सचिव’ नियुक्तीवरून सत्ताधारी भाजपमध्येच दोन गट पडल्याचे समोर आले आहे. कंत्राटी नगर सचिव म्हणून उल्हास जगताप यांच्या नियुक्तीला स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी थेट आव्हान दिले आहे. जगताप यांना वित्तीय अधिकार नसल्याचे कारण देत, बारणे यांनी त्यांना स्थायी समितीच्या कामकाजात सहभागी होण्यापासून रोखले आहे. यामुळे महापालिकेत प्रशासकीय पेच निर्माण झाला असून, हा वाद आता चव्हाट्यावर आला आहे.

 

नियुक्तीचा पेच आणि वादाची पार्श्वभूमी

नगर सचिव मुकेश कोळप यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत, महापौर रवी लांडगे यांनी मानधनावर नगर सचिव नेमण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रशासनाने निविदा मागवल्या असता, निवृत्त अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांची कंत्राटी पद्धतीने एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर कोळप यांची तडकाफडकी क्षेत्रीय अधिकारी म्हणून बदली करण्यात आली. मात्र, नियुक्ती करताना प्रशासनाने राज्य शासनाचा पूर्वअभिप्राय घेतला नाही, असा ठपका आता ठेवला जात आहे.

‘वित्तीय अधिकारां’चा मुद्दा बनला वादाचे केंद्र

नगर सचिव हे पद वैधानिक असल्याने, स्थायी समितीसमोर येणाऱ्या आर्थिक विषयांच्या फाईल्सवर स्वाक्षरी करण्याचे अधिकार त्यांना असणे आवश्यक आहे. मात्र, कंत्राटी जगताप यांना हे वित्तीय अधिकार नसल्याने, भविष्यात कायदेशीर अडचण येऊ नये, म्हणून अध्यक्ष बारणे यांनी आक्षेप घेतला आहे. राज्य सरकारचे स्पष्ट निर्देश येत नाहीत तोपर्यंत मुकेश कोळप हेच कामकाज पाहतील, असा ठाम निर्णय बारणे यांनी घेतल्याने जगताप यांनी रजेवर जाणे पसंत केले आहे.

स्थायी समिती अध्यक्षांची आक्रमक भूमिका

स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी या नियुक्तीवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. “नगरसचिव पद हे केवळ नाममात्र नाही. स्थायी समितीचे कामकाज, प्रस्ताव, विषयपत्रिका, करारांची अंमलबजावणी आणि महत्त्वाच्या आर्थिक फाईल्सची प्रक्रिया याच कार्यालयातून होते. ज्या अधिकाऱ्याला वित्तीय अधिकार नाहीत, त्यांनी केलेल्या कामकाजाची कायदेशीर वैधता भविष्यात वादात सापडू शकते,” अशी स्पष्ट भूमिका बारणे यांनी मांडली आहे.

महापौर ‘कात्री’त?

नगर सचिव पदाच्या नियुक्तीवरून प्रशासकीय नियमांची पायमल्ली केल्याचा ठपका ठेवत, महापौरांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न इतर पदाधिकारी करत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. नियुक्त्या करण्यापूर्वी कायदेशीर बाबी तपासल्या नसल्याने प्रशासनावरही टीकेची झोड उठत आहे.

हे सुद्धा वाचा : आता वाचलीस, पण पुन्हा दिसलीस तर…; पुण्यात महिलेला कारने उडवून जीवे मारण्याचा प्रयत्न

सोमवारच्या सभेवर सर्वांचे लक्ष

महापालिकेची सर्वसाधारण सभा सोमवार, दिनांक १५ रोजी पार पडणार आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर रवी लांडगे असणार आहेत. मात्र, या सभेत नगर सचिव म्हणून मुकेश कोळप बसणार की उल्हास जगताप, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नगरसचिव आणि उपनगर सचिव ही पदे नियमांनुसार भरली जाऊ शकते. सद्यस्थितीत नगरसचिव पद हे करार पद्धतीने भरण्यात आले आहे. -मनोज लोणकर, सहआयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

Web Title: Two factions have emerged within the bjp itself in the pimpri chinchwad municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 05:29 PM

Topics:  

  • PCMC News
  • Pimpri Chinchwad
  • Ravi Landge

संबंधित बातम्या

इंद्रायणी नदीत मृत मासे, प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; रसायनमिश्रित सांडपाणी नदीत सोडल्याचा आरोप
1

इंद्रायणी नदीत मृत मासे, प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; रसायनमिश्रित सांडपाणी नदीत सोडल्याचा आरोप

गणेशोत्सवात गुंडगिरीला लगाम, तब्बल 2573 जणांना पोलिसांचा दणका; 58 सराईत गुन्हेगार तडीपार
2

गणेशोत्सवात गुंडगिरीला लगाम, तब्बल 2573 जणांना पोलिसांचा दणका; 58 सराईत गुन्हेगार तडीपार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.