हदगांव तालुक्यात परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले आहे. मागील पाच महिन्यांपासून मुसळधार पावसाने संपूर्ण हदगांव तालुक्यामध्ये धुमाकूळ घातल्याने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याबरोबर काल झालेल्या परतीच्या पावसाने कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी आता चिंतेत आहेत. शासनाने शेतकऱ्याला पॅकेज जाहीर केले. पण अद्याप शेतकऱ्याला पैसे मिळाले नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी उपोषण करण्याचा इशाराही यावेळी दिला आहे.