संग्रहित फोटो
सहायक प्राध्यापकाच्या अपमानप्रकरणी डॉ. वाबळेंना नोटीस
‘वायसीएम’ रुग्णालयातील एका सहायक प्राध्यापकाचा अपमान केल्याप्रकरणी डॉ. राजेंद्र वाबळे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. आरोपांचे गांभीर्य, सुरू असलेला पोलीस तपास आणि शासकीय कर्मचाऱ्यास अशोभनीय ठरेल असे गैरवर्तन करून कर्तव्यात सचोटी न बाळगल्याचा ठपका ठेवत डॉ. वाबळे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. दोन दिवसांत असमाधानकारक खुलासा आल्यास अथवा खुलासा सादर न केल्यास नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
५२ पुरातन वृक्षांची बेकायदेशीर तोड; उद्यान अधीक्षक गारगोटेंवर ठपका
दुसऱ्या प्रकरणात, पिंपरीतील एका खाजगी जागेमधील हेरिटेज दर्जा असलेल्या ५२ पुरातन झाडांची बेकायदेशीर तोड केल्याचा आरोप मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. झाडांची संख्या आणि वय कागदोपत्री कमी दाखवून फेरफार केल्याचा ठपका, प्रचलित नियम, शासन निर्देश आणि प्रशासकीय मंजुरी डावलून वृक्षतोडीस प्रोत्साहन दिल्याचा आरोप. या गैरकारभारामुळे महापालिकेचे आर्थिक आणि महसुली नुकसान झाल्याची नोंद तक्रारीत. शहरातील वृक्ष संरक्षण, संगोपन आणि उद्यानांची देखभाल करण्याची जबाबदारी असतानाही कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी, ‘आपल्यावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये?’ अशी विचारणा नोटिशीद्वारे करण्यात आली आहे.
मुदतीत समाधानकारक खुलासा सादर न झाल्यास दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर थेट शिस्तभंगाची कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड दम आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिल्याने महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Ans: वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे आणि मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे यांना आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
Ans: पिंपरीतील खासगी जागेवरील हेरिटेज दर्जाची ५२ पुरातन झाडे बेकायदेशीरपणे तोडल्याप्रकरणी त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप आहे.
Ans: दोन्ही अधिकाऱ्यांना दोन दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समाधानकारक खुलासा न मिळाल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.






