Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News : ग्रामीण विकासासाठी शैक्षणिक सुविधांवर भर, रायगड जिल्हा परिषद अर्थसंकल्पात 175 कोटींची तरतूद

रायगड जिल्हा परिषदेचा 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी सभागृहात सादर केला. यामध्ये सुमारे 175 .77 कोटी रुपयांची एकूण तरतूद करण्यात आल्याचे जाहीर केले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 27, 2026 | 06:02 PM
Raigad News : ग्रामीण विकासासाठी शैक्षणिक सुविधांवर भर, रायगड जिल्हा परिषद अर्थसंकल्पात 175 कोटींची तरतूद
Follow Us
Follow Us:
  • ग्रामीण विकासासाठी शैक्षणिक सुविधांवर भर,
  • रायगड जिल्हा परिषद अर्थसंकल्पात 175 कोटींची तरतूद
रायगड जिल्हा परिषदेचा 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी सभागृहात सादर केला. यामध्ये सुमारे 175 .77 कोटी रुपयांची एकूण तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. शिक्षण, आरोग्य, कृषी, ग्रामविकास आणि सौर ऊर्जा या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करत सर्वांगीण ग्रामीण विकासाचा आराखडा या अर्थसंकल्पातून मांडण्यात आला आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षांनी अर्थसंकल्प सादर करताना विकासकामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला. ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा बळकट करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षण क्षेत्राला भक्कम आधारअर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आली आहे. प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांच्या फी व परीक्षांसाठी आर्थिक मदत देणे, तसेच विशेष शाळांना शैक्षणिक साहित्य पुरवणे यावर भर देण्यात आला आहे. या उपाययोजनांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी अधिक सुलभ होणार आहे.

Karjat News : अखेर उपोषणाला मिळाली स्थगिती; ठेकेदारांची थकबाकी मिळणाण्याबाबत महेंद्र थोरवे यांचं आश्वासन

आरोग्य सेवांमध्ये सुधारणा
ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला सक्षम करण्यासाठी आरोग्य केंद्रांना सौर ऊर्जेची सुविधा उपलब्ध करून देण्याची महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात येणारआहे. वीजपुरवठ्याच्या अडचणींवर मात करून आरोग्य सेवा अधिक कार्यक्षम करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे. कृषी व ऊर्जा क्षेत्रावर लक्षकृषी क्षेत्रासाठी सौर घरगुती दीपसंच खरेदीवर अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना पर्यायी ऊर्जा साधने उपलब्ध होऊन खर्चात बचत होण्यास मदत होणार आहे. तसेच सौर ऊर्जेचा वापर वाढवून पर्यावरणपूरक विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

क्रीडा व सामाजिक उपक्रमांना चालना
क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार योजना राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील क्रीडापटूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे.

ग्रामविकासावर विशेष भर
ग्रामपंचायतींच्या विकासासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून, गाव पातळीवरील पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.संतुलित व लोकाभिमुख अर्थसंकल्प एकूणच, रायगड जिल्हा परिषदेचा हा अर्थसंकल्प लोकाभिमुख आणि विकासाभिमुख असल्याचे दिसून येत आहे. शिक्षण, आरोग्य आणि ऊर्जा या मूलभूत क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे.

या सभेला उपाध्यक्ष मधुकर पाटील, सभापती चंद्रकांत कळंबे, वैकुंठ पाटील, समाजकल्याण सभापती नारायण डामसे , महिला व बालविकास सभापती रसिका केणी, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पाठारे आदी उपस्थित होते.जिल्हा परिषद गटनेत्या मानसी दळवी, सदस्य विकास पाटील, मनाली काळीजकर, गीता जाधव, प्रभाकर म्हात्रे, विघ्नेश माळी आदीनी मत मांडली.

Karjat News : ‘….अन्यथा उपोषण करु’ ; नळजोडणी गैरप्रकरणाबाबत पंचायत समिती सदस्य आक्रमक

Web Title: Raigad news provision of rs 175 crores in raigad zilla parishad budget

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 06:02 PM

Topics:  

  • Budget
  • navrashtra news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Raigad News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज उलटा फडकवला; ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
1

Raigad News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज उलटा फडकवला; ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी

Raigad Farmer News :- १,८५९ शेतकऱ्यांना १० कोटी ९५ लाखांची शासनाकडून कर्जमाफी
2

Raigad Farmer News :- १,८५९ शेतकऱ्यांना १० कोटी ९५ लाखांची शासनाकडून कर्जमाफी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.