पाकिस्तानकडून भारताचा पराभव
आज हाँगकाँग सिक्सेस टूर्नामेंटमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात महत्वाचा सामना पार पडला. हा सामना प्रत्येकी 6-6 ओव्हरचे खेळवण्यात आला. या रोमांचक सामन्यात भारताने पाकिस्तानला विजयासाठी 89 रन्सचे टार्गेट दिले होते. ते टार्गेट पाकिस्तानने केवळ 23 बॉलमध्येच पूर्ण केले. हॉन्ग कॉन्ग सिक्सेस स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा ४ विकेट्सने पराभव केला आहे. डिफेंडिंग चॅम्पियन आणि अब्बास आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने भारताचा पराभव केला आहे.
या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने शशांक सिंगच्या तुफानी खेळीच्या जोरावर 1 विकेट गमावून 6 ओव्हर्समध्ये तब्बल 88 रन्स ठोकल्या. पाकिस्तानला भारताने 89 रन्सचे टार्गेट दिले होते. मात्र पाकिस्तानने केवळ 23 बॉलमध्ये 4 विकेट्स राखून हे टार्गेट सहजरीत्या पूर्ण केले.
Pakistan 🇵🇰 beat India 🇮🇳 badly in the Hong Kong Sixes because of Nitish & Krunal 🤯 – Nitish Rana retired hurt after playing a terrible knock of 19 off 14 balls. – Krunal Pandya leaked 31 runs in his opening over. – Pakistan successfully chased down 89 runs in just 3.5 overs. – Only Shashank Singh gave an big impact: 40 off 11 balls. — Mukku (@Cric_Mukku) October 30, 2026
पाकड्यांना रडवायला Team India सज्ज; 10 दिवसांत दोन वेळा भिडणार; पहा संपूर्ण वेळापत्रक
भारताचे गोलंदाज काहीसे अपयशी ठरल्याचे दिसून आले. भारताचा फिरकीपटू कृणात पंड्याला एकाच ओव्हरमध्ये तब्बल पाकिस्तानच्या फलंदाजाने 5 सिक्सर मारले. त्यामुळे हा सामना पूर्णपणे पाकिस्तानच्या बाजूने झुकल्याचे दिसून आले. याआधीच्या सामन्यात पाकिस्तानला यूएईविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.
नितीश राणा, राहुल त्रिपाठी, राहुल तेवतिया (यष्टिरक्षक), क्रुणाल पांड्या (कर्णधार), शशांक सिंह, कुलवंत खेजरोलिया, टी. नटराजन. (टीप: हॉन्ग कॉन्ग सिक्स प्रकारात एका संघात ६ खेळाडू खेळतात).
ख्वाजा नफे (यष्टिरक्षक), अब्दुल समद, अब्बास आफ्रिदी (कर्णधार), इरफान खान, अहमद दानियाल, मुहम्मद शहजाद.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 6 ओव्हर्समध्ये 88 रन्स केल्या. हे टार्गेट पाकिस्तानने सहज पूर्ण केले. भारताकडून शशांक सिंगने आक्रमक खेळी केली. भारताने दिलेले ८९ रन्सचे टार्गेट पाकिस्तानच्या फलंदाजांनी अवघ्या २३ बॉलमध्ये पूर्ण केले. पाकिस्तानने भारताचा 4 विकेट्सने पराभव केला आहे.
हॉन्ग कॉन्ग सिक्सेस ही स्पर्धा प्रामुख्याने हॉन्ग कॉन्गमधील क्रिकेटपटूंना आणि स्थानिक चाहत्यांना जगातील टॉप इंटरनॅशनल खेळाडूंना थेट मैदानावर खेळताना पाहण्याची संधी मिळावी, या उद्देशाने सुरू करण्यात आली होती. १९९० च्या दशकात आयसीसी मध्ये एसोसिएट मेंबर असल्यामुळे हॉन्ग कॉन्ग क्रिकेट संघाकडे मोठ्या आणि नामांकित देशांच्या खेळाडूंविरुद्ध खेळण्यासाठी फारसे व्यासपीठ किंवा संधी उपलब्ध नव्हती. त्यामुळे या स्थानिक चाहत्यांच्या आणि खेळाडूंच्या आवडीखातर या अनोख्या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली गेली.






