Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: ‘आणखी किती संधी द्यायची?’ मुंबईतील खड्ड्यांवरून उच्च न्यायालयाने पालिकेला फटकारलं

मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे आणि उघड्या मॅनहोलचा प्रश्न पुन्हा एकदा उच्च न्यायालयात ऐरणीवर आला आहे. यावेळी न्यायालयाने मुंबई महापालिकेच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करत नागरिकांच्या सुरक्षेबाबत कठोर प्रश्न उपस्थित केले.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 30, 2026 | 03:22 PM
Mumbai News: 'आणखी किती संधी द्यायची?' मुंबईतील खड्ड्यांवरून उच्च न्यायालयाने पालिकेला फटकारलं

Mumbai News: 'आणखी किती संधी द्यायची?' मुंबईतील खड्ड्यांवरून उच्च न्यायालयाने पालिकेला फटकारलं

Follow Us
Follow Us:
  • मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे आणि उघड्या मॅनहोलच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला तीव्र शब्दांत फटकारले.
  • खड्डे आणि मॅनहोलबाबतच्या तक्रारींसाठी असलेल्या ॲपची कार्यक्षमता आणि तक्रार निवारणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
  • नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत हमी देण्याची मागणी करत, उघड्या मॅनहोलमुळे एकही मृत्यू होणार नाही याची खात्री देता का, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला.
मुंबईसह आसपासच्या परिसरातील रस्त्यांवरील खड्डे आणि उघड्या मॅनहोलचा प्रश्न दोन दशकं लोटली तरीही ‘जैसे थे ‘आहे. आणखी तुम्हाला किती संधी द्यायची? अशा शब्दात उच्च न्यायालयाने सोमवारी मुंबई महापालिकेला धारेवर धरले. तसेच या प्रकरणी तक्रार नोंदवण्यासाठी असलेले ॲप कार्यरत आहे का ? किती तक्रारी आल्या त्याचे निकारण झाले का? त्याबाबतची आकडेवारी न्यायालयात सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने पालिकेला दिले.

एसटीचे 31 पैकी 21 विभाग तोट्यात; परिवहनमंत्र्यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना दिला ‘हा’ इशारा

मुंबईमहानगर प्रदेश (एमएमआर) मधील उघड्या मॅनहोल आणि रस्त्यांवरील खड्यांच्या संदर्भात वकील रुज्जू ठक्कर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका केली आहे. त्यावेळी, तुम्ही दहिसर ते फोर्ट प्रवास करून बघा मोठ्या प्रमाणात शरीराला इतके धक्के बसतात, ही वस्तुस्थिती आहे, असे आणखी किती वर्ष चालणार पालिका प्रशासनाला जाग येणार आहे का?, अशा शब्दात न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठाने पालिकेची कानउघडणी केली. २० वर्षांपूर्वी, न्या. आर.एम. लोढा यांनी आदेश दिले होते आणि आता आपण २०२६ मध्ये आहोत. रस्त्यांची स्थिती तशीच आहे. तुम्ही काय करत आहात? दरवर्षी ही समस्या उद्भवते आणि तुम्ही इथे येऊन काहीतरी स्पष्टीकरण किंवा कारणे देता. ही कसली वृत्ती आहे? अशी प्रश्नांची सरबत्तीच न्यायालयाने केली.

जगभरातील रस्ते पाहा, कुठेही खड्डे, रस्त्यांची चाळण नाही

जगभरातील रस्ते पाहा, स्त्यांवर कुठेही खड्डे आढळत नाहीत, रस्त्यांची चाळण पहायला मिळत नाही तिथे वैज्ञानिक पद्धतीने रस्ते बांधले जातात आणि एकही धक्का न लागता गाडी ताशी १०० किमी वेगाने सहज चालवता येते. तिथे कोणीही जनहित याचिका दाखल करीत नाही, खड्ड्येच नसेल तर याचिका का दाखल होईल, आता तरी जागे व्हा, असेही न्यायालयाने पालिकेला सुनावले.

महापौर रितू तावडेंसमोरील ‘ते’ उघडे मॅनहोल नव्हे !

गेल्या आठवड्यात मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या समोरच एका कथित उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या पालिका अधिकाऱ्याबाबतही यावेळी न्यायालयाला स्पष्टीकरण देण्यात आले. त्या ठिकाणी मोठी गर्दी होती; त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याचा पाय चुकून वॉटर पंपिंग स्टेशनमध्ये पडला आणि तो त्यात खाली गेला. ते मॅनहोल उघडे नव्हते, त्यामुळे ही उघड्या मॅनहोलची घटना नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

Dharashiv News : शासकीय दिनदर्शिकेला फाटा? धाराशिवमध्ये शाहू महाराज जयंती २५ जूनला साजरी केल्याने प्रश्नचिन्ह

एकही मृत्यू होणार नाही, आश्वासित करा !

तत्पूर्वी, ७३ हजार, ४३७ मॅनहोल पैकी ७१ हजार ४२६ मॅनहोलवर सुरक्षित जाळी बसविण्यात आली आहे. तर २०११ मॅनहोल्स हे वापराविना किंवा बंद असल्याचे पालिकेच्या वतीने ॲड. जोएल कार्लोस यांनी न्यायालयाला सांगितले, त्यावर आम्हाला ही आकडेवारी नको, आम्हाला नागरिकांची चिंता आहे, यापुढे एकही मृत्यू किंवा अपघात या उघड्या मॅनहोलमुळे होणार नाही, असे आश्वासित करता का अशी विचारणाही न्यायालयाने पालिकेला केली.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Bombay high court pulls up bmc over mumbai potholes open manholes seeks accountability

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 03:22 PM

Topics:  

  • Marathi News
  • Mumbai News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

बड्या उद्योगपतीच्या ‘त्या’ एका विधानाने खळबळ, IT हबला ‘कचऱ्याचं शहर’ म्हणून दिली उपमा, बंगळुरु शहराची अशी अवस्था का?
1

बड्या उद्योगपतीच्या ‘त्या’ एका विधानाने खळबळ, IT हबला ‘कचऱ्याचं शहर’ म्हणून दिली उपमा, बंगळुरु शहराची अशी अवस्था का?

SBI संशयाच्या भोवऱ्यात… Ram Mandir चंदा चोरीचे कनेक्शन थेट बँकेशी? संशय असूनही कारवाई का झाली नाही?
2

SBI संशयाच्या भोवऱ्यात… Ram Mandir चंदा चोरीचे कनेक्शन थेट बँकेशी? संशय असूनही कारवाई का झाली नाही?

माजी मुख्य निवडणूक आयुक्त सांभळणार HDFC Bank ची धुरा? 3 वर्षांसाठी मिळाली जबाबदारी
3

माजी मुख्य निवडणूक आयुक्त सांभळणार HDFC Bank ची धुरा? 3 वर्षांसाठी मिळाली जबाबदारी

मेट्रोसारखी सुरक्षा लोकलमध्ये राबवणे कठीण! प्रशासन सतर्क सीसीटीव्ही वाढवण्यावर भर; आव्हानांवर मात करण्याचा पोलिसांचा भर
4

मेट्रोसारखी सुरक्षा लोकलमध्ये राबवणे कठीण! प्रशासन सतर्क सीसीटीव्ही वाढवण्यावर भर; आव्हानांवर मात करण्याचा पोलिसांचा भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.