Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: महाडच्या दासगाव खाडीत गाळाचा गंभीर प्रश्न; विकासात अडथळा, स्थानिकांची ठाम भूमिका

महाड तालुक्यातील दासगाव खाडी संगम परिसरात मोठ्या प्रमाणात साचलेल्या गाळामुळे जलवाहतूक आणि नौकाविहार अनेक वर्षांपासून बंद आहे. स्थानिकांच्या मते तातडीने गाळ उपसा केल्यास पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा होऊ शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 08, 2026 | 02:13 PM
Raigad News: महाडच्या दासगाव खाडीत गाळाचा गंभीर प्रश्न; विकासात अडथळा, स्थानिकांची ठाम भूमिका

Raigad News: महाडच्या दासगाव खाडीत गाळाचा गंभीर प्रश्न; विकासात अडथळा, स्थानिकांची ठाम भूमिका

Follow Us
Follow Us:
  • दासगाव खाडीतील सावित्री आणि नागेश्वरी नद्यांच्या संगमावर मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे पूर्वी सुरू असलेली जलवाहतूक आणि नौकाविहार अनेक वर्षांपासून पूर्णपणे ठप्प झाले आहेत.
  • स्थानिक ग्रामस्थांच्या मते या परिसरातील गाळ शास्त्रोक्त पद्धतीने काढण्यात आल्यास नदीची खोली वाढेल, लहान होड्या व गलबते पुन्हा सुरू होतील आणि पर्यटनाला नवी चालना मिळेल.
  • 2005 आणि 2021 मधील महापुराचा अनुभव लक्षात घेता गाळ उपसा केल्यास पाण्याचा प्रवाह सुरळीत होऊन भविष्यातील पूरस्थितीचा धोका कमी करण्यास मोठी मदत होऊ शकते.
महाड: महाड तालुक्यातील दासगाव खाडीतील संगम परिसरात मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ काढण्यात आल्यास अनेक वर्षांपासून ठप्प असलेला नौका विहार पुन्हा सुरू होऊ शकतो, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. या उपक्रमामुळे दासगाव परिसराच्या विकासालाही चालना मिळण्याची शक्यता असून महापुराचा धोका देखील कमी होणार आहे. महाड हे ऐतिहासिकदृष्ट्या व्यापारी केंद्र म्हणून ओळखले जात होते. सावित्री खाडीमार्गे पूर्वी मोठ्या प्रमाणावर जलवाहतूक होत असे. गलबतांद्वारे विविध वस्तूंची ये-जा होत होती. शहराजवळील ‘हबस तलाव’ देखील त्या काळातील जलमार्गाशी निगडित इतिहासाची साक्ष देतो. मात्र, कालांतराने खाडीत गाळ साचत गेल्याने जलवाहतूक पूर्णपणे बंद पडली आहे.

गॅस टंचाईचा असाही बसतोय फटका; लग्न सोहळे होईना नियोजित वेळेत

दरम्यान, २००५ आणि २०२१ मधील महापुराचा फटका लक्षात घेता गाळ उपसा महत्त्वाचा ठरतो. मात्र, ज्या ठिकाणी गाळ काढण्याची गरज आहे, त्या संगम भागाकडे प्रशासनाचे पुरेसे लक्ष नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. दासगाव संगमावरील गाळ उपसा झाल्यास पुराचा धोका कमी होण्यास मदत होईल, असेही जाणकारांचे मत आहे. सावित्री व नागेश्वरी नद्यांच्या संगमावर साचलेला गाळ तातडीने काढणे गरजेचे आहे. त्यामुळे जलवाहतूक आणि पर्यटनाला चालना मिळेल, असे मत दासगावचे ग्रामस्थ पांडुरंग सूर्यकांत निवाते यांनी व्यक्त केले.

परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या संगम परिसरातील गाळ काढून टाकल्यास नदीची खोली वाढेल आणि लहान होड्या तसेच गलबते पुन्हा सुरू होऊ शकतील, असा विश्वास स्थानिकांकडून व्यक्त केला जात आहे. यामुळे पर्यटनासह प्रवासी वाहतुकीलाही चालना मिळेल. दासगाव हे पूर्वीचे बंदरस्थान असल्याने येथे सागरी व बंदर विकास महामंडळामार्फत जेट्टीचे कामही करण्यात आले आहे. त्यामुळे जलमार्ग सुरू झाल्यास या सुविधांचा प्रभावी वापर होऊ शकतो.

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी, ताबा मिळावा म्हणून SIT चा अर्ज

जलमार्ग सुरू करण्याचा उद्देश साध्य नाही

दासगाव परिसरात सावित्री नदी, नागेश्वरी नदी आणि खाडी यांचा संगम असल्याने येथे मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. काही वर्षांपूर्वी गाळ उपशाचे काम सुरू झाले असले तरी ते शास्त्रोक्त पद्धतीने होत नसल्याने नौकानयनासाठी आवश्यक असलेली खोली निर्माण झालेली नाही. परिणामी, जलमार्ग सुरू करण्याचा मूळ उद्देश अद्याप साध्य झालेला दिसत नाही.

Web Title: Dasgaon creek silt issue in mahad raises concern locals demand immediate dredging for water transport revival raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • Mahad
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Rain Alert: या जिल्ह्यात अतिवृष्टीचा रेड अलर्ट; आज (२ जुलै) शाळांना सुट्टी जाहीर, तुमच्या भागातील शाळा बंद राहणार का? जाणून घ्या
1

Rain Alert: या जिल्ह्यात अतिवृष्टीचा रेड अलर्ट; आज (२ जुलै) शाळांना सुट्टी जाहीर, तुमच्या भागातील शाळा बंद राहणार का? जाणून घ्या

Raigad News: जून कोरडाच! महाडमध्ये सरासरीच्या निम्माच पाऊस, नागरिकांचे जुलैकडे लक्ष
2

Raigad News: जून कोरडाच! महाडमध्ये सरासरीच्या निम्माच पाऊस, नागरिकांचे जुलैकडे लक्ष

Mumbai News: ‘आणखी किती संधी द्यायची?’ मुंबईतील खड्ड्यांवरून उच्च न्यायालयाने पालिकेला फटकारलं
3

Mumbai News: ‘आणखी किती संधी द्यायची?’ मुंबईतील खड्ड्यांवरून उच्च न्यायालयाने पालिकेला फटकारलं

आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! भाविकांची मागणी होताच गावात पोहोचणार विशेष बस; ज्येष्ठांना मोफत, महिलांना 50% सवलत
4

आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! भाविकांची मागणी होताच गावात पोहोचणार विशेष बस; ज्येष्ठांना मोफत, महिलांना 50% सवलत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.