पुण्यात पुन्हा पाणी कपातीचे संकट; आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवणार (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
पुणे : शहराला पाणीपुरवठा करणारी खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमपर ही चारही धरणे यंदा शंभर टक्के भरलेली असतानाही पुणेकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार आहे. राज्यात दुष्काळाची संभाव्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आणि पुढील वर्षी जुलै-ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणीसाठा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने दहा टक्के पाणीकपातीचे नियोजन केले आहे. त्यानुसार, पुणे महानगरपालिकेनेही आतापासूनच तयारी सुरू केली असून, परिस्थिती बिघडल्यास शहरात आठवड्यातून एक दिवस पूर्णपणे पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत भविष्यातील पाण्याच्या गरजेचा आढावा घेऊन जलसाठे सुरक्षित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुण्यातील चारही धरणांमध्ये मुबलक पाणीस्सता असला, तरी राज्यातील इतर भागांमध्ये संभाव्य जलसंकट निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलले जात आहे.
पाणी कपात टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार
पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी राज्य सरकारने दहा टक्के पाणीकपातीचा अंतिम निर्णय घेतल्यास महापालिका त्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. अधिका-यांच्या मते, २०२०-२१ या वर्षाप्रमाणे आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर आणि टप्याटप्याने पाणीकपात केल्यास वर्षभरात सुमारे १४ टक्के पाणी वाचविता येऊ शकते. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात पुणेकरांना निर्माण होणान्या संभाव्य तीव्र पाणीटंचाईपासून मोठा दिलासा मिळू शकत्ती, उन्हाळ्यात गभीर परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी वेक्षेत नियोजन करण्यावर प्रशासनाचा भर आहे.
जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू
पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले की, राज्य सरकारकडून पाण्याच्या उपलब्धतेचा आढावा घेतला जात आहे. धरणांमधील पाणीसाठ्याच्या नियोजनाबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. दहा टक्के पाणीकपातीचा निर्णय झाल्यास महापालिका त्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.
आतापासून पाणीकपात सुरू केल्यास…
२०२०-२१ मध्येही संपूर्ण वर्षभर आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. आतापासून पाणीकपात सुरू केल्यास महापालिका वर्षाला सुमारे १४ टक्के पाणी वाचवू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात शहराला पाणीटंचाईपासून दिलासा मिळू शकतो.
पुण्यातील चारही धरणांत 94 टक्के पाणीसाठा; ‘खडकवासला’त गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.74 TMC घट






