Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भूमिअभिलेख विभागाचं सातबारा पोर्टल ठप्प! ‘सर्व्हर डाउन’मुळे शेतकरी अडचणीत; खरीप हंगामावर संकट, तातडीने उपाययोजनांची मागणी

भूमि अभिलेख विभागाच्या संकेतस्थळाच्या अपग्रेडेशनमुळे सातबारा पोर्टल गेल्या काही दिवसांपासून ठप्प आहे. यामुळे ऑनलाइन सेवा बंद पडून शेतकऱ्यांना सातबारा, फेरफार आणि इतर कागदपत्रांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 25, 2026 | 01:57 PM
भूमिअभिलेख विभागाचं सातबारा पोर्टल ठप्प! ‘सर्व्हर डाउन’मुळे शेतकरी अडचणीत; खरीप हंगामावर संकट, तातडीने उपाययोजनांची मागणी

भूमिअभिलेख विभागाचं सातबारा पोर्टल ठप्प! ‘सर्व्हर डाउन’मुळे शेतकरी अडचणीत; खरीप हंगामावर संकट, तातडीने उपाययोजनांची मागणी

Follow Us
Follow Us:
  • सातबारा पोर्टल बंद असल्याने जमीन अभिलेखाशी संबंधित सर्व ऑनलाइन सेवा पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत.
  • खरीप हंगामाच्या तोंडावर कागदपत्रे न मिळाल्याने पीककर्ज आणि शेती नियोजन अडचणीत आले आहे.
  • सततच्या सर्व्हर डाउन समस्येमुळे शेतकऱ्यांना महा ई-सेवा केंद्रांवर वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत.
अलिबाग: भूमिअभिलेख विभागाच्या संकेतस्थळाच्या अपग्रेडेशनमुळे सातबारा पोर्टल गेल्या काही दिवसांपासून ठप्प असून ‘सर्व्हर डाउन’ आणि ‘एरर’च्या सततच्या समस्यांमुळे ऑनलाइन सेवा पूर्णपणे कोलमडल्या आहेत. खरीप हंगाम अगदी तोडांवर आला असताना ही परिस्थिती निर्माण झाल्याने रायगड जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; तब्बल 38 हजार कोटींची एफआरपी खात्यात जमा

भूमिअभिलेख विभागाकडून संकेतस्थळाच्या अपग्रेडेशनचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत असले तरी हे काम अपेक्षेपेक्षा जास्त काळ चालल्याने सेवा अद्याप पूर्ववत झालेल्या नाहीत. परिणामी सातबारा उतारा, आठ-अ उत्तारा, फेरफार नोंदी, म्युटेशन प्रक्रिया यांसह जमीन अभिलेखाशी संबंधित सर्व ऑनलाइन सेवा ठप्प झाल्या आहेत. संकेतस्थळ उघडण्यात अडथळे येणे, ‘सर्व्हर डाउन’ व ‘एरर’चे संदेश सतत दिसणे, दस्तऐवज डाउनलोड न होणे तसेच अर्ज प्रक्रिया पूर्ण न होणे अशा तांत्रिक अडचणींचा सामना शेतकरी व नागरिकांना करावा लागत आहे.

शेती नियोजनावर मोठा परिणाम ग्रामीण भागातील तलाठयांचे सर्व्हर व्यवस्थित सुरू असल्याचे सांगितले जाते, परंतु फिरतीच्या कामावर असल्याने अनेकदा तलाठी कार्यालयात नसतात. त्यामुळे शेतकरी महा ई-सेवा केंद्रालाच प्राधान्य देतात, परंतु तेथील सेवा ठप्प झाली आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ही समस्या तातडीने सोडविणे गरजेचे असून, सातबारा पोर्टल लवकरात लवकर सुरू करून पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास पीककर्ज वितरण आणि शेती नियोजनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विनाकारण हेलपाटे; प्रशासनाबद्दल वाढतेय नाराजी

ऑनलाइन सेवा बंद झाल्यामुळे शेतकरी सेतू व महा ई-सेवा केंद्रांकडे धाव घेत आहेत, मात्र तेथेही ‘सर्व्हर हाउनच्या समस्येमुळे कामे होत नसल्याने शेतकऱ्याऱ्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. वेळ आणि पैशाचा अतिरिक्त खर्च सहन करत असूनही अपेक्षित काम होत नसल्याने शेतक-यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तहसील कार्यालयांमध्येही अनेक कामे रखडली असून, सातबारा अभावी फेरफार व इतर महसुली प्रक्रिया थांबल्या आहेत, अनेकांना कागदपत्रांशिवाय परत जावे लागत असल्याने प्रशासनाबद्दल नाराजी वाढताना दिसत आहे.

शेतीच्या कामांवर याचा थेट परिणाम होण्याची भीती

खरीप हंगामासाठी पीककर्ज घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. बँकांकडे कर्जासाठी अर्ज करताना सातबारा उतारा सादर करणे बंधनकारक असल्याने सध्या अनेक शेतकरी कागदपत्रांच्या प्रतीक्षेत अडकून पडले आहेत. काहींनी कर्जासाठी अर्ज करण्याची तयारी पूर्ण केली असली तरी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने प्रक्रिया पुढे सरकत नाही. त्यामुळे पेरणीचे नियोजन आणि शेतीच्या कामांवर वाचा वेट परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मुंबईतील ९० टक्के रिक्षा थांबे गायब! संपूर्ण शहरात २.६० लाख रिक्षा, १८ हजार टॅक्सी; पण थांब्यांची संख्या फक्त ७२४

मागील काही दिवसांपासून संकेतस्थळाला सर्वेहर डाऊन, एरख्या समस्या येत आहेत. त्यामुळे सातबारा किवा इतर महत्वाची कागदपत्रे मिळत नाहीत. शेतकरी आमच्या महा ई-सेवा केंद्रावर फेरया मारत आहेत. – कल्पेश पवार, महा ई-सेवा केंद्रचालक

Web Title: Maharashtra satbara portal down farmers face trouble as land record services collapse ahead of kharif season raigad news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 01:57 PM

Topics:  

  • Alibaug
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Neral Bandh: नेरळमध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘बंद’; आरोग्य विभागाकडून कार्डिओलॉजिस्टच्या उपचारांची शिफारस
1

Neral Bandh: नेरळमध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘बंद’; आरोग्य विभागाकडून कार्डिओलॉजिस्टच्या उपचारांची शिफारस

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती; ३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित
2

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती; ३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ऑक्टोबरमध्ये ३ महत्त्वाचे उड्डाणपूल होणार खुले; वाहतूककोंडीची समस्या सुटणार
3

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ऑक्टोबरमध्ये ३ महत्त्वाचे उड्डाणपूल होणार खुले; वाहतूककोंडीची समस्या सुटणार

Mumbai Crime : मालाडमधील डे-केअर सेंटरमध्ये ४ वर्षांपासून ठेवला होता मृतदेह! संशयास्पद पार्सलमुळे फुटला भांडाफोड
4

Mumbai Crime : मालाडमधील डे-केअर सेंटरमध्ये ४ वर्षांपासून ठेवला होता मृतदेह! संशयास्पद पार्सलमुळे फुटला भांडाफोड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.