फोटो सौजन्य: iStock
सुनील गर्जे/ नवराष्ट्र: अहिल्यानगर जिल्ह्यात यंदाच्या रब्बी पेरणीला उशिर होत आहे. सततच्या पावसामुळे अनेक भागांत शेतीत पाणी साठले असून पेरणीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १० टक्के रब्बी पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. यामध्ये ज्वारीची सर्वाधिक १८ टक्के पेरणी झाली असली तरी तीही नेहमीच्या तुलनेत कमीच आहे.
नेवासे, शेवगाव, पाथर्डी, राहुरी, राहाता आणि अकोले या तालुक्यांमध्ये पेरणीचे प्रमाण विशेषतः कमी आहे. रब्बी हंगामात जिल्ह्यात सरासरी ४,४३,३४७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जाते. यापैकी सर्वाधिक क्षेत्र ज्वारीखाली राहतं, तर त्यापाठोपाठ हरभरा आणि गहू ही प्रमुख पिके घेतली जातात.
यंदा अतिवृष्टी आणि पुराने जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मोठे नुकसान झाले. सतत महिनाभर सुरू असलेल्या पावसामुळे अजूनही काही शेतीभागात पाणी साठून आहे. त्यामुळे वापसा न मिळाल्याने रब्बी पेरणी लांबणीवर गेली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात पाण्याची स्थिती चांगली असली तरी कापूस व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना रब्बी पिकांकडून मोठी अपेक्षा आहे. रब्बीमध्ये प्रामुख्याने हरभरा, गहू आणि मकाचे क्षेत्र अधिक असते.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गहू आणि हरभऱ्याची पेरणी सुरू झाली असून पुढील महिनाभरात त्याला मोठ्या प्रमाणात वेग येईल. गव्हाची पेरणी साधारणपणे डिसेंबरअखेरपर्यंत केली जाते.
जिल्ह्यात आत्तापर्यंत ४४ हजार हेक्टरवर, म्हणजे १० टक्के पेरणी झाली आहे. पिकनिहाय पाहता ज्वारीची ३२ हजार हेक्टर म्हणजे १८ टक्के पेरणी झाली आहे.
Satara News: महावितरण विरोधात वाईत शेतकरी आक्रमक: सौर ऊर्जा धोरणाने नदीकाठच्या शेतकऱ्यांपुढे पेच
तालुका-निहाय स्थिती:
गेल्या चार दिवसांपासून पाऊस थांबल्याने शेतजमिनी कोरड्या होत असून, रब्बी पेरणी आता वेग घेईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
Ans: अतिवृष्टी आणि पुराने अनेक भागांत पाणी साचले असून पेरणीला विलंब झाला आहे.
Ans: सध्याच्या घडीला ज्वारीची सर्वाधिक 18% पेरणी झाली आहे.
Ans: गहू आणि हरभऱ्याची पेरणी नोव्हेंबर ते डिसेंबरअखेरपर्यंत सुरू राहते, आणि यंदाही पुढील महिनाभरात मोठ्या प्रमाणात पेरणी होईल असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.






