Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! भाविकांची मागणी होताच गावात पोहोचणार विशेष बस; ज्येष्ठांना मोफत, महिलांना 50% सवलत

आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने विशेष बस सेवेचे नियोजन केले आहे. 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांची मागणी असल्यास संबंधित गावातून थेट विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 28, 2026 | 01:02 PM
आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! भाविकांची मागणी होताच गावात पोहोचणार विशेष बस; ज्येष्ठांना मोफत, महिलांना 50% सवलत

आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! भाविकांची मागणी होताच गावात पोहोचणार विशेष बस; ज्येष्ठांना मोफत, महिलांना 50% सवलत

Follow Us
Follow Us:
  • 40 किंवा अधिक भाविकांची नोंदणी झाल्यास गावातून विशेष एसटी बस उपलब्ध होईल.
  • ज्येष्ठ नागरिकांना मोफत, तर महिलांना 50 टक्के प्रवास सवलत मिळणार आहे.
  • आषाढी यात्रेसाठी वाहतूक नियंत्रण आणि विशेष नियोजन करण्यात आले आहे.
अकोला: आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूरच्या दिशेने निघणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाकडून यंदाही नियोजन करण्यात आले आहे. एसटी महामंडळाच्या अकोला विभागातूनही दरवर्षी मोठ्या प्रमाणात पंढरपूर यात्रा विशेष बसेस सोडण्यात येतात. यावर्षी विभागातील सर्व आगारातून यात्रा विशेष बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे.

मुंबईकरांना मोठा झटका! 29 जूनपासून बदलणार मध्य रेल्वेचे वेळापत्रक; ‘एसी’साठी १२ लोकल करणार बंद

यासंदर्भात विभाग यांच्या नियंत्रक मार्गदर्शनात पंढरपूर यात्रा नियोजन समिती गठित करण्यात येणार असल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली. आषाढी यात्रेदरम्यान राज्यातील विविध भागांतून लाखो वारकरी श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे प्रस्थान करतात. काही वारकरी पालख्यांसोबत पायी प्रवास करतात, तर अनेक भाविक रेल्वे, खासगी वाहने आणि एसटीचा पर्याय निवडतात. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने यात्रेकरूंच्या सेवेला प्राधान्य देत विशेष वाहतूक आराखडा तयार केला आहे. भाविकांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि सुखकर व्हावा यासाठी एसटी महामंडळाने व्यापक स्तरावर तयारी सुरू केली आहे.  (फोटो सौजन्य: istock)

महामंडळाच्या नियोजनानुसार, कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावात बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधावा आणि आगाऊ नोंदणी करावी. विशेष म्हणजे, या विशेष बस सेवेमध्ये शासनाच्या सर्व प्रवासी सवलती पूर्ववत लागू राहणार आहेत. ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ अंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा मिळणार आहेत. ‘महिला सन्मान योजना’ अंतर्गत महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे अधिकाधिक भाविकांना कमी खर्चात आणि सुरक्षित प्रवासाचा लाभ मिळणार आहे. गतवर्षीच्या आषाढी यात्रेत एसटी महामंडळाने विशेष बसेसच्या माध्यमातून भाविकांची सुरक्षित सुरक्षित ने-आण केली होती. यंदा भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यापेक्षाही अधिक सक्षम आणि व्यापक नियोजन करण्यात आले आहे.

पर्यटकांसाठी खुशखबर! सिंधुदुर्गात देशातील पहिल्या पाणबुडीच्या बांधणीला सुरुवात, 2027 मध्ये पूर्ण होणार काम

स्थानिक सुरक्षारक्षकही करणार वाहतूक नियंत्रण

एकादशीच्या दिवशी दर्शनानंतर लाखो भाविक परतीच्या प्रवासासाठी एकाच वेळी निघत असल्याने वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन एसटी महामंडळाचे वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा रक्षक स्थानिक पोलिस प्रशासनाच्या समन्वयाने वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी सांभाळणार आहेत. त्यामुळे गर्दीचे नियोजन प्रभावीपणे होऊन प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: St corporation announces special buses for ashadhi wari 40 devotees can book a bus

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 01:02 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • pandharpur

संबंधित बातम्या

Raigad News: रोह्यात हेल्मेट सक्तीवर नागरिकांचा संताप; ‘सामान्यांऐवजी बेदरकार वाहनचालकांवर कारवाई करा’, स्थानिकांची मागणी
1

Raigad News: रोह्यात हेल्मेट सक्तीवर नागरिकांचा संताप; ‘सामान्यांऐवजी बेदरकार वाहनचालकांवर कारवाई करा’, स्थानिकांची मागणी

पर्यटकांसाठी खुशखबर! सिंधुदुर्गात देशातील पहिल्या पाणबुडीच्या बांधणीला सुरुवात, 2027 मध्ये पूर्ण होणार काम
2

पर्यटकांसाठी खुशखबर! सिंधुदुर्गात देशातील पहिल्या पाणबुडीच्या बांधणीला सुरुवात, 2027 मध्ये पूर्ण होणार काम

US – Iran करारानंतर भारताचं चित्र बदलणार… गोल्डमन सॅक्सने दिली Good News, सामान्यांना फायदा होणार?
3

US – Iran करारानंतर भारताचं चित्र बदलणार… गोल्डमन सॅक्सने दिली Good News, सामान्यांना फायदा होणार?

पालघरमधील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट होणार! मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांचा ऐतिहासिक करार
4

पालघरमधील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट होणार! मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांचा ऐतिहासिक करार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.