Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पायाभूत सुविधा अन् नागरी सेवांच्या बळकटीकरणाला वेग; पिंपरी-चिंचवडच्या स्थायी समितीत विविध विकासकामांना मंजुरी

पिंपरी- चिंचवड शहराचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीने विविध महत्त्वपूर्ण विकासकामांना हिरवा कंदील दाखवला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 04, 2026 | 02:45 PM
पायाभूत सुविधा अन् नागरी सेवांच्या बळकटीकरणाला वेग; पिंपरी-चिंचवडच्या स्थायी समितीत विविध विकासकामांना मंजुरी

पायाभूत सुविधा अन् नागरी सेवांच्या बळकटीकरणाला वेग; पिंपरी-चिंचवडच्या स्थायी समितीत विविध विकासकामांना मंजुरी

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी- चिंचवड शहराचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीने विविध महत्त्वपूर्ण विकासकामांना हिरवा कंदील दाखवला आहे. स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत पाणीपुरवठा, आरोग्य, रस्ते दुरुस्ती, सायबर सुरक्षा आणि प्रशासकीय कामकाजाशी संबंधित अनेक प्रस्तावांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे.

पाणीपुरवठा व्यवस्थेचे सक्षमीकरण

शहरातील वाढत्या नागरीकरणाचा विचार करून पिंपळे सौदागर (प्रभाग क्र. २८) येथील शिवार चौक ते गोविंद गार्डन चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उच्च क्षमतेच्या नव्या डी.आय. जलवाहिन्या टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय बोपखेल, दिघी, पिंपळे निलख, थेरगाव, वाकड, श्रीनगर, चिखली आणि जाधववाडी या भागांतील पाण्याच्या टाक्या, पंपिंग केंद्रे व वितरण वाहिन्यांच्या परिचालन व देखभालीची कामे एकात्मिक पद्धतीने मार्गी लावली जाणार आहेत. ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारीतील पाणीपुरवठा व्यवस्थापनासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ आणि टँकर चालकांची उपलब्धता करून देण्यासही बैठकीत मान्यता मिळाली आहे.

रस्ते, बीआरटीएस आणि छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसर

शहरातील वाहतूक व्यवस्था गतिमान आणि सुरक्षित ठेवण्यासाठी नाशिक फाटा उड्डाणपुलाची स्थापत्य दुरुस्ती, नाशिक फाटा ते वाकड (कॉरिडॉर क्र. ३) रस्त्याची डागडुजी आणि औंध-रावेत बीआरटीएस मार्गाचे मूल्यमापन करून बसथांब्यांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. मोशी-बोऱ्हाडेवाडी येथे साकारत असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य पुतळा परिसरासाठी उच्चदाब वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येथे आकर्षक फसाड लाईटिंग, सीसीटीव्ही, अग्निशामक व्यवस्था आणि अत्याधुनिक विद्युत कामे केली जाणार आहेत.

आरोग्य सुविधा आणि सायबर सुरक्षेवर भर

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या गरजू रुग्णांसाठी हाडांच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य (ऑर्थोपेडिक इम्प्लांट्स) खरेदी केले जाणार आहे. कान, नाक आणि घसा विभागातील अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रणेच्या वार्षिक देखभालीलाही मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रशासकीय पातळीवर माहिती तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता महापालिकेच्या संगणक यंत्रणेच्या संरक्षणासाठी तीन हजार अँटी-व्हायरस परवाने आणि तांत्रिक साहाय्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ नियुक्त केले जाईल.

 हे सुद्धा वाचा : विद्यानंद बापटांच्या मारहाणीनंतर राजकारण तापणार; रविवारी ‘डीजे मुक्ती’साठी पालिकेवर महामोर्चा!

नवे क्षेत्रीय कार्यालय व इतर निर्णय

महापालिकेच्या पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आलेल्या ‘लोहगड’ (ल) या नव्या क्षेत्रीय कार्यालयात नागरिकांच्या सोयीसाठी सभागृह, विविध विभाग कक्ष, कॅश काउंटर आणि अधिकारी दालने विकसित करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला. याव्यतिरिक्त शहरात दोन लाख देशी वृक्षांची लागवड आणि डीपी रस्त्यांचे सुशोभीकरण प्रभावीपणे राबवण्यासाठी उद्यान विभागात अनुभवी अधिकाऱ्यांना तात्पुरती पुनर्नियुक्ती देण्यात आली. प्रभाग क्रमांक १२ व १ मधील सार्वजनिक उत्सव व्यवस्था आणि ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६’ सात दिवस व्यापक स्वरूपात साजरे करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

“नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा, सुरक्षित रस्ते, अद्ययावत आरोग्य सुविधा आणि सक्षम डिजिटल प्रशासन देणे हेच स्थायी समितीचे मुख्य उद्दिष्ट आहे. प्रशासकीय कार्यक्षमता वाढवून नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” — अभिषेक बारणे, सभापती, स्थायी समिती.

Web Title: Various development works have been approved at the pimpri chinchwad municipal corporations standing committee meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • PCMC News
  • Pimpri Chinchwad
  • Ravi Landge

संबंधित बातम्या

भक्ती-शक्ती चौक ते चाकण मेट्रो मार्गाला महापालिकेची मंजुरी; 12 हजार 937 कोटींच्या आराखड्यास मान्यता
1

भक्ती-शक्ती चौक ते चाकण मेट्रो मार्गाला महापालिकेची मंजुरी; 12 हजार 937 कोटींच्या आराखड्यास मान्यता

दहीहंडीतील अश्लील नृत्याला पोलिसांचा ‘ब्रेक’! आक्षेपार्ह कार्यक्रम झाल्यास थेट…; पोलीस आयुक्तांचा इशारा
2

दहीहंडीतील अश्लील नृत्याला पोलिसांचा ‘ब्रेक’! आक्षेपार्ह कार्यक्रम झाल्यास थेट…; पोलीस आयुक्तांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.