Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: कर्जत तालुक्यात तीव्र पाणीटंचाई; २० गावे व ३९ आदिवासी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

Karjat News: कर्जत तालुक्यात उन्हाळा सुरू होताच पाणीटंचाई गंभीर बनली असून अनेक गावे आणि आदिवासी वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. जलजीवन मिशन योजनेचे अनेक नळपाणी योजना निधी अभावी रखडल्या आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 24, 2026 | 01:28 PM
Raigad News: कर्जत तालुक्यात तीव्र पाणीटंचाई; २० गावे व ३९ आदिवासी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

Raigad News: कर्जत तालुक्यात तीव्र पाणीटंचाई; २० गावे व ३९ आदिवासी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

Follow Us
Follow Us:
  • कर्जत तालुक्यातील २० गावे आणि ३९ आदिवासी वाड्या पाणीटंचाईग्रस्त घोषित करण्यात आल्या आहेत.
  • शासनाने ५ टँकर मंजूर करून चार गावे आणि चार वाड्यांमध्ये पाणीपुरवठा सुरू केला आहे.
  • आणखी चार गावांनी टँकरची मागणी केली असून लवकरच त्यावर कार्यवाही होणार आहे.
कर्जत तालुक्यातील दोन नद्या बारमाही वाहत असतात. तर दोन प्रमुख नद्या आणि उपनद्या या उन्हाळ्यात कोरड्या असतात. त्यामुळे दुर्गम आणि आदिवासी भागात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. अशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीटंचाई वाढली असून ग्रामस्थांच्या मागणीनुसार कर्जत तालुक्यात शासनाने टँकर सुरू केले आहेत. तालुक्यातील चार गावे आणि चार वाड्या यांना शासनाच्या टँकरमधून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून आणखी चार गावांनी टँकर सुरू करण्याची मागणी केली आहे.

Educational News: मराठी शाळा बंद पाडण्याचा शासनाचा डाव;  नेमकं काय आहे प्रकरण?

कर्जत तालुक्यात दरवर्षी मार्च महिना सुरू झाला की पाणीटंचाई जाणवू लागते. तालुक्यातून टाटा धरणाच्या पाण्यावर पेज नदी उल्हास नदीला मिळेपर्यंत बारमाही वाहते. मात्र त्याआधी उल्हास नदी कोरडे असते, तसेच तालुक्यातून वाहणाऱ्या चिल्हार, पोश्री या मोठ्या नद्या उन्हाळ्यात कोरड्या असतात. त्याचवेळी अनेक उपनद्या या उन्हाळ्यात कोरड्या असल्याने तालुक्यात पाणीटंचाईचे दुर्भिक्ष्य उन्हाळा सुरू झाला की अधिक प्रमाणात जाणवते. त्यात जलजीवन मिशन योजनेचे अनेक नळपाणी योजना निधी अभावी रखडल्या आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)

गतवर्षी पहिला शासकीय टँकर सुरू

तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायतमधील अशाणे गावात गतवर्षी पहिला शासकीय टँकर सुरू झाला होता. यावर्षी देखील पहिला शासकीय टँकर अशाणे गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सुरू झाला आहे. शासनाने जिल्हाधिकारी स्तरावर टँकर निविदा मागवली होती, त्यानुसार कर्जत तालुक्यासाठी ५ टँकर मंजूर झाले असून त्या टँकरमध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता ही १४ हजार लिटर एवढी आहे.

या टँकरमधून पाणी टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा केला जाणार आहे. अशाणे नंतर त्याच ग्रामपंचायत मधील कोशाने, उमरोली तसेच ओलमन ग्रामपंचायत मधील झुगरेवाडी या चार गावांना शासकीय टँकर येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी सुरू केले आहेत. त्याचवेळी किरवली ठाकूरवाडी, सावरवाडी ठाकूरवाडी, पळसदरी ठाकूरवाडी, वर्ण ठाकूरवाडी या ठिकाणी शासकीय टँकरमधून पाणी पुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे.

२० गावे व ३९ आदिवासी वाड्या पाणीटंचाईग्रस्त

हे लक्षात घेऊन पाणीटंचाई आराखडा डिसेंबर २०२५ मध्ये तयार करण्यात आला आहे. यावर्षी कर्जत तालुक्यातील २० गावे आणि ३९ आदिवासी वाड्या या पाणीटंचाईग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. या सर्व पाणीटंचाईग्रस्त भागातील पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी शासनाने टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू करण्याचे पाणीटंचाई कृती आराखड्यात नमूद केले होते.

ST Bus News : एसटीच्या डिझेल बचत योजनेला अर्थ खात्याचा अडथळा; गुजरातहून खरेदीस नकार

कर्जत तालुक्यात यावधी प्रचंड उष्णता जाणवत असल्याने पिण्याच्या पाण्याची मागणी वाढली आहे. वाढती मागणी लक्षात घेऊन पाच टँकर कर्जत तालुक्यासाठी मंजूर झाले आहे. – सुशांत पाटील, गटविकास अधिकारी, कर्जत तालुका पंचायत समिती

पाणीटंचाई असलेल्या आणखी चार ठिकाणी टँकरची मागणी करण्यात आली आहे. त्या ठिकाणी साईट व्हिजीट केल्यानंतर टँकर सुरू करण्याची कार्यवाही केली जाईल. – केशव जाधव, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक

Web Title: Severe water shortage in karjat tankers deployed across villages more demand rising raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 01:28 PM

Topics:  

  • Karjat
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

KARJAT : रमेश कदम यांच्या आंदोलनाला यश; कर्जतच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू
1

KARJAT : रमेश कदम यांच्या आंदोलनाला यश; कर्जतच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू

ग्लोबल रुग्णालयातील १५ टक्के राखीव खाटांचा गैरव्यवहार? १०० कोटींच्या नुकसानीवर तडजोडीचा आरोप
2

ग्लोबल रुग्णालयातील १५ टक्के राखीव खाटांचा गैरव्यवहार? १०० कोटींच्या नुकसानीवर तडजोडीचा आरोप

Ratnagiri : मंडणगड बसस्थानकाचा कायापालट होणार; मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमीपूजन
3

Ratnagiri : मंडणगड बसस्थानकाचा कायापालट होणार; मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमीपूजन

Travel News : चालत्या ट्रेनमध्ये अलार्म चेन ओढली तर काय होतं? जाणून घ्या नियम आणि दंड
4

Travel News : चालत्या ट्रेनमध्ये अलार्म चेन ओढली तर काय होतं? जाणून घ्या नियम आणि दंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.