(फोटो सौजन्य: Pinterest)
दरम्यान कोरळवाडीसाठी मंजूर झालेली पाणी पुरवठा योजना तीन वर्षे अपूर्ण राहिल्याने संतप्त झालेल्या आदिवासी भगिनींनी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते.
लेखी पत्र देत आमरण उपोषण मागे घेण्याची विनंती
या घटनेनंतर शनिवारी आमदार नितीन राऊत यानी अर्थसंकल्पीय अधिवेशनात रायगड जिल्ह्यातील जल जीवन मिशन योजनेबाबत तारांकित प्राप्न विचारल्याने प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला व त्यानंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अभियत्थानी घटनास्थळी पोहोचून तातडीने काम सुरू करीत पाणीपुरवठा सुरू करून उर्वरित तांत्रिक कामही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल अश्या आशयाचे लेखी पत्र देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती.
सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर म्हणाले की, “स्वातंत्र्याच्या ७९ वर्षानंतर कोरलवाडीत असला तरीही रायगड जिल्ह्यात जल जीवन मिशन योजनेसाठी सुमारे १२०० कोटी रुपयाच्या कामाची बौकशी होईपर्यंत पाठपुरावा सुरू राहील, कारण रायगडमध्ये अजून शेकडों आदिवासी वाड्या चहानलेल्या आहेत”.
खासदार धैर्यशील पाटील यांना भाजपचा ‘दे धक्का’! राज्यसभा निवडणुकीच्या यादीतून वगळल्याने चर्चेला उधाण
…अन्यथा पुन्हा आंदोलन
वरिष्ठ सहाय्यक रवींद्र सोनारघरे, रुपेश राजगे, कनिष्ठ सहाय्यक संकिता पाटील, चैताली म्हात्रे हह्यांनी उपोषणकर्त्यांना देत आमरण उपोषण मागे घेण्याची विनंती केल्याने उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण तात्पुरते स्थगित केले, मात्र उर्वरित तांत्रिक कामे पूर्ण करून योजन्य नियमित व सुरळीत चालू, राहील याची खात्री प्रशासनाने चावी, अन्यथा पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






