राहुल गांधींना कोर्टाचा दणका! भारतीय सैन्यासंदर्भातील वक्तव्याविरुद्ध याचिका न्यायालयाने फेटाळली
पुणे: राहुल गांधींना महाराष्ट्रातील पुण्यातील न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हिंदुत्ववादी विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती, त्यावर न्यायालयाने त्यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते, मात्र राहुल गांधी न्यायालयात हजर झाले नाहीत. समन्स न मिळाल्याचे कारण त्यांनी यामागे दिले होते.
सात्यकी सावरकर यांनी पुणे न्यायालयात राहुल गांधींविरोधात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मार्चमध्ये लंडनला गेलेल्या राहुल गांधींनी त्यांच्या एका भाषणात सावरकरांनी एका पुस्तकात मुस्लिम व्यक्तीला मारहाण केल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. सावरकरांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, त्यांच्या 5-6 मित्रांनी एकदा एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण केली होती. यामुळे आपल्याला खूप आनंद झाला होता. पण सावरकर यांच्या कोणत्याही पुस्तकात असा कोणताही उल्लेख आढळत नाही, असे नमुद केले आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांच्या प्राथमिक तपासात तक्रार खरी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
West Maharsahtra Politics: पश्चिम महाराष्ट्रात कोण मारणार बाजी; कोणाची ताकद जास्त, कोण कमजोर?
या प्रकरणी सह दिवाणी न्यायाधीश आणि न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 4 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीनंतर राहुल गांधी यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले. त्यासाठी 23 ऑक्टोबरला समन्सही बजावण्यात आले होते. ही सुनावणी एमपी/ एमएलए ृ न्यायालयात झाली. मात्र राहुल गांधी न्यायालयात हजर राहिले नाहीत. आपल्याला कोणतेही समन्स मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर सात्यकी सावरकर यांचे वकील कोल्हटकर यांनी न्यायालयाकडे राहुल गांधी यांना समन्स बजवण्याची विनंती केली होती, न्यालायालयाने ती विनंती मान्य करत राहुल गांधी यांना समन्स जारी करत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.