Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: जून कोरडाच! महाडमध्ये सरासरीच्या निम्माच पाऊस, नागरिकांचे जुलैकडे लक्ष

यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्यामुळे महाड तालुक्यात जून महिन्यात अपेक्षेपेक्षा खूपच कमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांतील समाधानकारक पावसामुळे धरणांतील जलसाठा वाढू लागला असून पाणीपुरवठा आणि शेतीबाबत दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 01, 2026 | 10:55 AM
मुसळधार पावसाची शक्यता

मुसळधार पावसाची शक्यता

Follow Us
Follow Us:
  • महाड तालुक्यात जूनअखेर सरासरीच्या केवळ 52.2 टक्के म्हणजे 358 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
  • गेल्या काही दिवसांच्या पावसामुळे कोथुर्डे, कुर्ले आणि रानबाजीरे धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होऊन पाणीटंचाईचा धोका कमी झाला आहे.
  • जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्यास जूनमधील पावसाची तूट भरून निघेल, अशी अपेक्षा शेतकरी आणि प्रशासनाला आहे.
महाड: यंदा अल निनोच्या पार्श्वभूमीवर मान्सूनचे आगमन उशिरा झाल्याने महाड तालुक्यात जून महिन्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला आहे. जूनअखेर तालुक्यात सर्वसाधारणपणे ६८३ मि.मी. पावसाची नोंद होते. गतवर्षी जून २०२५ अखेर ७०९ मि.मी. पाऊस झाला होता. मात्र यंदा जूनअखेर केवळ ३५८ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, ती सरासरीच्या अवघ्या ५२.२ टक्के इतकी आहे. त्यामुळे जून महिन्यात पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे. आता महाड तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडणारा जुलै महिना ही तूट भरून काढण्यात कितपत यशस्वी ठरतो, याकडे नागरिक, शेतकरी आणि प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

NHMच्या 14,010 कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; कंत्राटी कर्मचारी झाले पर्मनंट, शासन निर्णय जारी

दरम्यान, गेल्या दोन चार दिवसांपासून झालेल्या समाधानकारक पावसामुळे महाड शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या जलस्रोतांमध्ये पाणीसाठा वाढू लागल्याने दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. सावित्री नदीवरील रानबाजीरे धरण ओव्हरफ्लो झाले असून, त्याचा लाभ महाड एमआयडीसी क्षेत्राला होणार आहे. तसेच महाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोथुर्डे व कुर्ले धरणांतील जलसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

गुरुत्वीय बलाच्या माध्यमातून जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा

पाणीपुरवठा विभागाच्या माहितीनुसार, कोथुर्डे धरणातील पाण्याची पातळी वाढल्याने गुरुत्वीय बलाच्या माध्यमातून जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्या शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असला तरी, जलसाठ्यातील वाढ लक्षात घेता लवकरच नियमित पाणीपुरवठा सुरू होण्याची अपेक्षा आहे. नगरपरिषदेच्या मालकीच्या कुर्ले धरणातील पाणीसाठाही समाधानकारक वाढला असून, त्यामुळे पाणीटंचाईचे संकट कमी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

पर्यायी व्यवस्थेमुळे पाणीटंचाईवर दिलासा

भीषण पाणीटंचाईच्या काळात नडगाव हद्दीतील खाण तलावातील पाणी टँकरद्वारे करंजखोल येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणून शहराला पुरविण्यात आले. या पर्यायी व्यवस्थेमुळे शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला. भविष्यात या तलावाच्या पाण्याचे दीर्घकालीन योजनेत रूपांतर झाल्यास महाडच्या टंचाईवर कायमस्वरूपी मात करणे शक्य होईल, असे मत व्यक्त होते.

Aditya Thackeray on Sachin Ahir: कारवाई तर होणारच! सचिन अहिर यांच्या पक्षांतरानंतर आदित्य ठाकरेंचा इशारा

जुलैमध्ये जलस्रोत अधिक सक्षम होतील

२ दिवसांच्या पावसामुळे समाधानाचे वातावरण निर्माण असून, शेतीच्या कामांनाही वेग आल्याने शेतकरी वर्गातही आनंदाचे वातावरण आहे. महाड नगरपरिषद व पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले असून, शहरात नियमित पाणीपुरवठ्यासाठी नियोजन सुरू असल्याचे सांगितले आहे. जून महिन्यात पावसाची तूट राहिली असली, तरी महाडमध्ये सर्वाधिक पाऊस पडणारा जुलै महिना ही तूट भरून काढेल, जलस्रोत अधिक सक्षम होतील, अशी अपेक्षा होत असून, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Mahad records rainfall deficit in june rising reservoir levels bring hope for july

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 10:55 AM

Topics:  

  • Mahad
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला
1

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला

बुलेट ट्रेनचा वेग वाढणार, देखभालीचीही जय्यत तयारी; 3 शहरांत उभारले जाणार अत्याधुनिक डेपो
2

बुलेट ट्रेनचा वेग वाढणार, देखभालीचीही जय्यत तयारी; 3 शहरांत उभारले जाणार अत्याधुनिक डेपो

Raigad News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज उलटा फडकवला; ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
3

Raigad News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज उलटा फडकवला; ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी

अरुणाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार; फ्लॅश फ्लडमध्ये ५ जवान बेपत्ता, भूस्खलनात चौघांचा मृत्यू
4

अरुणाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार; फ्लॅश फ्लडमध्ये ५ जवान बेपत्ता, भूस्खलनात चौघांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.